Friday, 2 August 2019

लवकर उठा आणि शहाणे व्हा.

नुकतंच रॉबिन शर्माचं The 5 AM Club हे पुस्तक पाहण्यात आलं , चाळून पाहिलं. रॉबिन शर्मा व्यवस्थापन या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचं व्यक्तिमत्त्व, त्याच्या शब्दात म्हणायचं तर Be Wise Early Rise म्हणजे लवकर उठा आणि शहाणे व्हा. तस हिंदीत ही म्हटलं जातं जल्दी सोये , जल्दी जागे , दुनियामे सबसे आगे !! लवकर उठण्याचं महत्व आपल्याला नवीन नाही लहानपणा पासून आपण ऐकत आलो आहोत, त्यामुळे  पहाटेच्या प्रहराला "राम प्रहार"  म्हटलं गेलं आहे. आजच्या भाषेत " Holy Hours" सकाळी लवकर उठा अभ्यास करा, पहाटेच्या एकांतात केलेला अभ्यास चांगला.   कॊणातही चांगलं काम त्याचं चिंतन मनन करा रामदास स्वामी सांगतात की "प्रभाते मनी राम चिंतीत जावा "आणि इकडे फक्त दशरथ पुत्र राम अपेक्षित नसून, जे जे उत्तम उदात्त उन्नत चं चिंतन. वैदिक प्रार्थनेत " प्रभाते कर दर्शनम " चा मंत्र दिला आहे. In current scenario , Take  stock of whats in your hand, rather everything in your hand, pay gratitude to rest of the world who are always helpful.हेच सूत्र रॉबिन शर्मा आपल्या नव्या पुस्तकात आधुनिक आजच्या भाषेत विस्तारानं मांडतात,
  • पहाटे ५ वाजताचा  एकांत तुमच्या मेंदूला सर्वोत्कृष्ठ काम करायला चालना देईल. पहाटेच्या रामप्रहरी मेंदूची आकलन शक्ती परमोच्च असते नेमक्या भाषेत सांगायचं तर बॅटरी फुल चार्ज असते.  या वेळी मन विचलित होत नाही , अतिकाळजी आणि चिंता मुक्त स्थितीत असते. सूर्योदयाच्या वेळेची सकारात्मक ऊर्जेचा लाभ होतो त्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता. ज्यामुळे कामावर लक्षकेंद्रित करता येते व कामं चांगली होतात. 
  • पहाटे ५ वाजता उठण्यासाठी शरीराला योग्य विश्रातीची आवश्यकता असते. रोजच्या झोपेतूनच शरीराची झीज भरून येत असते. प्रभावी पणे काम करण्यासाठी ,प्रगतीसाठी  विश्राती ही तितकीच महत्त्वाची. मोबाईल टीव्ही इत्यादी उपकरणं विश्रातीच्या आड येत असतात. ती झोपे पूर्वी पाहणे बंद  केली पाहिजेत. रात्री वेळेवर झोपलात तर सकाळी उठणे सोप्प होईल. 
  • पहाटेच्या प्रहाराची उपयुक्तता वाढवण्यासाठी  ते   २०/२०/२०  सूत्र  सांगतात   दिवसाच्या सुरवातीची २० मिनिटं  व्यायाम करा. घाम येण्याने विचारशक्ती  सुधारते. पुढची २० मिनिटं एकाग्रतेत घालावा , ध्यान , धारणा मेडिटेशन करा. एकांतेत घालवलेला हा वेळ मनाला शांतता देईल. आणि शेवटची २० मिनिटं शिक्षणासाठी वापरा यामध्ये एखादं पुस्तक वाचा, डॉक्युमेंटरी बघा , कोणतीही कृती करा जी शिकायला मदत करेल, तुमची उन्नती करेल.
पहाटे ५ वाजता उठणे अवघड नाही, मनाचा निश्चय करायला हवा. लवकर उठण्यासाठी काही सोप्प्या गोष्टी लेखक सुचवतात 
  • रात्रीचं जेवण वेळेत घ्या, उशीरा घेऊ नका. लवकर जेवल्यामुळे   झोप चागंली होऊन पूर्ण  होईल.      
  • अलार्म झाल्याबरोबर अंथरूण सोडा. अजून थोडं झोपू हा विचार झटका. आळस टाळा.
  • तंदुरुस्त रहा. नियमित व्यायाम करा..तबेतीची काळजी घ्या.  
  • मोठी स्वप्न बघा , उच्चं ध्येय ठेवा जी तुम्हाला झोपू देणार नाहीत.
  • मन आणि अंथरुणाची लढाई आहे. अंथरुणावर मात करून लवकर उठा ,  Put mind over mattress. , लवकर उठल्याने  निवांती , अधिक कुशलता, आणि खूप काही मिळेल ज्याची अनुभूती स्वतः घ्या!
आपलं जीवन मौल्यवान आहे.  विश्वातील आपलं स्थान अद्वितीय आहे  हे सर्व साध्य करू शकता, लवकर जागे व्हा !!!
बेंजामिन फ्रँकलीन यांनी एका ठिकाणी नमूद केलं : मेल्यावर झोपायला भरपूर वेळ मिळेल. ( Benjamin Franklin once noted: “there will be plenty of time to sleep when you are dead.”  )

No comments:

Post a Comment