सद्धगुरु जग्गी वासुदेव ईशा फाउंडेशनचे संस्थपाक ,अध्यात्मिक गुरु, सामाजिक परिवर्तनातील एक अग्रदूत . हिंदुस्तान टाईम्सच्या नेतृत्व शिखर परिषदेत त्यांनी महत्वाकांक्षी नेतृत्त्व ते द्रष्टे नेतृत्त्व ह्या विषयावर मांडलेले विचार.
सुरवातीला धार्मिक नेतृत्वाचा प्रभाव होता. त्यानंतर लष्करी नेतृत्त्व ला महत्त्व प्राप्त झाले पुढे लोकांमधून निवडून आलेलं लोकशाही नेतृत्व उदयाला आले. आता आर्थिक / उद्योगिक नेतृत्व वर्चस्व गाजवताना दिसत आहे.
नेतृत्वाचा डोलारा महत्त्वाकांक्षेवर ऊभा असतो. महत्त्वाकांक्षा म्हणजे काय? आहे त्या परिस्थितीची अतिशयोक्ती , आहे त्या पेक्षा जास्त अपेक्षा करणे.
द्रष्टेपण म्हणजे आहे त्या स्थितीची योग्य जाणीव आणि भविष्यातील शक्यते विषयी सुसंगत स्पष्ट दृष्टी. द्रष्टेपणा म्हणजे संशोधन.
महत्वाकांक्षा म्हणजे कशावर तरी विजय, हवं ते मिळवणे. एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवणे हा एक मार्ग झाला, दुसरा मार्ग आहे त्या गोष्टीचा अंतर्भाव करून घेणे. ताबा, घेणं-याला बंधनात अडकवतो तर समाविष्ट केल्याने तुम्ही मुक्त होता. ताबा घेणारा प्रत्येक गोष्टी कडॆ उपयुक्त वस्तू म्हणून पहात असतो.
महत्वाकांक्षा, नवीन वास्तवाचा शोध आहे,
द्रष्टेपण, नवीन वास्तवाची अभिव्यक्ती आहे
महत्वाकांक्षा म्हणजे मोठ्या मोठ्या आकांक्षा प्रत्येक वेळी मोठी इच्छा.
द्रष्टेपण सर्वांना सामावून घेते, जीवन जस आहे तसं तुम्ही पाहता तेव्हा द्रष्टेपण येते.
जेव्हा तुम्ही एखादं स्वप्न, गोष्ट साकार कारण्याकडं दृष्टी वळवता तेव्हा तुम्ही महत्वाकांक्षी बनता.
आपण सर्व आपल्या वयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या मागे धावत आहोत. त्यांनी जगाला हानी पोहचवत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानांनी वाढलेली आमची क्षमताच आमच्या विरुद्व जात आहे. आमचा काम करण्याचा आवाका कौशल्य जगाचा -हास करत आहे.
आता नेतृत्वाने समजून घेण्याची वेळ आली, वयक्तित महत्वाकांक्षा सोडून मोठी उद्दिष्ट समोर ठेवायला हवीत. आपल्या इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षेला खतपाणी घालतात व इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. एक पूर्ण झाली की दुसरी उत्पन्न होते. महत्वाकांक्षा सतत विस्तारत राहते. तुम्ही जेव्हा महत्वाकांक्षी होता तेव्हा वेडे होऊन त्या गोष्टीच्या मागे धावत सुटता. तुम्हाला इतरां पेक्षा वेगळे आहोत हे दाखवायचं असते.
द्रष्टेपण, अवतीभवतीचं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करत असते. फक्त माझं चांगलं होऊन उपयोग नाही तर आजूबाजूचं जीवन चांगलं झालं पाहिजे अशी सर्वांची भावना असायला हवी, अशी दृष्टी विकसित व्हायला हवी.
द्रष्टेपण म्हणजे भविष्याविषयी स्वच्छ , निश्चित ,विशिष्ट दृष्टी.
महत्वाकांक्षी नेतृत्व म्हणजे मी, माझे,
द्रष्टे नेतृत्व , सर्वासाठी सर्वाभूती.
विनाश टाळायचा असेल तर आपल्याला मी माझा सोडून सर्वाचा विचार करायला हवा,
वयक्तिक महत्वाकांक्षा सोडून सर्वांच्या भल्या चा मार्ग धरायला हवा.
महत्वाकांक्षे कडून द्रष्टेपणा कडे वाटचाल करायला हवी.
No comments:
Post a Comment