काहीवेळा यशस्वी होण्यासाठी
, आपल्याला जीवनांत जे साध्य करावयाचे आहे त्यासाठी अधिक काही करण्याची आवश्यकता नसते
तर काही गोष्टी सोडून देण्याची गरज आहे.
काही गोष्टी सार्वत्रिक
आहेत. जर या गोष्टी तुम्ही सोडल्या तर यश तुमचंच.
आरोग्यास धोकादायक जीवनशैली
सोडून द्या : जीवनात
काहीही साध्य करायचं असल्यास प्रथमतः आरोग्याची काळजी घेणं आवश्यक. निरोगी जीवनामुळे
अनेक गोष्टी साध्य करता येतील. "शीर सलामत तो पगडी पचास" आरोग्यासाठी नियमित
झोप ,सकस आहार आणि व्यायाम ही त्रिसूत्री आहे. .
झटपट फायदा सोडून द्या
: नजीकचा (short
term) फायदा बघू नका. दीर्घकालीन ध्येय ठरवा. रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयीतून
उद्दिष्ट गाठलं जातं. चांगल्या सवयी जोपासा. त्या आपल्या रोजच्या जीवनाच्या अंग बनवा.
छोटी ध्येय सोडून द्या
: छोट्या ध्येयाने
कोणाचंच भलं होत नाही. आक्रसून जाण्यात शहाणपण नाही. त्यामुळे आजूबाजूचं वातावरण असुरक्षित
बनतं. तुम्हाचा निर्भयपणा इतरांना भयापासून मुक्त करू शकतो. नवनवीन कल्पना राबवा अपयशाला
घाबरू नका आणि यशापसून पळ काढू नका. जर आपण मोठी स्वप्न पहिली नाहीत मोठ्या संध्या
घालवल्या तर आपण आपल्या क्षमतेचा मुक्तपणे उपयोग केला नाही असं होईल. आपल्या क्षमतेला
पूर्णपणे वाव द्या.
सबबी सोडून द्या : सबबी आपली व्यक्तिगत व व्यावसायिक वाढ खुंटवते आपण कारणं शोधत राहतो. यशस्वी लोकांना पूर्णपणे माहित असत की आपलं जीवन आपणच घडवू शकतो. आपल्या जीवनात घडणा-या चांगल्या किंवा वाईट गोष्टीला आपणच जबाबदार आहोत याची जाणीव असते.
ठाम मतं किंवा निश्चित मानसिकता सोडून द्या.: निश्चित मानसिकता असेलेले लोक मानतात की बुद्धिमत्ता आणि प्रतिभा दैवीदेणगी आहे. जी बदलू शकत नाही. यशस्वी लोक,मानसिकता विकसित करण्यासाठी , नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी, नवीन कौश्यल्य शिकण्यासाठी, समज प्रगल्भ करण्यासाठी रोज वेळ काढत असतात. ज्यामुळे जीवन उन्नत होण्यास मदत होईल. एक लक्षात ठेवा "आज आपण जे कोणी आहोत तेच उद्या असायला पाहिजे असं नाही. उद्या अधिक सुंदर करता येईल.
जादूच्या कांडी वर विश्वास
ठेवू नका : एका रात्रीत
जग बदलेले ही भाकडकथा आहे. प्रसिद्ध लेखक एमिल म्हणतो "दररोज , प्रत्येक मार्गाने
मी अधिकाधिक विकसित होत आहे ". दररोज केलेल्या छोट्याशा सुधारणा कालांतराने इच्छित
परिणाम साध्य करणा-या ठरतात. आपल्याकडे असलेला वेळ बघून भविष्याचं नियोजन करून रोज
थोड्या थोड्या सुधारणा करायला हव्यात.
परिपूर्णता सोडून द्या
: आपण कितीही प्रयत्न
केले तरी परिपूर्ण असं काही नसतं यशापयशाची भीती कृती पासून दूर नेते. योग्य वेळेची
वाट बघत बसू तर हातातील अनेक संध्या निसटून जातील. म्हणून सुरवात करा आणि रोज सुधारणा
घडवीत रहा.
एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचं टाळा : एक ना धड भराभर चिंध्या अशी एक म्हण आहे. एकाच वेळी एक गोष्टीवर लक्ष केंद्रित करून त्याच्यात छोटी छोटी विभागणी करून तडीस न्या. अपेक्षित यश मिळवण्यासाठी एकाच कामावर लक्ष देणं आणि बांधिलकी पाळणे अपरिहार्य आहे.
प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण
ठेवण्याची वृत्ती सोडा :
काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही गोष्टी हाताबाहेरच्या. या गोष्टी वेगळ्या करता
येणे महत्वाचं. आपण ज्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाही अश्या गोष्टीपासून दूर राहा.
नियंत्रण ठेवू शकतो अश्यावर लक्ष द्या. एक लक्षात असू द्या आपण नियंत्रण ठेऊ शकतो अशी
एकमेव गोष्ट म्हणजे एखाद्या विषया संदर्भातील आपला स्वभाव , आपली वृत्ती.
उद्दिष्टाच्या आड येणा-या गोष्टीना होय म्हणायचे सोडून द्या : उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कधी कधी काही कामांना , उपक्रमांना व मित्र मैत्रिणी, कुटुंबाकडून होणं-या मागणीला नाही म्हणावं लागतं. त्यामुळे काही काळा साठी आनंद हिरावला असं वाटेल परंतु उद्दिष्टपूर्ती सर्वांना आनंद देईल.
कुसंगत सोडा : नकारात्मक लोकांची संगत सोडा, प्रत्येक
गोष्टीत त्यांना खोट दिसत असते. तुम्ही जर कारणं शोधणा-या , दुस-याना दोष देणा-याच्या
संगतीत राहिलात तर तुम्ही तसेच बनाल. तेच जर तुम्ही व्यक्तिगत आणि व्यवसायिक रित्या
उत्तम प्रगती करणा-या बरोबर राहिलात तर अधिक यशस्वी व्हाल.
आपण आवडतं असायला पाहिजे हे सोडून द्या : आपण काहीही केलं तरी आपण सर्वांचे आवडते असू शकत नाही. हे नैसर्गिक आहे आणि समर्थन करण्याची आवश्यकता नाही. परंतु आपण प्रामाणिक, रोज आपल्यात सुधारणा व आपलं मूल्यवर्धित करणारे असायला पाहिजे.
वेळ दवडू नका : आपण विचार करतो की आपणाकडे वेळ आहे.
खरं तर हीच समस्या आहे. आपल्याला मौल्यवान जीवन मिळालं आहे. दिवसातील २४ तासाचा पुरेपूर
उपयोग करा. आपण मरणार आहोत, म्हणून चांगला वारसा निर्माण करा आणि जीवन समृद्ध करण्याचे
काम थांबवू नका.
(इंग्रजी लेखाचा स्वैर अनुवाद
,त्रुटी माझ्या )
No comments:
Post a Comment