रशियन लेखक रॉन कुरतुस यांचं एक पुस्तक आहे दि फाईव्ह क्वेशन फॉर चॅम्पियन. या पुस्तकांतील सर्वोत्कृष्टतेचे तत्त्वज्ञान मानवी जीवनाची पाच मुख्य क्षेत्रांत विभागणी करते.
चारित्र्य,
ज्ञान,
उत्कृष्टता,
मूल्य
आणि आरोग्य.
चारित्र्य,
ज्ञान,
उत्कृष्टता,
मूल्य
आणि आरोग्य.
(Character, Knowledge, Excellence, Value and Health)
परिपूर्ण समृद्ध जीवन जगण्यासाठी या पाचही क्षेत्रांत यशस्वी होणे आवश्यक आहे. आनंदी , परिपूर्ण व यशस्वी आयुष्याची सुरवात आपण दररोज स्वतःला पाच साधे प्रश्न विचारून करू शकतो.
परिपूर्ण समृद्ध जीवन जगण्यासाठी या पाचही क्षेत्रांत यशस्वी होणे आवश्यक आहे. आनंदी , परिपूर्ण व यशस्वी आयुष्याची सुरवात आपण दररोज स्वतःला पाच साधे प्रश्न विचारून करू शकतो.
१) आज मी कश्याबद्दल आभारी आहे? .
दिवसभरात कुणी कुणी माझा दिवस छान केला. छोट्या छोट्या गोष्टीची नोंद घ्या कृतज्ञता व्यक्त करा चारित्र्यवान म्हणजे प्रामाणिक, आदरणीय, आदर आणि कौतुक करणारा.
२) आज मी काय शिकलो ?
रोज हा प्रश्न स्वतःला विचारा , शिकणं कधीच संपत नाही. नवीन तंत्रज्ञाना पासून ते दैनंदिन व्यवहारात असंख्य नवीन कौश्यल्य शिकता यायला पाहिजेत.
३) आज मी कुठे चांगली कामगिरी केली ?
आजची माझी कामगिरी कशी झाली, कुठे सुधारली , कामात निपुणता येत आहे का ?
४) आज कोणासाठी मी उपयुक्त ठरलो?
दुस-यांना मदत केल्यानेच आपली उपयुक्तता वाढत असते. आज माझ्यामुळे कुणाला मदत झाली.
५) आज मी माझी काळजी कशी घेतली ?
स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वतःला निरोगी राहण्याचा प्रयत्न करणे. योग्य सवयी लावणे , लवकर उठणे, व्यायाम करणे , योग्य आहार घेणे.
जीवनाचा सारांश काढणारे हे पाच प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांची जाणते अजाणतेणे दिली गेलेली उत्तरे नक्कीच आपले जीवन सुधारू शकतील.
दररोज नियमित हे पाच प्रश्न स्वतःला विचारा , उत्तरं शोधा, तुमचा जीवनविषयक दृष्टिकोन बदलेल, जीवनाची परिपूर्ततेकडे वाटचाल सुरु होईल.
No comments:
Post a Comment