आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती. राष्ट्रीय युवा दिन. शाळेत असतानाचे दिवस आठवतात सहावी, सातवी पासून स्वामी विवेकानंद अणि छत्रपति शिवाजी महाराज ह्यानी दैवताची जागा घेतली ती आजतागायत. आज शोधतो काय भावले असेल स्वामीजीचं . धर्मं परिषदेतील बंधू आणि भगिनी हे संबोधन, त्यांची चिकित्सक बुध्दी, गुरु ही तपासून पहावा ही वृती, आपण देव पाहीला आहे का असा प्रश्न विचारणारे , तरुणाना गीताभ्यासा पेक्षा फुटबॉल खेळा असे सांगणारे. भारताला तुम्ह्च्या पासून धर्मं शिक्षण नव्हे तर विज्ञान हवे असे मिशन-याना सांगणारे. स्वमिजीची अशी अनेक आवडणारी रुपे. स्वमिजीची तरुणावर फार श्रद्धा होती. तरुणच या देशाला गतवैभव मीळवून देतील असा विश्वास होता.
स्वामीजीचा जीवनपट पाहीला तर कळते की उणेपुरे ३९ वर्षाच्या आयुष्यात कितीतरी पिढयाचं काम करून ठेवल आहे. १२ जानेवारी १८६३ साली स्वामी जीचा जन्म कलकत्ता येथे श्री विश्वनाथ दत्त व् भुवनेश् वरी देवी कड़े झाला. त्याचे मुळ नाव नरेद्ननाथ दत्त. १८८१ च्या नोव्हेंबर मधे कधीतरी त्यांची श्री रामकृष्ण परमहंसाशी प्रथम भेट झाली. नरेंद्रला सहा वर्षे गुरूंचा सहवास लाभला. १६ अगस्त १८८६ ला ठाकुरानी इहलोकाचा प्रवास संपवला.पुढील दोन वर्षे स्वामीजीनी संपूर्ण भारतभ्रमण करून भारताची त्यावेळेची स्थिति व प्रश्न जाणून घेतले. ह्या प्रवासात त्यांचा मुक्काम कधी राजमहाली तर कधी झोपडीत असे. २४ डिसेंबर १८९२ ला त्यानी कन्याकुमारीच्या समुद्रातील खडकावर ध्यान करत असताना शिकागोच्या धर्मपरिषदेत जाण्याचा मार्ग सापडला.
शिकागो धर्मपरिषदेत स्वामीजी |
मार्ग सोप्पा नव्हता.दृढ निश्चय ,आत्मविश्वास व अथ क परिश्रमाच्या बळा वर अनेक अ डथळे पार करुन ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामीजी भाषाणा साठी उभे राहिले तेव्हा त्याना कोणच ओळखत नव्हते. पहील्या वाक्याने त्यानी जगाला जिंकले आणि वेदान्ताची व् हिन्दू धर्माची ध्वजा फडकवली. पुढील दोन तीन वर्षे स्वामीजी अमेरिका,यूरोप व् इंग्लैंड मधें वेदांताचा व् हिन्दू धर्माचा प्रसार करत होते. १८९७ साली त्यानी रामकृष्ण मिशन व् मठ स्थापन केले.दरिद्रिनारायणच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न केले.
तरुणाना मार्ग दखाविताना सांगितले
तरुणानो निर्भय बना ! उठा , जागे व्ह़ा , ध्येय साध्य होई पर्यंत स्वस्थ बसू नका.
जुना धर्म सांगतो ,ज्याचा देवावर विश्वास नाही तो नास्तिक , आधुनिक धर्म सांगतो , ज्याचा तेहतीस कोटि देवावर विश्वास असेल आणि स्वत; वर विश्वास नसेल तर तो नास्तिक !
तरुणाना मार्ग दखाविताना सांगितले
- चांगुलपणाच्या शक्तीवर अढळ विश्वास.
- मत्सराचा आणि संशयी स्वभावाचा आभाव.
- जे चांगले बनण्याचा व चांगले करण्याचा प्रयत्न करीत आहेत तय सर्वांना सर्वतोपरी साह्य करणे.
- Take one idea, make that one idea your life, think of it, dream of it, live on that idea. Let the brain, muscles, nerves every part of your body be full of that Idea and leave every other idea alone. This is the way to success. जीवनाचं ध्येय ठरवा, त्या विषयी विचार करा. ध्येयपुर्तिचे स्वप्न बघा. ते ध्येय जगा. तुमची बुध्दी, स्नायु शरीराचा कणनकण ध्येयाने भारा. हाच यशाचा मार्ग आहे.
स्वामी विवेकानंद शिलास्मारक कन्याकुमारी |
No comments:
Post a Comment