Tuesday, 26 October 2021

"कृतज्ञता"

 

कृतज्ञता

 मेलोडी बीटीची खालील वाक्य  प्रभावित करतात 

 

"कृतज्ञता जीवनात परिपूर्णता आणते. समाधानी बनवते, हव्यास सुटतो. नकाराचं होकारात रूपांतर करते. गोंधळ ,गडबडीत सुसूत्रता निर्माण करते. द्विधा अवस्था नाहीशी करून  लक्खपणा आणते,    साध्या जेवणाचं  रूपांतर   पंचपक्वांनाच्या  मेजवानी होऊन जाते. .घराला घरपण आणते. आणि आपपर भाव निघून आपलेपणा जोपासते. 

 

जीवनात कृतज्ञता नसेल तर स्वर्गाचा  नरक होऊन जाईल.   

जीवनात खूप विपुलता असेल परंतु   कृतज्ञता नसेल तर भरल्यापोटी ही तुम्हाला उपाशी आहोत असं वाटेल
कृतज्ञता नसेल तर

 कोणताही काम आनंद देणार नाही, कामाचं समाधान मिळणार नाही.  

प्रत्येक सहका-यात त्रुटी दिसतील, सर्व  मित्रांवर नाराजी असेल ,प्रत्येक घरातील चुका दिसतील.  प्रत्येक भेटवस्तूतील कमतरताच दिसेल. प्रत्येक कादंबरी मुद्रण  दोषांनी भरलेली दिसेल. कोणतीच गादी झोपण्यायोग्य वाटणार नाही. आणि कॉफीचा पेला नेहमीच फिक्का वाटेल. कृतज्ञतेशिवाय घेतलेला कोणताही निर्णय कायमचाच चुकीचा वाटेल. 


 कृतज्ञतेची जाणीव नसल्यास ,प्रत्येक गोष्टीविषयी तक्रारी असतील 

उन्हाळा गरम   खूप थंडी, संगीत म्हणजे धांगडधींगा सिनेमे म्हणजे वेळेचा अपव्यय व  किशोरवयीन मुलं नेहमीच उद्धट वाटतील.

 

कृतज्ञतेशिवाय वेगळ्या मताची ,वेगळ्या पंथाची माणसं तुम्हाला शत्रू वाटतील 

परिवारा विषयी कृतज्ञता नसेल तर   चुकीच्या कुटुंबात जन्माला आलो आहोत असं वाटत राहील. 

मिळणा-या , प्राप्त होणा-या गोष्टी विषयी कृतज्ञता नसेल तर. वेटर खूप वेळ घेतो , रस्त्यावरील प्रत्येक चालक मूर्ख आहे. गाडी चालवता येत नाही. गाडी बस मध्ये मिळालेली  खिडकी जवळीची जागा ही चुकीची वाटेल. 

 

 कृतज्ञते शिवाय जीवन यातनामय आहे. 

 

" कृतज्ञता "  ही जीवनात किमया घडवणारी किमयागार आहे. 

No comments:

Post a Comment