विद्यार्थी मित्रांनो गुणांना महत्त्व आहेच परंतु गुणपत्रिका म्हणजे सर्वं काही नाही. शिक्षणाबरोबरच आपलं व्यक्तिमत्व विकास व्हावा. आपल्या वक्तिमत्वातील दोष कमी करणे आणि व्यक्तिमत्त्वातील चांगले गुण जोपासणे म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास ही सततची प्रक्रिया असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध समुपदेशक सौ सुरभी नाईक यांनी वसईतील संजीवनी परिवार आयोजित वृक्षवाढदिवस व विद्यार्थी कौतुक मेळाव्यात केलं.
प्रा. सायनेकर सरांच्या प्रेरणेने २००५ साली सुरु झालेल्या " संजीवनी वनराई " या वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन प्रकल्पाचा तेरावा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी समाजमित्र पत्रकार मयुरेश वाघ यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आलं. सौ सुरभी नाईक , श्री बबनशेठ नाईक , श्री राजन नाईक , श्री यशवंत पाटील , व विद्यार्थी मित्राच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. आज रुद्राक्ष, कदंब , पंगारा ,अशोक वृक्षाचं रोपण करण्यात आलं.
स्वच्छता ,वृक्षजगत ,पर्यावरण या विषयाशी आपले विद्यार्थी मंडळी जोडली जावी म्हणून विद्यार्थी कौतुक व वृक्षवाढदिवस एकत्र साजरा केला जातो. दहावी बारावीचे निकाल नुकतेच लागलेले असतात. वर्षभर अभ्यासाचा तणाव असतो. यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थी मित्रांना एकत्र बोलवून एखादं गुलाबपुष्प देऊन ,,पेढा देऊन कौतुक करावं असं साधं स्वरूप या कौतुक मेळाव्याचे आहे असं प्रास्ताविकात नरेश जोशींनी सांगितलं. सुनील म्हात्रेंनी सूत्रसंचालन केलं. कार्यक्रमाला श्री द. ग नाईक, श्री यशवंत पाटील, श्री राजन नाईक , श्री बबनशेठ नाईक श्री चिंतामण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment