प्रसिद्ध
गीतकार उर्दू कवी साहिर लुधियानवी (८ मार्च १९२१ - २५ अक्टूबर १९८०) यांचं हे जन्मशताब्दी
वर्ष. त्यांच्या कविते विषयी, गीता विषयी आजचे दुसरे एक महाकवी
साहिर
लुधियानवी यांचे खरे नाव अब्दुल हयी. त्यांचा जन्म ८ मार्च १९२१ रोजी लुधियाना येथे
झाला. लुधियानात साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग मुंबईकडे मोर्चा
वळवला. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही
टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या त्या सर्वांमधील एक ज्ञान
पीठ पुरस्कार विजेत्या ‘अमृता प्रीतम’.
साहिर
लुधियानवी.. उर्दू शायरी आणि हिंदी चित्रपटगीतांचे अद्वितीय जादूगार. भावनांचे पोकळ
बुडबुडे त्यांनी कधीच काढले नाहीत. ज्यांच्या गीतांना संगीत देण्याने संगीतकारांना
दैवी अनुभूती येत असे, अशा साहिरजींची आज (८ मार्च) रोजी जन्मशताब्दी सुरू होत आहे.
यानिमित्ताने त्यांचे समकालीन ज्येष्ठ कवी व गीतकार गुलज़ार यांनी त्यांच्या चित्रपटगीतांच्या
अनवटपणावर टाकलेला झोत..
खालील
लेखात साहिरजींच्या शायरीतून प्रतीत होणारे त्यांचे दु:खभारले व्यक्तिमत्त्व..
ताजमहाल
ही दोन व्यक्तींची निर्मिती होय. एक शाहजहानची.. संगमरवरातली आणि आग्य्राला उभी असलेली.
दुसरी आहे ती उर्दूत लिहिलेली, साहित्यात विराजमान झालेली, साहिर लुधियानवींच्या नावावर
असलेली..
दोन्ही
आहेत प्रेमाची प्रतीकं. आणि ती दोन्ही अमर्त्य आहेत. पहिली कलाकृती आहे ती शाहजहानची
प्रेमिका मुमताज हिची आठवण सांगणारी. आणि दुसरी आहे ती साहिर लुधियानवींनी आपल्या प्रेमिकेला
उद्देशून केलेली; पण तिच्या नावाचा उल्लेख नाही केलेला. फक्त एवढंच म्हटलंय की, ‘मेरी
मेहबूब, कहीं और मिला कर मुझसे..
प्रिये,
कुठेतरी दुसरीकडे भेटत जा मला.’
ही ऩज्म-
ही कविता- हवी तर वाचा. इथे उद्धृत करतो आहे..
ताजमहल
ताज तेरे
लिए इक मज़हर-ए-उल्फ़त ही सही
तुमको
इस वादी-ए-रंगीं से अक़ीदत ही सही
मेरी मेहबूब,
कहीं और मिला कर मुझसे!
ब़ज्मे-शाही
में ग़रीबों का गुज़र क्या मानी?
सब्त जिस
राह पे हों सतवते-शाही के निशाँ
उसपे उल्फ़त
भरी रूहों का सफ़र क्या मानी?
मेरी मेहबूब,
पस-ए-पर्दा-ए-तशहीर-ए-वफ़ा
तूने सतवत
के निशानों को तो देखा होगा
मुर्दा
शाहों के मक़ाबिर से बहलने वाली!
अपने तारीक़
मकानों को तो देखा होता
अनगिनत
लोगों ने दुनिया में मुहब्बत की है
कौन कहता
है कि सादिक़ न थे ज़ज्बे उनके?
लेकिन
उनके लिए तशहीर का सामान नहीं
क्यों
कि वो लोग भी अपनी ही तरह मुफ़लिस थे
ये इमारातो-मक़ाबिर,
ये फसीलें, ये हिसार
मुतलक़-उल-हुक्म
शहन्शाहों की अज़्ा मत के सुतूँ
दामन-ए-दहर
पे उस रंग की गुलकारी हैं
जिस में
शामिल है तेरे और मेरे अजदाद का खूँ
मेरी मेहबूब!
उन्हें भी तो मुहब्बत होगी
जिनकी
सन्नाई ने बख़्शी है इन्हें शक्ल-ए-जमील
उनके प्यारों
के मक़ाबिर रहे बे-नाम-व-नमूद
आज तक
उनपे जलाई न किसीने क़ंदील
ये चमनज़ार,
ये जमुना का किनारा, ये महल
ये मुऩक्क़श
दरो-दीवार, ये मेहराब, या ताक़
इक शहन्शाह
ने दौलत का सहारा लेकर
हम ग़रीबों
की मुहब्बत का उडमया है मज़ाक
मेरी मेहबूब,
कहीं और मिला कर मुझसे
(ताज हे
प्रेमाचं प्रकटीकरण खरं तुझ्या लेखी,
या रम्य
ठिकाणाविषयी भक्तिभावही असेल तुझ्या मनी
(तरीही)
प्रिये, कुठेतरी दुसरीकडे भेटत जा मला.
शाही दरबारात
कोण विचारतो गरीबांना?
शाही वैभवाच्या
खुणा ल्यालेल्या मार्गावर
प्रेमिकांचे
आत्मे काय करणार मार्गक्रमणा?
प्रिये,
प्रेमाच्या जाहिरातीच्या पडद्याआड लपलेल्या
वैभवाच्या
खुणा तरी पाहायच्या होत्यास..
मृत बादशहांच्या
मकबऱ्यांमध्ये रमणाऱ्या प्रिये,
आपल्या
अंधारल्या घरांकडे तरी पाहायचं होतंस..
जगात असंख्य
लोकांनी प्रेम केलंय ग
कोण म्हणतं,
शुद्ध नव्हत्या भावना त्यांच्या?
पण त्यांच्यापाशी
नव्हती जाहिरात करण्याची साधनं
कारण ते
लोकही होते आपल्यासारखेच निष्कांचन
या इमारती,
हे मकबरे, हे बुरूज-गड-किल्ले
स्वेच्छाचारी
सम्राटांच्या महानतेचे हे स्तंभ-
हे स्तंभ
म्हणजे विश्वाच्या वस्त्रावरची रंगीत नक्षी
या नक्षीत
मिसळलंय तुझ्या-माझ्या बापजाद्यांचं रक्त
प्रिये,
ज्यांच्या कारागिरीनं बहाल केलं हे सुंदर रूप
ताजमहालाला,
त्यांनीदेखील केलंच असेल प्रेम
त्यांच्या
प्रियजनांच्या कबरींवर नाही नाव-निशाणी
दिवादेखील
कधी तिथे नाही लावला कुणी
हा बगीचा,
यमुनेचा हा काठ, हा महाल
नक्षीनं
नटलेले दरवाजे-भिंती, कमानी, कोनाडे..
संपत्तीच्या
जोरावर एका सम्राटानं
आपल्या
प्रेमाची उडवलेली खिल्ली आहे ही!
प्रिये,
कुठेतरी दुसरीकडे भेटत जा मला)
परंतु
आज साहिर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्तानं माझ्याकडे चित्रपटांतल्या त्यांच्या
गाण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, म्हणून केवळ त्यांच्याविषयीच बोलतो.
अनुभव
असा असतो की चित्रपटातली गाणी ‘हिट्’ होतात, म्हणजेच सामान्यांकडून आणि असामान्यांकडून
पसंतीची पावती त्यांना मिळते, तेव्हा त्याचं पहिलं कारण असतं, ते म्हणजे त्यांची ‘चाल.’
शब्दांचा नंबर दुसरा. कधी कधी तर तिसरादेखील. म्हणजे जेव्हा ती गाणी लता मंगेशकर, किशोरकुमार
किंवा मोहम्मद रफींसारख्या गायकांनी गायिलेली असतात. तेव्हा शब्द हे चालीला लगाम घालायचं
काम करतात; प्रत्यक्ष धावायचं काम करते ती ‘चाल.’
परंतु
शब्दांमुळे, शायरीमुळे गाणं हिट् व्हावं हे मोठेपण केवळ दोघांनाच लाभलं. एक होते पंडित
प्रदीप आणि दुसरे साहिर लुधियानवी.
पंडित
प्रदीप अनेकदा तर स्वत:ची गाणी स्वत:च गातही असत. त्यांची गाणी त्यांच्या सामाजिक आवाहनासाठी
प्रसिद्धी पावली. उदा.
‘दूर हटो
ऐ दुनिया वालो, हिंदुस्तान हमारा है’
किंवा-
‘देख तेरे
संसार की हालत क्या हो गई भगवान
कितना
बदल गया इन्सान।’
पण साहिरचा
अवकाश खूप मोठा आहे. एखाद्या शायरानं चित्रपट माध्यम जवळ करू नये, तर चित्रपट माध्यमानंच
त्या शायराकडे यावं, त्याला आपलं म्हणावं, हे इथे प्रथमच घडलं होतं. हा शायर जे, जसं
लिहीत होता ते, तसंच राहिलं या माध्यमात.
‘जाने
वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला।’
**
‘जिन्हें
नाज़ है हिंद पर वो कहाँ हैं?’
**
‘मैंने
चाँद और सितारों की तमन्ना की थी।’
प्रेमात
वाटय़ाला येणारं उदासवाणेपण अनेकांनी रडून- भेकून व्यक्त केलं. पण..
‘चलो इक
बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों..
वो अफ़साना
जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन
उसे इक
ख़ूबसूरत मोड देकर छोडना अच्छा..’
अशा शब्दांत
इतर कुणीच नाही व्यक्त केलं ते.
शब्दांची
त्यांची निवड त्यांच्या साऱ्या पूर्वसूरी शायरांहून अगदी वेगळीच होती. त्यांच्या उपमा
आणि त्यांची रूपकंसुद्धा सर्वाहून वेगळीच होती.
‘पेडो
की शाख़ों पे सोई सोई चाँदनी
तेरे ख़यालों
में खोई खोई चाँदनी
और थोडी
देर में थक के लौट जाएगी
रात ये
बहार की फिर कभी न आएगी
दो एक
पल और है ये समाँ
सुन जा
दिल की दास्ताँ
ये रात
ये चाँदनी फिर कहाँ ..’
इतकं नाजूक,
हळुवार प्रतिमाविश्व साहिरच्या आगमनापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं कुणी. साहिरच्या शब्दांमध्ये,
त्याच्या शैलीमध्ये रोमान्स भरून राहिला होता. काठोकाठ रोमान्स. व्यथेला साहिरइतक्या
सुंदर आणि प्रभावी ढंगात कुणीच व्यक्त नव्हतं केलं. किती दाखले द्यावेत.
‘मेरे
ख़्वाबों के झरोखों को सजाने वाली
तेरे ख़्वाबों
में कहीं मेरा गुज़र है कि नहीं?’
**
‘रात सुनसान
थी, बोझल थीं फ़ज़ा की साँसें
रूह पर
छाए थे बे-नाम ग़मों के साए’
**
‘तुम अगर
मुझको न चाहो तो कोई बात नहीं
तुम किसी
और को चाहोगी तो मुश्किल होगी’
**
‘मैंने
शायद तुम्हें पहले भी कहीं देखा है’
एवढंच
नाही, तर साहिरची शब्दकळा जरी नेहमी उर्दूचीच होती, तरी ज्या ज्या वेळी त्यांनी हिंदी
शब्दकळेचा अवलंब केला तेव्हाही ती आपला एक आगळा बाज घेऊनच आली-
‘मन रे
तू काहे न धीर धरे?’
**
‘आज सजन
मोहे अंग लगा लो जनम सफल हो जाए
हृदय की
पीड़ा, देह की अगनी, सब शीतल हो जाए’
**
‘बस्ती
बस्ती परबत परबत गाता जाए बन्जारा
ले कर
दिल का इकतारा।’
खरंच,
साहिर लुधियानवी जादूगारच होते.
अनुवाद
: रेखा देशपांडे