संजीवनी परिवार तर्फे महिलासाठी आरोग्यं धनसंपदा या कार्यक्रमाचे आयोजन आप्पा फुलारे हॉल येथे करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. दीपक देसाई व डॉ. उषा देसाई उपस्थित होते. डॉ. दीपक देसाई यांनी जन्माला आलेल्या बाळाच्या काळजी पासून ते स्त्रीयांच्या जीवनातील वेगवेगळ्या स्थित्यंतरं घ्यावयाची काळजी , वयात येणा-या मुलींचा आहार त्यांच्यात निर्माण करावयाची सहनशीलता या बाबत मार्गदर्शन केले. डॉ. उषा देसाई यांनी स्रीयांच्या प्राथमिक आजाराविषयी माहिती देताना हिमोग्लोबिन व कॅल्शियम संतुलन याचे महत्व समजावून सांगितले. व त्या साठी घ्यावयाचा आहार या विषयी माहिती दिली. मुलींच्या शारीरिक बदला बरोबरच मानसिक अवस्था कुटुंबीयांनी जाणून काळजी घ्यायला हवी.
डॉ. दीपक देसाई 27 /05/2012 |
उपस्थिती चांगली होती, बराच पल्ला गाठायचा आहे.
No comments:
Post a Comment