यमनौत्री, गंगोत्री केदारनाथ और बद्रीनाथ तिर्थक्षेत्र.
१३ ऑक्टोबर २०२३ ते २५ ऑक्टोबर २०२३
उत्तराखंड मधील यमनोत्री, गंगोत्री,
केदारनाथ आणि बद्रिनाथ छोटी चारधाम यात्रा .
हरिद्वार पासून छोट्या चारधामची सुरवात. हरिद्वार ला
गंगाद्वार ही म्हटलं जातं कारण गंगोत्री पासुन उगम पावलेली गंगा हरिद्वार येथे
सपाट प्रदेशात येते.
हरिद्वार मधील हरिची पौडी,पायरी हा गंगा नदीवरील प्रसिद्ध घाट. तेथे सकाळ, संध्याकाळ गंगेच्या किनारी आरती होते ती
गंगाआरती.
हरिद्वार, हरिची पौडी,पायरी. प्रसिद्ध घाट. गंगाआरती
यमनोत्री :
यमुना नदिचं उगमस्थान. उत्तराखंड राज्याच्या
उत्तरकाशी जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून ३,२९३ मीटर (१०,८०४
फूट) उंचीवरील ठिकाण. नदीचा खरा उगम अंदाजे
४,४२१ मीटर (१४,५०५ फूट) उंचीवर बर्फाच्छादित
ठिकाणी होतो.
हरिद्वार पासून सियानचट्टी 220किमी, सियानचट्टी पासून
जानकीचट्टी 16 किमी. जानकीचट्टी पासुन 6.5 किमी. उंचीवर यमुनोत्री. पाडाव किंवा
राहण्याच्या ठिकाणाला स्थानिक भाषेत चट्टी म्हटलं जातं.
यमुनामाते च्या मंदिरात काळ्या पत्थाराची मूर्ती आहे.
शेजारी गंगामातेची मूर्ती आहे. मंदिराच्या सभोवती गरम पाण्याचे झरे आहेत.
सुर्यकुंड आणि गौरीकुंड आहेत. सुर्यकुंडात पोतडीत तांदुळ,बटाटा बांधुन
शिजवतात,प्रसाद
करतात. गौरीकुंडातील पाण्यात स्नान करतात .
हवामान क्षणोक्षणी बदलत असतं
थंड वारे अंगाला झोंबतात, त्यात पाऊस येतो,सुखद उन्ह अल्हाददायक वाटते.
यमुना
मंदिर, बर्फाच्छादित पर्वतावरून येणारा यमुनेचा प्रवाह.
मंदिरातील यमुना गंगा मातेच्या मूर्ती
उत्तरकाशी : ऋषिकेश-गंगोत्री मार्गावर भगवान काशी विश्वनाथ
मंदिर. शिवाचं स्थान.मंदिराच्या आवारात असलेल्या शक्तीमंदिरात भव्य त्रिशूळ आहे, शेजारी हनुमान मंदिर आहे.
काशी विश्वनाथ
मंदिर, उत्तरकाशी.
गंगोत्री मंदिर" हे उत्तरकाशी जिल्ह्यापासून १०० किमी अंतरावर
आहे. भगीरथाच्या तपस्येने गंगा पृथ्वीवर
अवतरली ती जागा गंगोत्री तीर्थ. गंगा नदीचे उगमस्थान.
हिमालयाच्या रांगेत ३१०० मीटर (१०,२०० फूट) उंचीवर
आहे. येथे गंगेचे मंदिर आणि सूर्य, विष्णू आणि ब्रह्मकुंड
सारखी पवित्र स्थाने आहेत.
"गौमुख" गंगोत्रीपासून १९
किमी अंतरावर, समुद्रसपाटीपासून सुमारे ३,८९२ मीटर (12769 फिट) उंचीवर आहे. हे गंगोत्री
हिमनदीचे मुख आणि भागीरथी नदीचे उगमस्थान आहे.
शंकराचार्यांनी या ठिकाणी गंगादेवीची मूर्ती स्थापन
केली होती.
गोमुखी ला उगम पावते तेव्हा भागीरथी. देवप्रयागला भागीरथी व अलकनंदा चा संगम होतो तेव्हा ती गंगा होते.
गोमुख –
गंगा प्रवाह गंगादेवीची
मूर्ती गंगामातेचं
संगमरवरी मंदिर
केदारनाथ मंदिर मंदाकिनी नदीच्या काठावर आहे. हिमालय पर्वतामध्ये असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली, मंदिरात पांडवांच्या मुर्ती आहेत,तर मंदिरामागे भव्य भिमशिळा आहे. पुढे आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले.
केदारनाथ मंदिराचे स्थापत्य प्राचीन भारतीय
मंदिर-बांधणी तंत्र , विशिष्ट उत्तर भारतीय मंदिर
शैलीचे दर्शन घडवते,दगडी कोरीव काम आणि उत्कृष्ट कारागिरी
द्वारे वैशिष्ट्यीकृत. मोठे दगडी स्लॅब वापरून बांधलेले, हे
मंदिर समुद्रसपाटीपासून अंदाजे ३,५८३ मीटर (११,७५५ फूट) उंचीवर उभे आहे, ज्यामुळे ते जगातील
सर्वोच्च शिव मंदिरांपैकी एक आहे.
केदारनाथ मंदिर हे श्रद्धा, भक्ती आणि
लवचिकतेचे प्रतीक आहे.
टोकाच्या नैसर्गिक परिस्थितीत
"केदारनाथ मंदिर" हजारो भक्त, यात्रेकरू आणि आध्यात्मिक
साधकांचे श्रद्धास्थान आहे.
केदारनाथ
मंदिर केदारनाथ मंदिरामागील भीमशिळा
गुप्तकाशी तील प्राचीन विश्वनाथ मंदिर, अर्धनारेश्वर
मंदिर आणि मणिकर्णिक कुंड, जिथे गंगा आणि यमुनेच्या दोन
प्रवाहांचा संगम होतो असे मानले जाते.
मणिकर्णिका कुंड आणि
गंगा, यमुनेचा प्रवाह.
हिवाळ्यात केदारनाथ मंदिर बंद असते. तेव्हा
केदारनाथची पूजा उषामठातील ओमकारेश्वर
मंदिरात होत असते.
उषामठ ओमकारेश्वर मंदिर
तुंगनाथ : तुंगनाथ हे जगातील सर्वोच्च शिवमंदिरांपैकी एक आहे. भारताच्या उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेल्या पाच पंच केदार मंदिरांपैकी सर्वात उंच मंदिर आहे. तुंगनाथ पर्वत मंदाकिनी आणि अलकनंदा नदीच्या खोऱ्यात आहे. उंची: ३६८० मी (१२०७३ फूट)
जोशीमठ नृसिंह मंदिर
बद्रीनाथ मंदिरच बद्रीनाथ
धाम म्हणून ओळखले जाते. भारतातील चारधाम पैकी एक मंदिर. उत्तराखंडमधील चमोली
जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. अलकनंदा नदीच्या डाव्या
किनाऱ्यावरील नर आणि नारायण पर्वतरांगांच्या मध्यभागी निळकंठ पर्वतावर वसले आहे.
हे मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे ३१३३ मीटर , १०२७८ फुट. उंचीवर आहे.
मंदिर परिसरात श्री लक्ष्मी, आचार्य
शंकराचार्य, श्री हनुमान, नर
नारायण, क्षेत्रपाल आदि मंदिरं आहेत. गरम पाण्याची कुंड आहेत. तापमान उणे दोन सेंटीग्रेड होतं.
श्री बद्रीनारायण
श्री
बद्रीनाथ मंदिर परिसर , गरम पाण्याची कुंड
आचार्य शंकराचार्य, क्षेत्रपाल नर नारायण
श्री
हनुमान श्री
लक्ष्मी
माणा गांव हिमालया च्या कुशीत वसलेलं सुंदर गाव.
समुद्र सपाटीपासून 19,000 फुटावर भारत आणि तिबेट सीमेवर आहे.
पांडवांनी याच मार्गावरून स्वर्गारोहण केलं असं
सांगतात,वाटेत पुल आहे त्याला भिमपुल
म्हणतात.
सरस्वती नदी लुप्त झाली आहे. परंतू
माणा गावाच्या उंच पहाडावरुन पाण्याचा प्रवाह येतो,पुढे तो
अलकनंदा नदीला मिळते.
यालाच सरस्वती नदीचं उगमस्थान मानतात.
या गावात दोन गुंफा आहेत. व्यास गुंफा आणि व्यास
गुंफा. महाभारत व्यासांनी सांगितले आणि गणेश नी लिहून घेतलं अशी कथा आहे.
सरस्वती नदी मंदिर उगमस्थान
व्यास गुंफा गणेश गुंफा
गढवाल
विभागात श्रीनगर आणि रुद्रप्रयाग मार्गावर अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर ,नदिच्या
मध्ये धारी देवीचं मंदिर आहे. काली देवीचं रुप मानलं जाते. देवी चारधाम ची
रक्षणकर्ती अशी श्रध्दा आहे. मंदिरातील मुर्ती सकाळी कन्या दुपारी युवती आणि
संध्याकाळी म्हातारीचं रुपात दिसते.
धारी देवीचं मंदिर
रुद्रप्रयाग केदारनाथ वरून येणारी मंदाकिनी नदी आणि बद्रीनाथ धाम वरून येणारी अलकनंदा नदीचा
संगम रुद्रप्रयाग येथे होतो. दोन्ही नदीचा प्रवाहाचं स्पष्ट दर्शन होतं. गढूळ पाणी
दिसतो ती अलकनंदा तर स्फटिका सारखी दिसणारी मंदाकिनी.
मनसादेवी
No comments:
Post a Comment