पूर्वेला उष:काल झाला आहे. नवीन दिवसाची सुरवात आहे. पवित्र एकमेव ध्येय,इच्छा घेऊन उडान भर. हारिल !
Sunday, 16 May 2021
चल , घे भरारी !
प्रबोधनमाला
व्याख्यानमाला २०२१ - निवडक प्रतिसाद
तिन्ही व्याख्याने सामाजिक जाणिवेची, आधुनिक
जगाची ओळख करून देणारी ,भविष्याचा वेध घेणारी,निस्वार्थ बुध्दीने समाजासाठी व देशासाठी कार्य करण्याची प्रोत्साहन देणारी ,विशेषतः
तरुणांना मार्गदर्शन करणारी होती.घरबसल्या व्याख्यान ऐकण्याची संधी दिल्याबद्दल संजीवनी
परिवाराचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.पुढील वाटचाली साठी संजीवनी परिवाराला शुभेच्छा.धन्यवाद!
श्री विश्वनाथ नाईक सोमाडी
अप्रतिम व्याख्याने
व तेवढ्याच ताकदीचे व्याख्याते. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांचे
अनुभवव कार्य पाहता आपण किती छोटे आहोत याचा प्रत्यय येतो.
श्री सुभाष भट्टे , सत्पाळा.
व्याख्यान हा आपला एक सुंदर उपक्रम आहे .दरवर्षी विषयांची विविधता
व नाविन्यता ही याही वर्षी होती.केळकर सरांचे आधुनिक तंत्रज्ञान ,अधिक कदम यांचे अतुलनीय
कार्य (खरं तर मराठी पाऊल पडते पुढे याचा सार्थ अभिमान वाटला).आणि अनिल काकोडकर यांचा
ग्रामीण व शहरी सेतू सारेच विषय छान होते वक्ते ही छान बोलले आणि श्रोत्यांची उपस्थिती
ही चांगली वाटली.
संजीवनी परिवाराचे आभार आणि कोणत्याही परिस्थितीत कार्यरत राहण्याच्या
तुमच्या मेहनतीला धन्यवाद!
सौ अनिता नाईक , वाघोली
तीनही व्याख्याने उत्तम झाली. संजीवनी परिवाराने नेहमीप्रमाणेच
विषय अनुरूप असे निवडले होते . सद्यस्थिती
वर्तमानआणि भविष्य यांची छान सांगड घातली गेली. तज्ञ व्याख्याते साधी राहणी आणि उच्च
विचारसरणी ,बरोबरच कृतीअसे होते. आधी केले आणि मग सांगितले, आदरणीय श्री. अधिक कदम
सर तर समर्पित जीवनप्रवास करीत आहेत.त्यांचे अनुभव ऐकतच राहावे असे वाटत होते. एका
वेगळ्या विश्वात आपण विहार करत होतो. इतक्या तरुण वयात त्यांनी ध्येयासक्तीचे परमोच्च शिखर गाठलेले आहे . त्यांच्या कार्याला तोड नाही
👌त्रिवार सलाम👏👏👏🌹🌹🌹आपल्या
संजीवनी परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼 पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा
👍
सौ भारती नाईक, कोफराड
फारच छान👌👌
पहिल्या व्याख्यानाची लिंक असेल तर पाठवा,काही
वैयक्तिक कारणांमुळे जॅाइन करु शकलो नाही.
श्री आशिष नाईक , साकोरे
संजीवनी परिवार,
आजच्या गुगल आणि यूट्यूब च्या जमान्यात
व्याख्यान ही गोष्ट, म्हटलं तर कालबाह्य होत चालली आहे. परंतु योग्य विषय व त्यावरील
वक्ता तसेच व्याख्यानाच्या निमित्ताने एकत्र येणे यातून बोधप्रद अशा अनेक गोष्टी मिळू
शकतात. सामाजिक संपर्क वाढल्याने विविध घटकांचे एक नेटवर्क तयार होते आणि सामाजिक बांधिलकीही
वाढते. ही गोष्ट युट्युब वर एकट्याने वक्त्याला ऐकणं किंवा बघणं यातून साध्य होऊ शकत
नाही. एक तासाचे व्याख्यान म्हणजे साधारण हे 200 पानं वाचून मिळेल एवढे ज्ञान असा एक
ठोकताळा. संजीवनी परिवार गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना
आपल्या भागात बोलावून बुद्धिजीवी वर्गाची भूक भागवण्याचं उत्तम कार्य करते आहे. त्याबद्दल
तुमचे कौतुक.
यावर्षीची पहिली दोन व्याख्याने मला ऐकता
आली तर काही व्यक्तिगत अडचणीमुळे डॉक्टर अनिल काकोडकर यांचं व्याख्यान मला जॉईन करता
आलं नाही. आयटी उद्योगात दहा एक वर्ष काम केल्यामुळे इंडस्ट्री 4.0 या विषयातील घडामोडींबद्दल
मला माहिती होती. डॉक्टर भूषण केळकर यांनी हा विषय सामान्यांसाठी बऱ्यापैकी सोपा करून
सांगितला. त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांवर वेगळे मत असू शकतं. त्यादिवशी आयटी
इंडस्ट्री मधले अनेक तरुणही सदर व्याख्यानाला जॉईन झाले होते. मला असं वाटतं अशा व्याख्यानांनंतर
काहीतरी प्रक्रिया सुरू व्हायला हवी. तरुणांना या विषयी काय वाटतं, होऊ घातलेला बदल
किती वास्तव आणि किती फुगा, या बदलातून आपल्या तरुणांसाठी काय नवीन संधी असू शकतात
या विषयी मंथन सुरू व्हायला हवे. मला खात्री आहे या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजबांधवांना
अजून जास्त माहिती असेल. ती माहिती action मध्ये कशी convert होईल यावर whatsapp ग्रुपवर
का होईना पण चर्चासत्रे व्हायला हवीत. व्यक्तिगत पातळीवर मला ब्लॉक चेन तंत्रज्ञानाबद्दल
शिकण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. या व्याख्यानानंतर मी IIT कानपूर च्या
Professor ची एक lecture series बघण्यास सुरुवात केली.
अधिक कदम यांचं कार्य अदभुत आहे. पेलेट
गनच्या छऱ्यातून आंधळे झालेल्या 1270 मुलांना परत दृष्टी मिळवून देणं काय, काश्मीर
सारख्या धगधगत्या प्रदेशात 300 अनाथ मुलींचं हॉस्टेल काय.. राष्ट्र, धर्म, राजकारण
या सर्व सीमा ओलांडून ते जे कार्य करतात त्याबाबत व्यक्त व्हायला माझ्याकडे शब्द नाहीत.
त्यांच्यासारख्या माणसाकडून स्फूर्ती घेऊन आपण निदान आपल्या गोतावळ्यातील, समाजातील
काहींच्या व्यथा कमी करता येतील तर प्रयत्न करावेत इतकेच.
तुम्ही फुल टॉस दिल्याने माझी प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणे लांबली आहे...जित्याची खोड...😊
श्री
राजेश नाईक, बोळींज,
०३.०५.२०२१.
खरोखरच खूप छान होती सगळी व्याख्याने
.
डॅा . केळकर यांनी झपाट्याने बदलत असणारे
तंत्रज्ञान युगासोबत आपण कसे स्वतःला त्याबरोबरीने समृध्द करतो हे खूप छान सांगितले
.
श्री. अधिक कदम यांच्या बद्दल अभिप्राय
देणे म्हणजे जणू काजव्याने सु्र्याची बरोबरी करणे ... शब्दच अपुरे पडतील .
डॅा. काकोडकर यांनी सांगितलेली “सिलेज
“ ही संकल्पना खुपच भावली मनाला, या संकल्पनेला अनुसरुन आपण आपल्या परिसरात काही करु
शकतो का असा विचार मी करीत आहे .
संजीवनी परिवाराचे खूप खूप धन्यवाद!
श्री मंगेश नाईक, गास.
पहीले दोन्ही व्याखान अतिशय सुरेख अभिप्राय
अगोदर दिला आहे
शेवटच (कालच) काही ऐकु शकलो नाही 🙏क्षमस्व
🙏
श्री विलास नाईक, भीटारे.
व्याख्यानं खुपच छान झाली ,काही अपेक्षा
तरी कळवा, धन्यवाद!
श्री राजाभाऊ नाईक, वावळी.
Aapanch tini lectures che marm
atishay changalya bhashet sangitale aahe.
Yapalikade aanakhi Kay sangnar. Practically first lecture aapalya students na
beneficial aahe. Ya fieldshi update asalelya Atharva sarkhya yuvakachya
madatine puna ekada recorded lecture
students na aikavayala harkat nahi.About second lecture, it is on Deshprem.
Aapala jiv dhokyat ghaloon Kashmir sarkhya thikani Ashram or school chalvanarya
Adhik Kadam na Salam. About third
lecture Dr Kakodkar --Aapalya mandalina kiti benefit gheta yeil he aatach
sangane kathin.
श्री वसंत जोशी , भुईगांव.
पहिल्या व्याख्यानातील तंत्रज्ञानामुळे
नोकरी/उद्योग व्यवसायवर होणार म्हणून निर्माण झालेला प्रश्न तिसऱ्या व्याख्यानाने नवतरुणांना
उद्योग/व्यवसायासाठीचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले आहे . तसेच दुसऱ्या व्याख्यानात
ईश्वरनिष्ठां/परस्पर विश्वासाचे मार्गदर्शन आहे असे मला वाटते.
श्री यशवंत पाटील,उमराळे.
पहिले व तिसरे व्याख्यान एक मेकांना पूरक
असे होते व तरुण पिढीला चांगले मार्गदर्शन
मिळाले असे वाटते. दुसरे व्याख्यान खरोखरच अचंबतीत करणारे व एखादी व्यक्ती व संस्था
किती अविश्वसनीय असे कार्य करू शकते याचे दर्शन
झाले. अश्या कार्याला आपण सर्वांनी जे काही शक्य आहे जसे की आर्थिक मदत तसेच अधिक कदमांनी सांगितले तसे त्या संस्थेतील
विद्यार्थांना आपल्या इथे उच्च शिक्षणासाठी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.
संजीवनी परिवार ने ह्या वर्षी देखील कारोना
च्या महामरित खूप सुंदर अशी व्याख्यान माला यशस्वी पणे आयोजित केली त्याबद्दल आपण सर्वांचे
हार्दिक अभिनंदन व आभार. 💐🙏🙏🙏
श्री मनोज नाईक, कोफराड.
Good
morning 🌹🙏
आपल्या
संजीवनी परिवारचे आभार
सर्वच
विषय छान होते वक्ते सुद्धा परीपुर्ण अभ्यासु
होते 👌
श्री जयेश नाईक, वटार.
खूपच
छान. ह्या कोरोना काळात यशस्वी पणे आयोजन केल्या
बद्दल संजीवनी परिवाराचे हार्दिक अभिनंदन.💐💐💐💐💐
श्री संजू नाईक, वटार.
सर्व
व्याख्यानाचे परीक्षण योग्य शब्दात केले आहे धन्यवाद!
श्री अनंत पाटील , भुईगांव.
तिन्ही
व्याख्याने अप्रतिम झाली.
श्री भगवान नाईक, सोमाडी.