भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर इतिहासाच्या काही गोष्टी शिकाव्या लागतील असे प्रतिपादन प्रा. नामदेवराव जाधव यांनी संजीवनी व्याख्यानमाला २०१५ चं उदघाटन करून " शिवाजी दि मॅनेजमेंट गुरु" या विषयावर बोलतना केले. संजीवनी व्याख्यानमालेचे हे तेरावे वर्ष. ते पुढे म्हणाले, आपल्याला शिवाजी म्हटलं कि घोडा, तलवार, लढाई इत्यादी माहीत आहे. शिवाजी महाराजांनी लढाई कमी केल्या परंतु मोहिमा जास्त केल्या. मोहीम म्हणजे आखणी , नियोजन, अभ्यास. आधुनिक व्यवस्थापनातील चौदा सूत्रांचा महाराजांनी कसा उपयोग केला हे उदाहरण देऊन सांगितले. कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट हे सांगताना सुरते च्या मोहिमेचे उदाहरण दिले. सुरतची मोहीम चार दिवसात फत्ते केली परंतु चार महिने अभ्यास करून हेरखात्यातर्फे सुरतच्या सुभेदाराची वित्तबातमी काढली, कागदावर फौज किती प्रत्येक्षात किती इत्यादी. योग्य व्यक्तीची योग्य कामा साठी निवड हे सूत्र मांडताना त्यांनी "होता जीवा म्हणून वाचला शिवा " या म्हणी मागचा इतिहास आणि अफजलखानाच्या भेटीची कथा विस्ताराने सांगितली. शिस्तीचं उदाहरण देताना त्यांनी सुर्यास्त नंतर महाराजा साठी सुद्धा किल्ल्याचा दरवाजा न उघण्याची घटना विशद केली. नियमाची समानता दाखवून देणा-या किल्लेदाराचा सन्मानाची गोष्ट सांगितली. आग-याच्या भेटी मागील अभ्यास , नियोजन आणि योग्य अंमलबजावणीनी सहीसलामत सुटका इत्यादी घटनाक्रम उलघडून दाखवला.
शिवाजी महाराजाच्या जीवनातील विविध घटना आणि व्यवस्थापनातील सूत्राची सांगड घालत विषय अधिक रंजक पणे मांडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्तात्रय देशमुख होते.
प्रास्ताविक हेमंत नाईक यांनी केलं तर सूत्र संचलन सौ अनिता नाईक यांनी केलं.
या वेळी प्रा. नामदेवराव जाधव यांच्या हस्ते sanjivaniparivar.com या वेबसाईट चे अनावरण झालं. वेबसाईट मागची संजीवनीची भूमिका कमलाकर पाटील यांनी मांडली.
No comments:
Post a Comment