रोज सकाळी नाष्ट्या अगोदर अर्धा तास व्यायाम हीच दिनचर्या आपणास दृदय रोगा पासून दूर ठेवील असे माधवबाग चे संस्थापक डॉ रोहित साने यांनी संजीवनी व्याख्यानमालेत सांगितले. काही गोष्टीच्या पाठची कारण मीमांसा जाणून घेतली तर काळजी घेणे सोप्पं होईल. हार्ट अटॅक सबंध रक्ताच्या गुठळीशी आहे. रक्त प्रवाहात जर रक्ताची गुठळी तयार झाली व ती हृदयाला रक्त पुरवठा कारणा-या रक्त वाहिन्याच्या मार्गात आली तर हृदयाला रक्त पुरवठा बंद होऊ शकतो आणि त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो. काही वेळा रक्तस्रावा मुळे रक्त वाहिन्या मध्ये गुठळी तयार होते आणि हि गुठळी २४ ते ४८ तासात गळून पडते व रक्त प्रवाहाला बाधा आणते. अश्या निर्माण झालेल्या गुठळ्या विरघळवणारी यंत्रणा आपल्या शरीरात उपलब्ध असते. ती कार्यरत व सक्षम ठेवण्यासाठी रोज सकाळी नाष्ट्या अगोदर व्यायाम करणे महत्वाचे आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ वर्षा पाटील होत्या.
प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख किशोर वझे यांनी करून दिली तर सूत्रसंचलन सौ सपना पाटील यांनी केल.
No comments:
Post a Comment