Tuesday, 27 December 2016

चांगला माणूस बनू या !




चांगला माणूस बनू  या !

  मुलाने चांगला माणूस व्हावे म्हणून आईनं  सुचवलेल्या काही गोष्टी. ( इकॉनॉमिक्स टाईम मधील यामिनी सूद यांचा लेख )

स्वतंत्र पणे विचार करा. :   आपले मित्र काय करतात किंवा कसा विचार करतात त्यांच्या प्रभावाखाली दबून जाऊ नका.  स्वत: विचार करा, सर्वांच्या  अनुमतीची  किंवा पुष्टीकरणाची अपेक्षा ठेवू नका. मूठभर हितचिंतक अवश्य  जोडा. एकाच वेळी सर्वांचं समाधान करता येणार नाही आणि तसा प्रयत्न करणे प्रगतीस बाधक ठरेल. 

मोठं होण्याची घाई करू नका. :  बिया पासून झाड कसं होतं हे आपण शाळेत शिकलो आहोत. आपल्याला सतत प्रश्न पडत असतात. मी मोठा कधी होईंन? स्वावलंबी कधी होईन?मोठ्या मंडळींच्या चर्चेत, निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी कधी मिळेल?  खरं तर, वाढ ही एक सततची प्रक्रिया आहे. त्यातील आनंद घ्या. वडीलधारी मंडळी संगोपन करतात ,प्रेम व आधार देत असतात, आणि आवश्यकता असेल तेव्हा कान देखील उपटतात. 

वेळ दवडू नका : अभ्यास, कामा कडे दुर्लक्ष आणि सतत खेळ यांनी काहीच साध्य होणार नाही. तुम्हाला मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट माहित आहे, मुंगी अव्याहत काम करत असते. हिवाळ्यासाठी रवा,साखर जमा करत असते आणि नाकतोडा फक्त नाचत असतो. सांगणं एकच आहे की काम आणि खेळ या मध्ये संतुलन साधा, निष्काळजीपणाने वेळ वाया घालवू नका. 

मित्र, सहकारी , वस्तूत गुंतू नका:  भावनेने गुंतू नका त्याने फक्त दुःखच होते. लोकं  बदलत असतात,  परिस्थिती पालटत असते. असं काहीतरी  होतं असतंच .  जाऊ द्या, स्वतःशी प्रामाणिक रहा. 

कोणाचाही अनादर करू नका.: आईवडील ,आजीआजोबा, शिक्षक यांचा आदर ठेवाच, त्याचबरोबर नोकरचाकर, ड्रॉयव्हर हे ही आपल्या कुटूंबाचे भाग आहेत त्याचा आदर करा. सुशिक्षित मंडळी कमी सहनशील असते  आणि शिकण्यासाठी त्यांच्या कडे संयम ही नसतो, असं म्हणतात   हे खरं आहे का ? . तुम्ही सुशिक्षित तर  आहातच थोडी सहनशीलता अंगी बाणवा.
 
यश म्हणजे खूप पैसा आणि पदकं नव्हे: जोपर्यंत तुम्ही हार मानत नाहीत. तुम्हाला कल्पना आहे की तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न करत आहात आणि पुढच्या वेळी अधिक मेहनत घ्यायची तयारी आहे अश्या वेळी जिंकला नाहीतरी फरक पडत नाही. व्यासपीठाची भीती वाटणे ठीक आहे परंतु तुम्ही व्यासपीठावर बोलण्यासाठी उभं राहणं हे ही यशच आहे. 

छंद जोपासा : तुम्हाला आवडेल असा छंद विकसित करा  तो एखादा खेळ असेल  , कला असेल , हस्तकला असेल , वाचन असेल. छंद आनंद देतो ताण तणाव दूर करतो. विशेषतः   मोठेपणी जेव्हा ताणतणावाच्या , ओझ्याखाली वाकून जाता. . जेव्हा आत्यन्तिक गरज असते तेव्हा छंद आपल्याला शांत होण्यास मदत करतो  व आनंद निर्माण करतो.  छंद जगण्यास अर्थ प्राप्त करून   देतो . एखादा छंद जरूर जोपासा.    
 


 


No comments:

Post a Comment