श्री सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन 'अज्ञेय' हिंदीतील सुप्रसिद्ध साहित्यिक. त्यांना १९७८चा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त. त्यांची एक प्रसिद्ध कविता.
उड़ चल हारिल
उड़ चल हारिल लिये हाथ में
यही अकेला ओछा तिनका
उषा जाग उठी प्राची में
कैसी बाट भरोसा किन का!
शक्ति रहे तेरे हाथों में
छूट न जाय यह चाह सृजन की
शक्ति रहे तेरे हाथों में
रुक न जाय यह गति जीवन की!
ऊपर ऊपर ऊपर ऊपर
बढ़ा चीर चल दिग्मण्डल
अनथक पंखों की चोटों से
नभ में एक मचा दे हलचल!
तिनका तेरे हाथों में है
अमर एक रचना का साधन
तिनका तेरे पंजे में है
विधना के प्राणों का स्पंदन!
काँप न यद्यपि दसों दिशा में
तुझे शून्य नभ घेर रहा है
रुक न यद्यपि उपहास जगत का
तुझको पथ से हेर रहा है!
तू मिट्टी था किन्तु आज
मिट्टी को तूने बाँध लिया है
तू था सृष्टि किन्तु सृष्टा का
गुर तूने पहचान लिया है!
मिट्टी निश्चय है यथार्थ पर
क्या जीवन केवल मिट्टी है?
तू मिट्टी पर मिट्टी से
उठने की इच्छा किसने दी है?
आज उसी ऊर्ध्वंग ज्वाल का
तू है दुर्निवार हरकारा
दृढ़ ध्वज दण्ड बना यह तिनका
सूने पथ का एक सहारा!
मिट्टी से जो छीन लिया है
वह तज देना धर्म नहीं है
जीवन साधन की अवहेला
कर्मवीर का कर्म नहीं है!
तिनका पथ की धूल स्वयं तू
है अनंत की पावन धूली
किन्तु आज तूने नभ पथ में
क्षण में बद्ध अमरता छू ली!
ऊषा जाग उठी प्राची में
आवाहन यह नूतन दिन का
उड़ चल हारिल लिये हाथ में
एक अकेला पावन तिनका!
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ध्येय गाठण्याचा संदेश कवी
हारील पक्षाच्या माध्यमातून देतात.
पूर्वेला पहाट उगवली आहे. तू कोणाची वाट बघू नको ,कुणाच्या भरवश्यावर थांबू नको. तू उडान भर.
तुझ्या हातात शक्ती आहे. नवं निर्माणाची संधी सोडू नको , जीवनाची गती थांबू देऊ नको.
गगनमंडळ भेदत वर वर जा. अथक पंखाने आभाळ ढवळून काढ.
अमर सृष्टीचं साधन तुझ्या बाहुत आहेत , जीवन स्पंदन तुझ्या मनगटात आहेत.
दशदिशांनी तुला घेरलं तरी घाबरू नको , जगाच्या उपहासामुळे आपल्या मार्गापासून ढळू नको.
तू माती होतास परंतु मातीला आकार दिला आहेस. तू सृष्टी चा एका भाग होतास परंतु तुझी ओळख निर्माण केली आहेस.
माती वास्तविक स्थिर निश्चल आहे. जीवन काय फक्त माती, निश्चल, स्थिर आहे का ? माती मधून नवनिर्मिंती करण्याची इच्छा कोणी दिली?
उज्वल प्रवासाचा तू अज्ञात धावपटू आहेस. तुझी इच्छाशक्ती ध्वजदंड बनून एकाकी मार्गाचा आधार बनली आहे.
माती पासून जे घेतलं आहे त्याचा त्याग करणे धर्माला धरून होणार नाही. जीवन साधनेची अवहेलना कर्मवीर करत नसतो. .
स्वतः धुळीचा कण आहेस परंतु भूमी पवित्र आणि अनंतकाळ आहे. आज तू आकाश गाठलं आहेस, क्षणात अमरत्वाला स्पर्श केला आहेस.
पूर्वेला उष:काल झाला आहे. नवीन दिवसाची सुरवात आहे. पवित्र एकमेव ध्येय,इच्छा घेऊन उडान भर. हारिल !
No comments:
Post a Comment