काश्मिरला पाकिस्तान बरोबर जायचे आहे हे डोक्यातून काढा - संजय नहार
काश्मिरला पाकिस्तान बरोबर जायचे आहे हे डोक्यातून काढा अर्धे प्रश्न सुटतील असे प्रतिपादन श्री संजय नहार यांनी संजीवनी व्याख्यानमालेत "काश्मिर काल आज व उद्या " या विषया वर बोलताना काढले. पुढे म्हणाले मला काश्मिर मध्ये एक प्रश्न विचारतात 1947 साली भाषा, धर्म, निर्णय घ्यायचा अधिकार आणि भौगोलिक सलगता या सर्व मुद्या वर आम्हाला पाकिस्तान मध्ये जायचा अधिकार होता. आम्ही गेलो नाही. 48 च्या युद्धात 65 च्या युद्धात 71 च्या युद्धात भारता बरोबर राहिलो 90 नंतर परिस्थिती का बिघडली?
काश्मिरला पाच हजार वर्षाची मोठी परंपरा आहे ऋषींची,मुनीची, संतांची, सुफिंची परंतु आज काय? आज अंधार आहे आम्ह्च्या असे लक्षात आले कि काश्मिर मध्ये भारताबद्दल प्रेम नाही. भारता विषयी अज्ञान होतं त्यांना वाटायचे भारत म्हणजे आर्मी ,त्यांना वाटायचे भारत म्हणजे पैसे खाणारे लोक,त्यांना वाटायचे भारत म्हणजे गोळी मारणारे लोक, नाहीतर गार हवेत येणारे टुरीस्ट, भारत म्हणजे आपली काळजी करणारे लोक नाहीत. भारत म्हणजे आपली लोकं नाहीत. सरहद संस्थेने ठरवलं दुध नासवायचे नाही,साखर टाकायची. Know India Tour सुरु केली, लहान मुलांची टूर सुरु केली. जेव्हा हि मुलं आली तेव्हा देशाला जोडणारी एक हि यंत्रणा नव्हती. मुलांना सर्वात जास्त क्रेझ चित्रपट सृष्टीची , मुलं पुण्यात आणायची ,घरी ठेवायची, मुलांनी देश पहिला श्रीनगरच्या मशिदी पेक्षा दिल्लीची जाम्मा मशीद मोठी आहे हे त्यांना कळले.पुण्यात कोकणस्थ ब्राह्मण असले तरी आपणाला घरी ठेवतात हे समजले. आज नऊ वर्ष झाली पुण्यामध्ये काश्मीरची 150 मुलं शिकतात. माझ्या बरोबर आलेला मुक्तार काश्मिरी तरुण चांगली मराठी बोलतो, मेडिकल च्या प्रथम वर्षात शि कतो. काश्मीर मधील लोकांना सौंदर्य आणि बुद्धीची दैवी देणगी आहे. काश्मिरी लोकांत बंडखोरी उपजतच आहे. दबाव टाकला तर काश्मिरी कधीच ऐकत नाहीत. प्रश्न सोडवायचा असेल तर तो आपुलकीने,प्रेमानी व विश्वासाने सोडता येईल. सरहद संस्था त्या साठी प्रयत्न करते. शिवाजी महाराजांनी सांगितल्या प्रमाणे जर किल्ला जिंकायचा असेल तर आजूबाजूंच्या लोकांची मन जिंकायला पाहिजेत. सरहद नि एक कार्यक्रम आखलाय कारगिल पर्यटन केंद्र करू, लोकांची मन जिंकू, लोक बरोबर आले तर शत्रू कधी जिंकू शकत नाही. ज्या दिवशी भारतातील जनता आणि सरकार दोघांना असे वाटेल कि काश्मीर आपले आहे. काश्मीरला कोणी तोडू शकत नाही.

No comments:
Post a Comment