|
सुंदर व स्वच्छ समुद्र किनारा |
|
सुरुची बाग |
तारकर्ली :
मुंबई पासून ५५२ किमी. मालवण पासून ७ कि मी अंतरावर सुंदर व स्वच्छ समुद्र किनारा. सुरुची बाग व या बागेतील MTDC ची समुद्र किनारीच राहण्याची व्यवस्था, सतत समुद्र दर्शन.
|
सूर्योदय |
|
इंद्रधनुष्य |
|
MTDC रिसॉर्ट |
तारकर्ली च्या एकाबाजूला समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला कर्ली नदी आहे. कर्ली नदी मध्ये बोटिंगचा आनंद घेत येतो. त्सुनामीच्या वेळी इकडे एक बेट तयार झाले आहे. या बेटा वर वॉटरस्पोर्टची मजा घेता येते. कर्ली नदी व अरबी समुद्राचा संगम इकडे पाहता येतो. एका बाजुला कर्ली नदीचे निळेशार शांत पाणी तर दुसर्या बाजूला सफेद फेसांचा उसळलेल्या लाटांचा समुद्र.
|
कर्ली नदीतील सफर |
|
वॉटरस्पोर्ट |
होडीतून कर्ली नदीतील सफर , सूर्यास्त व आकाशातील रंगाची उधळण क्षणभर सर्व विसरायला होते.
|
रंगाची उधळण |
|
कर्ली नदीचा किनाऱ्या वरून सूर्यदर्शन |
|
सूर्यास्त |
रापण जाळ्यातील मच्छीमारी आणि जाळ्या मधील चांदीची मासोळी -
|
रापण जाळं |
|
चांदीची मासोळी |
मालवण जवळ कुणकेश्वर व आंगणेवाडी येथील भराडी देवीचे मंदिरं प्रसिध्द आहेत.
.
मालवण पासून ४५ किमी वर , कुणकेश्वर पांडव कालीन महादेवाचे मंदिर आहे. मंदिर समुद्र किनारी आहे.
|
श्री कुणकेश्वर मंदिर |
|
आंगणेवाडी येथील भराडी देवीचे मंदिर |
No comments:
Post a Comment