कृत्रिम बुद्धिमत्तेला (AI) भावना कळत नाहीत. आपण बोलताना एखादा शब्द चुकीचा
गेला तर म्हणतो भावना पोहचल्या. AI किंवा ChatGPT ला योग्य आणि नेमका प्रश्न विचारला नाही तर चुकीचे, अयोग्य उत्तर मिळेल. भावना समजून ते उत्तर देणार नाही.
AI (ChatGPT) ला योग्य, नेमके, स्पष्ट आणि
परिणामकारक उत्तर मिळावे म्हणून विचारलेला प्रश्न किंवा करायची सूचना (prompt)
प्रभावीपणे तयार करणे म्हणजेच Prompt Engineering.
AI ला प्रश्न
विचारणे ही फक्त प्रश्न विचारण्याची गोष्ट नसून, ती खूप
नेमकी, तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण पद्धत आहे. एक “डिझाइन”
करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे याला Engineering (अभियांत्रिकी)
असे म्हटले जाते. Prompt
Engineering
AI कश्या प्रकारे विचार करते हे समजून प्रश्न विचारावे
लागतात. प्रश्नाच्या बाबतीत अनेक गोष्टी स्पष्टपणे नमूद कराव्या लागतात, संदर्भ, मर्यादा, उत्तर कश्या प्रकारे
हवं आहे, अपेक्षित काय आहे, विचार साखळी इत्यादि. ही प्रक्रिया
इंजिनियरीग सारखी आहे.
प्रश्न पडणे, प्रश्न विचारणे
ही ज्ञान प्राप्तीची सुरवात आहे.
नेमका, योग्य आणि फलदायी प्रश्न
कसा विचारावा”
याबद्दल भारतीय तत्त्वज्ञानात स्पष्ट
मार्गदर्शन आढळते. विशेषतः न्यायशास्त्र, उपनिषदं, आणि भगवद्गीता यांत याचे सुंदर सूत्रे आहेत.
तैत्तिरीय उपनिषद म्हणते आचार्यं प्रश्नान्
पृच्छेत्”। ज्ञान प्राप्त करण्यासाठी
आचार्यांना नीट, विनम्रतेने आणि योग्य प्रश्न विचार.
न्यायसूत्रातील प्रश्नशास्त्र (न्याय दर्शन)- प्रश्न विचारण्याची स्पष्ट पद्धत सांगते. न्यायानुसार योग्य प्रश्नात पाच गोष्टी असाव्यात:
प्रश्नः
स्पष्टः — प्रश्न स्पष्ट हवा
अर्थवतः — अर्थपूर्ण, मुद्देसूद हवा
अनवगाढः — अतिशय गुंतागुंतीचा
नसावा
अप्रमत्तः — मन एकाग्र असावे
संशयपूर्वकः — जिथे खरी शंका असते तिथेच प्रश्न करावा.
भगवद गीता चवथ्या अध्यायात सांगते. ज्ञानासारखे पवित्र काही नाही, आणि ज्ञान मिळवण्यासाठी
प्रश्न हा मुख्य मार्ग.
भारतीय तत्वज्ञानात योग्य प्रश्न” कसा असावा याची सूत्ररूप
व्याख्या दिली आहे. “स्पष्टो, सुविचारितो,
हेतुसंबद्धः प्रश्नः हितकरः” म्हणजेच स्पष्ट, विचारपूर्वक, आणि हेतुसूचक प्रश्नच हितकारक असतो.
ह्याच प्रक्रियेला आजच्या भाषेत Prompt Engineering म्हणतात.
अथातो ब्रह्मजिज्ञासा म्हणजे सर्वोच्च, निराकार, सर्वव्यापी सत्य जाणून घ्यायची जिज्ञासा, इच्छा .
No comments:
Post a Comment