Wednesday, 7 December 2011

विद्यार्थी पालक मेळावा

दिनांक ४ डिसेंबर ची    एक अफलातून प्रसन्नतेची ,निरामय आनंदाची, आपल्यातील  इश्वरी चैतन्याची जाणीव करून देणारी सकाळ.  निमित्त होतं. संजीवनी परिवारानी  भाउसाहेब वर्तक  विद्यामंदिरात आयोजित केलेला विद्यार्थी पालक मेळावा. मंथन अंतर्गत चर्चेनंतर चा हा दूसरा मेळावा. मेळाव्यात मार्गदर्शन  करण्यासाठी उपस्थित होते श्री संदीपकुमार सालुंखे सर, सहायक आयकर  उपायुक्त, पुणे . एकेकाळी रस्त्यावरील शे गोळा करून  गोवर्‍या  रचणारा   ग्रामीण युवक  ते यशस्वी आयकर उपायुक्त. १९९२ च्या SSC परीक्षेत ते पुण्या बोर्डातून पाहिले आले. ९४ ला HSC सायन्स  ला  पुणे बोर्डातून तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाले. पुण्यातील शासकीय विद्यापीठातून BE (Mech) च्या परीक्षेत चौथे आले. कैम्पस मधुनच त्याची बजाज ऑटो मध्ये सहायक प्रोडक्ट मॅनेजेर् म्हणून निवड झाली. नौकरी करीत असताना त्यानी  MPSC, UPSC च्या स्पर्धा  परीक्षा दिल्या MPSC द्वारा ते जलगाव जिल्ह्याचे CEO झाले पुढे  UPSC द्वारा  सहायक आयकर  उपायुक्त म्हणून निवडले गेले.हा सगळा प्रवास सुरु असताना आपल्या  गावातील,  विभागातील  छोट्या  भावंडा साठी  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केद्र सुरु केले. या प्रयत्नातून अनेक तरुणाच्या मनातील अंतर्ज्योत जागृत केली. 
मोठ्या भावाने लहान भावंडाशी केलेले हितगुज  
मी दुरून आलो त्यात विशेष काही नाही, कोणालाही चांगल काही देऊ शकलो तर ती निर्सर्गाने आपल्याला दिलेली देणगी आहे असे समजतो. एक विध्यार्थ्याची, पालकाची , शिक्षकाची अंतर्ज्योत पेटवू  शकलो तर ते माझं भाग्य.  मला खुप आमंत्रण येत असतात ती स्वीकारताना, आतंरिक तळमळ किती आहे हे मी जाणून  घेण्याचा माझा प्रयत्न असतो. ग्रामीण भागातील  मुलांची  कष्ट, अभ्यास करायची तयारी असते त्याना कर असे म्हणणारा भेटायला हवा . त्याच्या मनातील अंतर्ज्योत पेटवली की झालं. दुसरे तपशील, माहिती मिळत जाइल. ही ज्योत न पेटण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या हृदयात प्रचंड प्रमाणात असलेले न्यूनगंड. हे माझ्या आवाक्यात नाही ,ये करणे शाक्य नाही , हे माझे काम नाही असे सारखे वाटत रहाणे.मला दहावीला प्रथम आलेला आहे असं  सांगणार्‍य अधिकार्‍याला  माझा प्रश्न होता तुम्ही हे कश्यावरुन  सांगता?  हा प्रश्न न्यूनगंड   तून  आला होता. न्यूनगंड आपल्या सगळ्यात असतो त्यावर मात करून  स्वत;ला स्वत; सापड़णे खुप आनंददायी असते. पालकाना शिक्षकाना माझी नम्र विनंती  आहे की पोरं फार मोठी स्वप्न पाहत असतील तर त्यानां  पाहुध्या ते स्वप्ना त्याला उच्च स्तरावर घेउन जात  असेल ,काही  करायचं बळ देत असेल तर त्याला स्वप्न पाहू  देत ना. जशी   प्रगल्भता वाढत जाईल तसे  त्याना कळत जाईल स्वप्न पहिलीच पाहिजेत. आपण जे काही करतो ते अत्यंत महत्वपूर्ण पणे  करायला हवं. अभ्यास करायचा आहे तर प्रचंड मन लावून करायला हवा.  कुठलीच वाचलेली , अभ्यासलेली गोष्ट कधीच वाया जात नाही. आपल्या प्रमाणिक प्रयत्नाला पहिल्यांदा विरोध होतो , विरोधाला न जुमानता पुढे जाता तेव्हा उपहास होतो, उपहासाला भीक    नाही घातली की कुतूहल होते, कुतूहल नंतर येते कौतुक. अभ्यासाकडे खुप गंभीर पणे पहा. मला ज्ञान मिळाले पाहिजे अशी  दृष्टी  ठेवा. आपल्या अभ्यासाला ,आपल्या कामाला महत्त्व द्या. आपण जे काम परत परत करतो त्याच एक शास्र होतं.   अभ्यासाच एक शास्र झाले पाहिजे. अभ्यासाचे वेळापत्रक, वाचनाचं  कौशल्य, लिहण्याची कला , स्मरण करण्याच शास्र, रिविजन कशी करावी अश्या पद्धति आपण  विकसित   करायला हव्यात. प्रत्येक घरात एक ज्ञान यज्ञ पेटला पाहिजे आपलं घर निम्नं स्तरीय करमणुक केद्र झाली आहेत  टिव्ही, वीसीआर , वृत्तपत्रे , ते नको असे नाही परंतू किती?  किती घरात अभ्यासाची चर्चा होते.  शिक्षण आपल्या  जगण्याचा   भाग झाला पाहिजे. मसीहा येइल आणि सर्व बदलून जाईल अस नाही  आपल्याला आपल्या स्तरावर अवतार व्हावं लागेल प्रत्येकाने मोठं काम केले पाहिजे असे नाही. कोणतीही गोष्ट वाया जात नाही. दृश नाही तर अदृष  फळ मिळेलच . आपण स्वत;ला फसवू शकत नाही, स्वताला विचारा खरंच मला ही गोष्ट करायची आहे का ? . निरोगी समाजासाठी  काही गोष्टी बिझिनेसच्या  बाहेर  ठेवावायाला हव्यात.
शिक्षण हा व्यवसाय न होता सर्वाना मुक्त हवे. गुरु रविन्द्रनाथाची कविता आहे.
जिथे मन भीतीमुक्त आहे आणि मान ताठ आहे
जिथे ज्ञानाची कवाडे सर्वांना सदैव खुली   आहेत.

Friday, 18 November 2011

निर्मळ यत्रौत्सव

निर्मळ यात्रेच विशेष महत्त्व आहे . दिवाळी पासूनच यात्रेचे वेध लागत असतात , लोकभाषा मधे " दिवाळी आली खायाला जत्रा आली न्यायाला " अशी म्हण प्रचलित आहे. म्हणजे दिवाळीत खायची चंगळ तर जत्रेला भेट देण्याची पर्वणी  





श्रीमत शंकराचार्य मंदिर, निर्मळ
वैकुंठी चतुर्थीला दीपदान, पोर्णिमेला दीपोत्सव, दिपमाळ उजळण्यानी यात्रेच्या माहोलला सुरवात होते .

कार्तिक कृ एकादशीला निर्मळ तिर्थात अंघोळी व् द्वादशीला पालखी सोहळा . इ पू ४०४ मधे कार्तिक कृ एकादशीला पुरीचे पाचवे  जगतगुरु शंकराचार्य विध्यारण्य स्वामीनी विमलेश्वराच्या मागे समाधी घेतली तेव्हा पासून  एकादशीला दूर दुरून  भाविक स्नाना साठी निर्मळला भेट देउन श्रीमत शंकराचार्यच्या समाधीचे दर्शन घेत असतात . द्वादशीला श्रीमत शंकराचार्याच्या  पादुकांची  व् विमलेश्वराच्या प्रतिमेची  पालखी  काढण्यात येते श्रीमंत पेशव्यानी नेमलेले इनामदार या सोहळ्य|त  सहभागी होत असतात. पालखी मंदिराच्या पायरी कडील दक्षिण मार्गाने सुलेश्वर मंदिरामागुन  ,निर्मळनाका , गणेश मंदिर,हनुमान मंदिराच्या समोरून सकाळी समाधी मंदिरात पोहचते. 


समाधी  मंदिराच प्रवेशद्वार

पालखिनंतर येणार्‍या  रविवारी चर्च  चा सणख्रिश्‍चनाचा यात्रोत्सव साजरा होतो.
परिसरातील जनजीवनावर यात्रेचा प्रभाव होता काही लोक व्यवहार यात्रेमध्ये पार पडत असत. तेव्हा भांडी मुख्यता पितळेची असत , जुनी भांडी देऊन नविन घेणे,   भांडी खरेदी  लोणच्या साठी  लिंब खरेदी  यात्रे मधे  होत असे. तसेच महिलाचा बांगड्या भरण्याचा दिवस असे .  यात्रा पंधरा पंधरा दिवस चालत असे. 
                                                                                                               


                                                                                                                                   


यात्रेच्या निमित्ताने  कुटुंब प्रमुख  मुलं मुलीना, लेकीसुनाना  यात्राखर्च (यात्रेचे पैसे )देत असत.अशी प्रथा या परिसरात  पाली जात असे.

महाविष्णु समोरील गरुड़ मंदिर

यात्रेमधे बाहुल्याचे खेळ, पाळणे , चकरी, मौतका कुवा , हसरे आरसे , इत्यादि मनोरंजनाचे खेळ असतात.    खेळण्याची ,  मिठाई ची,  सुकेळी   ,खजुराची  दुकाने  असतातसध्या भंडिवाले ,  बांगडी  वाली मंडळी कमी दिसतात, काळा बरोबर ही मंडळी दुसर्‍या व्यवसायात गेली असावी.

आजही यात्रा दहा दिवस चालते, नालासोपारा , वसई  स्टेशन कडील मंडळी  यात्रेला येतात  त्यामुळे संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत यात्रेत गर्दी असते
(संदर्भ निर्मळ महात्म्य )



श्रीमत शंकराचार्य स्वामी विध्यारण्य यांची समाधी

Thursday, 3 November 2011

शोध स्व: चा

जीवन म्हणजे स्व: शोधण्याचा प्रवास !!!. आध्यात्मिक भौतिक सर्व प्रकारच्या प्रगति साठी स्व: ची ओळख  पटणे महत्वाचे. आचार्य विनोबा  या विषयी म्हणतात.

        आपण अनेक लोकांना भेटतो पण स्वत: ला भेटायला कधी उत्सुक असतो का?
        "बहुता दिसं आपुली भेटी जाली"  असे कधी होते का?
         स्वत: ला भेटणे मोठे कठिन काम आहे, लोक आरशात चेहरा पाहतात
          आणि समजतात की स्वत:ची भेट झाली,
                       स्वत:ची भेट म्हणजे योग!!
स्वत:ला जाणून घेण्याविषयी, जीवन प्रवासात त्याचे असलेले महत्त्व  वेगवेगळ्या विचारवंतानी असे मांडले आहे.
स्वत:ला अधिकाधिक जाणा आणि त्याची जबाबदारी स्वीकारा! आपण विचार कसे करतो, चालतो कसे ,बोलतो कसे  याचे जागते अवधान ठेवा. जेवढे तुम्ही स्वत:ला जाणल तितके अधिक चांगले  ----   लोरेल मेलिन
खरे तर आपण स्वत:ला नीटसे ओळखत नाही आपले अंतरंग,आपल्याला काय हवे आहे आणि आपल्या विचाराची पद्धत जाणून घ्या --- लीन ग्राबहों
स्वत:वर  पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वत:तल्या चैतन्यशक्ति वर श्रद्धा !!            -- डॉ नार्मन व्हिंसेंट पिल
आपण समस्येला प्रतिसाद कसा देतो, हे आपल्याला पाहता आले पाहिजे --- रिचर्ड कार्लसन
जो स्वत:ला सर्वोतम रितीने पेश (सादर) करतो असा माणूस कधीच अयशस्वी होत नाही - ओ स्वेट merdan
स्वत:ला जाणणे आणि  स्व:ची पूर्ण जबाबदारी स्वीकारणे महत्वाचे. परस्पर सबंधात स्व: चे वर्तन अंतर्मुखतेने तपासा    - लेस ब्राउन
स्वत:ला कमी लेखु नका ! न्यूनगंड  व् अहगंड या दोहोपासून चार हात दूर रहा   -- वेन डायर
प्रथम तुम्ही स्वत:चे अंतरंग जाणून घ्या विश्वातील अनंत रहस्याची उत्तरे तुमच्यातल्या प्रत्येक पेशी वर कोरलेली आहेत, त्याचे सखोल ज्ञान  होण्यासाठी  प्रयत्न  करा      -------  डन मीलमन
स्व:ला सर्वस्वी जाणणे आणि स्वत:च  स्वत:चे असणे महत्वाचे आपल्याला आपल्या सामर्थ्य , मर्यदाची जाणीव हवी          ---   डेव्ह पेल्झार
लक्षात ठेवा सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुमच्या आतच दडलेली असतात फ़क्त ती उत्तरे एकण्या साठी तुमचे मन आतंरिक दृष्टया कमालीचे शांत व् अक्रिय असावे लगते --  डेवी फोर्ड
 प्रत्येक  दिवस  आरशासमोर  उभे रहा आणि आपल्याच नजरेला नजर द्या, स्वत:शी संवाद साधा आणि आत्मावलोकन करा  ------   मार्क हँसान  

गर्दित स्वत:ला हरवू नका ! स्वत:चा मार्ग स्वत: च शोधून काढ़ा !!    -------  रिक वारेन
स्वत:ला ओळखणे म्हणजे प्रत्येक विचारांचे वा भावनांचे नेमके भान  ठेवणे   -------  जिम रोहन.
तुम्ही म्हणजे हे जग आहात तुम्ही स्वत:त प्रथम परिवर्तन घडवून आणा मग या जगात परिवर्तन घडेल     ---- डेविड होकीन्स
तुम्ही स्वत:ची मैत्री  केलीत तर तुम्हाला कधी एकाकीपणा वाटणार नाही     ------ माक्सवेल मंताझ

                          उध्दरेदात्मनाss त्मानम  नात्मानमवसादयेत  !
                          आत्मैव ह्या त्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: !!
आपणच आपला उध्दार करायला हवा , आपण घात करणारी कृत्ये करू नयेत, आपणच आपले मित्र असतो , आपण आपले शत्रु होऊ शकतो.
 
पटतंय  कुछ कुछ !!!!!
 

Friday, 14 October 2011

सामवेब

निर्म सरोवराच्या परिसरातील १२ गावात  सामवेदी ब्राह्मण वसलेले आहेत. मंदिरात व्  राज दरबारात संगीत नृत्य नाट्य कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. ते गायक व् नायक होत. राज्यानी ह्या लोकाना शंकराचार्य  समाधी  मंदिरात संगीत सेवेसाठी नियुक्त केले होते. सनई,चौघडा,मृदंग ,भेरी, वीणा ,इत्यादि वादनात पारंगत होते.मंदिरात आरती भजन सेवा सदर करीत. भुवेनेश्वरी देवी आणि विमला देवी त्यांची कुलदैवत. बुद्ध काळी सामवेदी ओरीसातुन स्थलांतरित झाले इ स पूर्व १८२५ मंध्ये या लोकांच वसईत आगमन  झाले असे म्हणतात. परंतू लिखित वा सांस्कृतिक पुरावा उपलब्ध नाही.

    या समाजात व्यवसाय सबंधीत आडनावे आहेत ती अशी.
काव्य ,नाट्य लेखन व् नाट्य कलाकार  म्हणजे नायक पुढे झाले नाईक.
 ब्रास किंवा पितळेची संगीत वाद्या वाजवत ते वर्ताकाह पुढे वर्तक झाले , नाटकातील मुख्य पात्र म्हणजे महापात्र पुढे झाले म्हात्रे
मुख्य संगीत दिग्दर्शक जे इतर संगीत कलाकाराना मार्गदर्शन करत ते  जोशिह  त्याचे नंतर जोशी झाले.
कार्यक्रमाचे निवेदन करणारे वाच्ये तदन्तर  वझे झाले,
 पट्टे,कपडे पट ,मुकुट ईत्यादी नायकाचे मेकअप करणारे पट्टेलिक नंतर झाले पाटील, तसेच देशमुख हे आडनाव सामवेदी मधे प्रचलित आहे.

ह्या सर्व मंडळीची गोत्रे खालील  प्रमाणे
भारद्वाज , कश्यप , अत्री , कौशिक , वशिष्ठ , अंगिरस

राजा प्रताप बिंबाच्या काळी ह्या लोकानी शेती व्यवसाय स्वीकारला , सामवेदी समाजाची मुख्य गांवं उमराले , बोळीज , गास ,कोफरड, भुइगाव , वाघोली , नवाले , वटार , नाला मर्देश , नंदीग्राम

वेद- पुराणे  
 वेद व्यासमुनिनी वेदांच्या चार शाखा केल्या   ऋग्वेद ,सामवेद, यजुर्वेद अथर्ववेद.  व्यासांनी  सरस्वती नदीतीरी शम्याप्रास नावाचा आश्रम स्थापिला. यामध्ये मंत्रांच्या संहिता तयार केल्या. वेदराशीतील विशिष्ट ऋचांची क्रमवारी लावून ऋग्वेद निर्मिला. गायनायोग्य ऋचांना सामवेद हे नाव दिले. यज्ञक्रियेचा तपशील यजुर्वेदातून मांडला. अथर्ववेदात गूढविद्या सांगितली. व्यासांकडून पैलऋषी ऋग्वेद शिकले. यजुर्वेदात व्यासशिष्य वैशंपायन निष्णात झाले. सामवेदात जैमिनी तयार झाले. अथर्ववेद सुमन्तु मुनींनी व्यासांपाशी अभ्यासिला. 
सामवेदाच्या हजार शाखा होत्या त्यातील   कौथुमी, जैमिनीय व्  राणायणीय  शाखा आज मिलातात. जैमिनीय शाखा कर्नाटक मध्ये , कौथुमीय गुजरात व्  मिथिला मंध्ये आणि  राणायणीय महाराष्ट्र मध्ये आहेत.




 निर्म परिसरातील सामवेदी ब्राह्मण ओरीसातुन स्थलांतरित झाले  असे एक मत असून     दूसरा  मत प्रवाह  म्हणतो गुजरात मधून. त्यासाठी सामवेदी बोली भाषा व् गुजराथी भाषेतील साम्यस्थळाचा दाखला देतात.




 डॉ. अ.व्यं.सावजी, नागपूर आपल्या ‘चित्पावन ब्राह्मणांचा उगम आणि विकासया  पुस्तकात  म्हणतात सोपारा येथे दहा हजार सामवेदी ब्राह्मण होते ते सर्वच्या सर्व समुद्रमार्गे दाभोळला व तेथून चिपळूणला पोचले व तेथे त्यांनी नव्याने वसाहत केली.


 ह्या सगळ्या मतमतांतरचा धुन्डोळा  घ्यायला हवा. आपल्याला अलेक्स हले ( Alex  Haley)  सारख्या संशोधक लेखकाची  गरज आहे. जो आपले कुळ अणि मूळ शोधेल.  

 (सामवेब - वेबवर सामवेदी वर उपलब्ध माहिती )

Monday, 12 September 2011

आपली जलसंपत्ती



कोकणात पाउसाचे प्रमाण सर्वसाधारणपणे चांगले राहिले आहे पावसाळ्यात     होणा-या भरपूर पावसाचे पाणि वाहून जाऊ नये म्हणून आपल्या परिसरात खुप तलाव, ळीं ,बाव्खाले होती. याचाच अर्थ पाणि अडवा  पाणि जीरवा हे तंत्र आपल्या कड़े वापरात होते. हळूहळू वाढत्या लोकसंख्येने गावात असलेल्या तळीं बाव्खालाचा बळी घेतला.  ळींबाव्खाले आक्रसत चालली आहेत वेळीच जागृत होण्याची गरज आहे.
वॉटर मॅनेजमेंट अर्थात जलव्यवस्थापन हे आजचे परवलीचे शब्द.  
समर्थनी पाण्याचे महत्व फार पुर्वीच सांगितले आहे

सकळ जिवा चैतन्य। सकळिका समान। त्रेलोक्याचे महिमान। उदकापाशी।।
नदीचे उदक वाहत गेले। तो निरर्थक चालिलें। जरी बांधोनि काढले। नाना तीरीं कालवे।।
उदकाचे देह केवळ । उदकाचेंचि भूमंडळ । चंद्रमंडळ सूर्यमंडळ । उदकाकरितां ॥
नाना मुक्तफळांचें पाणी । नाना रत्नी तळपें पाणी । नाना शस्त्रामधें पाणी । नाना गुणाचें ॥
जे जे बीजीं मिश्रीत जालें । तो तो स्वाद घेऊन उठिलें । उसामधें गोडीस आलें । परम सुंदर ॥
उदक तारक उदक मारक । उदक नाना सौख्यदायेक । पाहातं उदकाचा विवेक । अलोलिक आहे ॥

वसई परिसर परशुरामाची भूमि म्हणून प्रसिद्ध असलेल्या शुर्पारक नगरीचा भाग होता. शुर्पाराकाची भौगोलिक रचना पूर्वेला पर्वतरांगा, पच्शिमेला  अरबी समुद्र , उतरेला वैतरणा नदी, दक्षिणेला उल्हास नदी. आपल्या धर्मात तिर्थक्षेत्राला फार महत्त्व आहे. त्यातून तीर्थे (तलाव,सरोवर,कुंडे )  अधिक महत्वाची. शुर्पारक नगरीत एकशेआठ तीर्थे प्रसिद्ध होती. 






पूरी पिठाचे पाचवे शंकराचार्य स्वामी विद्यारण्य व् सातवे स्वामी पध्मनाभ   यांची समाधी स्थान असलेले    निर्म


 येथील  विमल सरोवर व्  निर्मल सरोवर तीर्थ.









  सोपारा उमराळा येथील चक्रतीर्थ म्हणजे चक्रेश्वर तलाव












बुरुड राज्याचा कोट येथील तलाव


















पाणि अडवून जिरवण्या साठी तयार केलेली बाव्खाले















देवकुंड , देव तलाव






दोनतलाव  वटार












 स्थानिक  , या तलावाना सासु सुनेची  ळीं (हाउ ओची  ळीं) म्हणतात










शंकराचार्य  मंदिरा  कडून  तलावाचे  विहंगम  दृश्य ,समोर सुलेश्वर मंदिर व् घाट

आजुबाजुची मंडळी आपला कचरा सांडपाणी तलावात सोडत आहेत. तलाव घाण पाण्याची डबकी बनत आहेत.
पुर्वज्यानी धार्मिक दृष्टीकोन स्वीकारुन  तलावाना तीर्थ  मानून त्यांच पावित्र्य जपले. 


आता वैन्ज्ञानिक युगात पर्यावरण पोषक  जीवन शैलीने आपले जलसाठे, परिसर प्रदुषण मुक्त ठेवण्याची नितांत गरज आहे.