Tuesday, 3 January 2012

इच्छाशक्ती / निश्चयाचे बळ

प्रखर  इच्चशक्ति ने असाध्य ते साध्य    
  इच्छाशक्ती  ही माणसाची  प्रचंड आतंरिक शक्ती  आहे. इचाशक्तीच्या जोरावर माणूस अश्यक्य ते श्यक्य करून दाखवतो. निवडलेली कृती ठराविक पध्दतीने करण्यासाठी पुष्टि व मदत करणारे सृजनात्मक सकारात्मक बळ म्हणजे इच्छाशक्ती . योग्य कृती करण्यासाठी  व अयोग्य ते टाळण्या  साठी साह्य होणारी शक्ती.
 
वेगळ्या शब्दात  दृढ़ निश्चय म्हणजे इच्छाशक्ती .
 
इच्छाशक्ति सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते. सकारात्मक इच्छाशक्ती  चे उदहारण  वयाच्या पंधराव्या वर्षी रोहिडेश्वराच्या किल्ल्या वर सवंगडया बरोबर स्वराजाची शपथ  घेऊन  तडीस नेणारे छत्रपति शिवाजी महाराज. 
                            निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। 
                                 अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
नकारात्मक उदहारण जगाला दुस-या महायुध्दात लोटणा-या  व ज्युचे छळ  करणा-या अडोफ़ हिटलर चे.
आपण आपली इच्छाशक्ती  वाढवू शकतो, चांगले वळण लावू शकतो. स्वामी  विवेकानंदानी एक ठिकाणी म्हटलय की " आपण आपले भाग्याविधाते आहोत, उठा! ध्येय साध्य करण्याचे सामर्थ्य  आपल्या ठायी आहे" . छोटे छोटे नियम पाळून आपण  आपली इच्छाशक्ति वाढवू शकतो. उदाहरणार्थ पहाटे  लवकर उठून अभ्यासाचा  नियम करून  टंगळमंगळ न करता पाळणे. धुम्रपान सारख्या वाईट  सवयीना इच्छाशक्तीनी मुरड घालता येते.  योग्य अयोग्याची जाण आपल्याला उपजतच असते. छोट्या छोट्या कृतीने योग्य ते पाळणे अयोग्य ते टाळणे  ह्यातून इच्छाशक्ती   विकसीत होत असते. पुढची पायरी सार - असार , वास्तव - अवास्तव , योग्य - अयोग्य , तर्कसंगत - भावनिकता  याचा तुलनात्मक अभ्यास करून विवेक करणे. हे  साध्य करण्यासाठी मेहनतीची तयारी असायला हवी.  भूतकाळाची खंत व भविष्याची चिंता  ह्या दोन गोष्टी  आपल्याला  मागे घेचत असतात. भूतकाळात   आपण चूका केलेल्या असतात त्याविषयी खंत न बाळगता त्या चूका पासून शिकून वर्तमानात त्या टाळणे व भविष्याची अवास्तव काळजी न करणे. यानी आपले मनोबल वाढत असते.
इच्छाशक्ती  व एकाग्रता हातात हात घालून चालत असतात. उद्दिष्टा वर पूर्ण लक्ष केंद्रित करून, ध्येय  साध्य करता येईल.


(आधार - विल पॉवर एंड इट्स डेवेलोपमेंट - स्वामी बुध्दानंद )

No comments:

Post a Comment