Wednesday, 26 November 2025

पराभव : खलील जिब्रान

 

 

तत्त्वज्ञ कवी, खलील जिब्रान (1883–1931) हे लेबनीज-अमेरिकन कवी, तत्त्वज्ञ, कलाकार आणि विचारवंत. जगभरातील वाचकांमध्ये ते त्यांच्या अध्यात्मपूर्ण, तत्त्वचिंतनात्मक लिखाणासाठी  प्रसिद्ध आहेत. त्यांची पराभव ही कविता, अंतर्मुख करते आपल्याला.

पराभव : खलील जिब्रान

पराभवा, माझ्या पराभवा — माझा एकांत आणि माझी अलिप्तता;
तू मला हजार विजया पेक्षा अधिक प्रिय आहेस;
आणि जगातील सर्व कीर्तिपेक्षा माझ्या हृदयाला अधिक प्रिय  आहेस.

 

पराभवा, माझ्या पराभवा — माझे आत्मज्ञान आणि माझा विरोधा भास ;
तुझ्यामुळे मला कळते की मी अजूनही तरुण आहे आणि चपळ आहे;
आणि  क्षणिक गौरवात अडकून पडण्यासाठी नाही.
आणि तुझ्यात मला मी सापडला आहे;
आणि तुच्छ  आणि टाळले जाण्यातील आनंदही.  

 

पराभवा, माझ्या पराभवा — माझी तळपणारी तलवार आणि ढाल;
तुझ्या डोळ्यांत मी जाणले आहे —
की मानसन्मान म्हणजे गुलामी आहे;
आणि समजून घेणे म्हणजे समान पातळीवर खाली आणणे;
आणि आकलन होणे म्हणजे केवळ परिपक्व होणे.
आणि पक्व  फळाप्रमाणे पडून खाल्ले जाणे.

 

पराभवा, माझ्या पराभवा — माझा धाडसी सोबती;
तू माझे गाणे, माझे रडणे आणि माझे  मौन  — हे सर्व ऐकशील;
आणि फक्त तूच मला सांगशील
पंखांची फडफड, समुद्राची गाज,
आणि रात्री पर्वतांवर लागणाऱ्या वणव्याची  भाषा;
आणि तूच घेशील माझ्या अंतर्मुख, खोल आत्म्याचा शोध.
 
पराभवा, माझ्या पराभवा — माझे अमर धैर्य;
तू आणि मी वादळाशी हसत सामना करू;
आणि आपल्यात जे काही मरते त्यासाठी आपण दोघे मिळून थडगी खणू;
आणि आपल्यात जे काही मरते त्यासाठी आपण दोघे मिळून थडगी खणू;
आणि आपण सूर्यप्रकाशात इच्छाशक्ती घेऊन उभे राहू,
आणि आपण धोकादायक (परिवर्तन करण्याइतके सामर्थ्यवान) होऊ.
 

 

 

 

Defeat

by Kahlil Gibran

Defeat, my Defeat, my solitude and my aloofness;
You are dearer to me than a thousand triumphs,
And sweeter to my heart than all world-glory.

Defeat, my Defeat, my self-knowledge and my defiance,
Through you I know that I am yet young and swift of foot
And not to be trapped by withering laurels.
And in you I have found aloneness
And the joy of being shunned and scorned.

Defeat, my Defeat, my shining sword and shield,
In your eyes I have read
That to be enthroned is to be enslaved,
And to be understood is to be leveled down,
And to be grasped is but to reach one’s fullness
And like a ripe fruit to fall and be consumed.

Defeat, my Defeat, my bold companion,
You shall hear my songs and my cries and my silences,
And none but you shall speak to me of the beating of wings,
And urging of seas,
And of mountains that burn in the night,
And you alone shall climb my steep and rocky soul.

Defeat, my Defeat, my deathless courage,
You and I shall laugh together with the storm,
And together we shall dig graves for all that die in us,
And we shall stand in the sun with a will,
And we shall be dangerous


Friday, 21 November 2025

Prompt Engineering.

 

कृत्रिम बुद्धिमत्तेला (AI)  भावना कळत नाहीत. आपण बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला तर म्हणतो भावना पोहचल्या. AI किंवा ChatGPT ला योग्य आणि नेमका प्रश्न विचारला नाही तर चुकीचे, अयोग्य उत्तर मिळेल.  भावना समजून ते उत्तर देणार नाही.

AI (ChatGPT) ला योग्य, नेमके, स्पष्ट आणि परिणामकारक उत्तर मिळावे म्हणून विचारलेला प्रश्न किंवा करायची सूचना (prompt) प्रभावीपणे तयार करणे म्हणजेच Prompt Engineering.  

AI ला प्रश्न विचारणे ही फक्त प्रश्न विचारण्याची गोष्ट नसून, ती खूप नेमकी, तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण पद्धत आहे. एक “डिझाइन” करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे याला Engineering (अभियांत्रिकी) असे म्हटले जाते. Prompt Engineering  

 AI कश्या प्रकारे विचार करते हे समजून प्रश्न विचारावे लागतात. प्रश्नाच्या बाबतीत अनेक गोष्टी स्पष्टपणे नमूद कराव्या  लागतात, संदर्भ, मर्यादा, उत्तर कश्या प्रकारे हवं आहे, अपेक्षित काय आहे, विचार साखळी इत्यादि. ही प्रक्रिया इंजिनियरीग सारखी आहे.

प्रश्न पडणे, प्रश्न विचारणे ही ज्ञान प्राप्तीची सुरवात आहे.

नेमका, योग्य आणि फलदायी प्रश्न कसा विचारावा” याबद्दल भारतीय तत्त्वज्ञानात स्पष्ट मार्गदर्शन आढळते.  विशेषतः न्यायशास्त्र, उपनिषदं, आणि भगवद्गीता यांत याचे सुंदर सूत्रे आहेत.

तैत्तिरीय उपनिषद म्हणते  आचार्यं प्रश्नान् पृच्छेत्”।   ज्ञान प्राप्त करण्यासाठी आचार्यांना नीट, विनम्रतेने आणि योग्य प्रश्न विचार.

न्यायसूत्रातील प्रश्नशास्त्र (न्याय दर्शन)-   प्रश्न विचारण्याची स्पष्ट पद्धत सांगते.   न्यायानुसार योग्य प्रश्नात पाच गोष्टी असाव्यात:

प्रश्नः स्पष्टःप्रश्न स्पष्ट हवा

अर्थवतःअर्थपूर्ण, मुद्देसूद हवा

अनवगाढःअतिशय गुंतागुंतीचा नसावा

अप्रमत्तःमन एकाग्र असावे

संशयपूर्वकःजिथे खरी  शंका असते तिथेच प्रश्न करावा.

 

भगवद गीता चवथ्या अध्यायात सांगते.  ज्ञानासारखे पवित्र काही नाही, आणि ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न हा मुख्य मार्ग.

 

भारतीय तत्वज्ञानात योग्य प्रश्न” कसा असावा याची सूत्ररूप व्याख्या दिली आहे.  स्पष्टो, सुविचारितो, हेतुसंबद्धः प्रश्नः हितकरः” म्हणजेच  स्पष्ट, विचारपूर्वक, आणि हेतुसूचक प्रश्नच हितकारक असतो.

 

 

ह्याच प्रक्रियेला आजच्या भाषेत  Prompt Engineering म्हणतात.

 

अथातो ब्रह्मजिज्ञासा म्हणजे सर्वोच्च, निराकार, सर्वव्यापी सत्य जाणून घ्यायची जिज्ञासा, इच्छा .

Wednesday, 12 November 2025

शोध प्रकाशयात्रेचा

 शोध प्रकाशयात्रेचा

काष्ठं, संगमरवर, तार शिल्पंकृतींचे प्रदर्शन, नुकतंच संपन्न झालं.

जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई
४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२५
सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वसई, वाघोली येथील प्रसिद्ध शिल्पकार श्री सचिन चौधरी यांच जहांगीर आर्ट गॅलरीतलं सहावं एकल प्रदर्शन.
शोध प्रकाशयात्रेचा , प्रवास कलेचा, कृतज्ञतेचे भावनेने केलाला अंतरीच्या दिव्याचा शोध , शोध आत्मप्रकाशचा. परम पूजनीय पांडुरंगशास्त्रीजिंच्या शिकवणीचा प्रभाव दर्शविणार प्रदर्शन. त्यांनी आपल्या सर्जनशील प्रवासाला प्रेरणा देणा-या काही श्लोकाचा उल्लेख केला आहे. त्याचा भावार्थ,
ईश्वर पूर्ण आहे विश्व पूर्ण आहे त्यातून निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट पूर्ण आहे,
भारत भूमीत मनुष्य जन्म मिळणे दुर्लभ आहे,
मनुष्याच्या बांधनाचे आणि मुक्तीचे कारण मन आहे,
जन्म,मृत्यू, जरा व्याधी याचे सतत चिंतन कर,
मन, बुध्दी आपले मित्र आणि शत्रू आहेत, विवेक बुध्दीने स्वत:चा उद्धार करा,
भगवान आपल्या हृदयात वास करीत आहे,
तुम्ही अमृताचे पुत्र आहात.
मुग्धपणे दर्शकाला प्रकाशित करणा-या कलाकृती.






सर्जनशील शिल्पविष्कारा मागील शिल्पकार सचिन चौधरी यांनी नमूद केलेले विचार आणि प्रेरणा

 ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥  ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


हे (ईश्वर) पूर्ण आहे
, ते (विश्व) सुद्धा पूर्ण आहे. त्या पूर्णातून हे पूर्ण प्रकट झाले. त्या पूर्णातून पूर्ण काढले तरी उरते तेही पूर्णच राहते."

जन्तूनां नरजन्म दुर्लभमिदं तत्रापि पुंसत्त्वं ततः विप्रत्वं तस्माद्वेदपाठश्रुतमहो धर्मोऽपि तस्मात्परः ।

आत्मानात्मविवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिः मुक्तिर्नो शतकोटिजन्मसुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते ॥  (विवेकचूडामणि २–३)

सर्व जंतूंपैकी (जीवांत) मनुष्यजन्म अत्यंत दुर्लभ आहे. त्या मनुष्यजन्मातही —पुरुषत्व,त्याहूनही ब्राह्मणत्व,त्याहूनही वेदाध्ययन आणि धर्माचरण,आणि त्याहून सर्वोच्च म्हणजे आत्म–अनात्म विवेक, स्वानुभव, आणि ब्रह्मात्‍मभावात स्थिती ही सर्व मिळविणे शतकोटी जन्मांच्या पुण्यकर्मांशिवाय अशक्य आहे.

दुर्लभं भारतजन्मं, तस्माद्विप्रत्वं, तस्माद्वेदज्ञानम्। तस्मादात्मानुभूतीः, तस्मान्मोक्षः॥

भारतभूमीत जन्म मिळणेहे अत्यंत दुर्लभ आहे, कारण ही धर्म, योग, तप, ज्ञान आणि मुक्तीची भूमी आहे. त्यात ब्राह्मणत्व (सत्कर्म, सद्विवेक, सदाचार युक्त जीवन) मिळणे त्याहून श्रेष्ठ. त्याहूनही उच्च म्हणजे वेदज्ञान आणि आत्मानुभव प्राप्त करणे. आणि अखेरीस त्या ज्ञानातून मोक्ष (मुक्ती) मिळविणे — हेच अंतिम ध्येय.

सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर् ज्ञानमपोहनं च । वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यः वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥

मी (भगवान) सर्वांच्या हृदयात वास करणारा आहे. माझ्याकडूनच स्मरण (स्मृती), ज्ञान, आणि विस्मरण (अपोहन) हे सर्व उत्पन्न होते. सर्व वेदांद्वारे मीच जाणण्यास पात्र आहे; मीच वेदांचा कर्ता आणि जाणणारा (वेदविद्) आहे.

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥ (भगवद्गीता ६.५)

मनुष्याने स्वतःच्या आत्म्याने (बुद्धी, विवेकशक्तीने  स्वतःचाच उद्धार करावा; स्वतःचं पतन (खाली ओढणे) करू नये. कारण स्वतःच आत्मा (मन, बुद्धी) हा स्वतःचाच मित्र देखील आहे, आणि स्वतःचाच शत्रू सुद्धा आहे.

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ (भगवद्गीता ४.११)

हे पार्था (अर्जुना),जे जसे माझ्या शरण येतात, त्यांना मी तसाच प्रतिसाद देतो. सर्व प्रकारचे मनुष्य माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात.

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् । आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च । जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥

जन्म, मृत्यू, जरा (वृद्धापकाळ) आणि व्याधी (रोग) यांमधील दुःखरूप दोषांचे सतत चिंतन करणे, म्हणजेच या दुःखांच्या स्वरूपाचे ज्ञान ठेवणे ही देखील ज्ञानाची (आध्यात्मिक विवेकाची) एक लक्षण आहे.

श्रुण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः ।   (श्वेताश्वतर उपनिषद् – अध्याय २, मंत्र ५)

हे सर्व अमृताचे पुत्रांनो, हे विश्वातील जीवांनो — ऐका!” तुम्ही मर्त्य नाही, तुम्ही अमृतस्वरूप (अविनाशी आत्मा) आहात.

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः। बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम्॥

मनुष्यांच्या बंधन आणि मुक्तीचे कारण मनच आहे. जेव्हा मन विषयांमध्ये (इंद्रियसुखात) आसक्त होते, तेव्हा ते बंधनाचे कारण बनते; आणि जेव्हा ते विषयांपासून विरक्त होते, तेव्हा ते मुक्तीचे कारण बनते.

 







Tuesday, 11 November 2025

नेक्सस : माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास

 

नेक्सस : माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास — अश्मयुगापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत. (शोध प्रकाशाचा प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा घेतलेले पुस्तक)

यूव्हाल नोआ हरारी (Yuval Noah Harari) इस्त्रायली (Israeli) इतिहासकार, लेखक, विचारवंत, हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेम प्राध्यापक म्हणून काम, मानवजातीचा इतिहास, लष्करी तंत्रज्ञान, माहिती आणि चेतना हे अभ्यास आणि संशोधना चे विषय. त्यांची अनेक पुस्तक जगभर प्रसिध्द आहेत  त्यातील काही महत्वाची पुस्तकं

  • सेपियन्स मानवजातीचा संक्षिप्त इतिहास
  •  भविष्यातील मानवजातीचा प्रवास 
  • २१व्या शतकातील २१ धडे   
  • नेक्सस : माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास — अश्मयुगापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत.

नेक्सस : माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास  हे त्यांच नवं पुस्तक या पुस्तकात ते काही प्रश्न उपस्थित करतात.

मानव जातीला होमो सेपियन्स  (Home Sapiens) म्हणजे शहाणी मानवजात म्हटलं जाते. ते विचारतात आपण या प्रमाणे वागतो का?

पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते काही प्रश्न आपल्या पुढे ठेवतात.

 

आपण इतके बुद्धिमान आहोत, तरीही इतके आत्मघाती का आहोत?”
आपण विज्ञान, औद्योगिक क्रांती, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या अद्भुत गोष्टी निर्माण केल्या; तरीही आपण पर्यावरण नष्ट करतो, युद्धे करतो, तंत्रज्ञानाचा गैरवापर करतो — हे का?

आपल्याकडे इतकी माहिती असूनही आपण इतके गोंधळलेले का आहोत?”
इंटरनेट युगात माहिती विपुल आहे, पण सत्य आणि असत्य यातील फरक ओळखण्याची क्षमता हरवते आहे.  माहितीचा अतिरेक हा ज्ञान नव्हे, तर भ्रम निर्माण करतो. गोंधळवून टाकतो.

आपण इतके जोडले गेलो आहोत, तरीही इतके एकाकी का आहोत?”
सोशल नेटवर्क्स, डिजिटल संपर्क असूनही मानवी मन भावनिकदृष्ट्या अधिक एकटे पडले आहे. म्हणजेच “connection” वाढली, पण “understanding” कमी झाली.

आपण जगावर इतके नियंत्रण ठेवतो, तरीही स्वतःवर नियंत्रण का ठेवू शकत नाही?”
मानवाने अणुशक्ती, जैवतंत्रज्ञान, AI यांवर प्रभुत्व मिळवले.  पण राग, लोभ, मत्सर, स्वार्थ या मानसिक शक्तींवर विजय मिळवू शकला नाही.

 

त्यांनी उत्पन्न केलेले प्रश्न भिडतात ना ! त्यांच्या इतर पुस्तकाविषयी पुन्हाकधीतरी.