Saturday, 12 March 2016

जीवनाने शिकवलेल्या काही गोष्टी !

आज मी दु:खी असताना हि आनंदी असू शकतो. मी दु:ख किंवा निराशे पासून पळ काढत नाही. भावनेच दमन किंवा भावनेने बधिर होण्यापेक्षा भावना जाणून घेण्याचं शिकलो आहे
खरं म्हणजे स्वत: विषयी जाणीवा प्रगल्भ होणे हि स्वत:ला मिळालेली मोठी देणगी आहे. अहंकार किंवा भीती मुळे नव्हे तर  स्व:त वरील ख-याखु-या  प्रेमामुळे ,स्व:त मध्ये सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे.  जेव्हा तुम्ही स्व:त वर खरं प्रेम करता तेव्हा जीवनातील असमतोल पाहणे सोपं जातं 
 
तुम्ही जेव्हा स्व:ताचे मित्र बनता तेव्हा जीवन भव्य होऊन जातं. तुम्ही जसे आहत तसा स्वीकार करता तेव्हा अपेक्षेच्या ओझ्या पासून मुक्त होता. 
 
प्रत्येक क्षणाला आनंदाने सामोरे जायला पाहिजे. त्यात जीवनाचे सार दडलेलं आहे. सुख दु:खं जीवनाचे अंग आहे. हे सर्व जाणून घेणे म्हणजे जीवन होय. 
 
जीवनात शिकलेल्या काही गोष्टी 
 
आपण स्वत:कडे  अधिक लक्ष दिलं  तर आपल्या जीवनातील असमतोल सहज पणे जाणवेल 
 
इच्छापुर्तीची गुरुकिल्ली म्हणजे श्रद्धा/विश्वास , सबुरी व काळ 
 
भीती आपल्याला काही गोष्टी करण्यापासून रोखून धरते
 
आपण कसे असायला पाहिजेत पेक्षा जसे आहोत तसा स्वत:चा स्वीकार करु तेव्हा मुक्तता अनुभवू   
 
आपण जे अनुभवत आहोत तो   जीवनाचा  एक भाग  आहे. 
 
पर्याय नसणे हा एक पर्याय आहे. 
 
अपेक्षित परिणाम पेक्षा  त्यातून  मिळालेला  अनुभव अधिक मौल्यवान असतो. 
 
नेहमीच आपल्याला हवं असते  ते मिळेलच अस नाही परंतु आपल्या गरजा पूर्ण होतील. 
 
सततच्या छोट्या छोट्या कृती मधून मोठे परिणाम साधतात  
 
दृढ  निश्चय  नेहमीच मार्ग काढतो. 
 
आपण ज्याला  टाळतो ते अधिक  पाठपुरावा करते. 
 
कोणी तुमच्याशी असहमत असेल तर त्याचा अर्थ तुमच्या पैकी कोणी एक चूक आहे असा नाही. वेग वेगळी मते अधिक स्पष्टता व दुस-याचा मता विषयी अनुकंपा निर्माण करतात. 
 
प्रत्यक्ष कृती तून आत्मविश्वास येतो. जितकं अधिक कृतीप्रवण होऊ तितकी  जास्त खात्री निर्माण होते. 
 
गोष्टी तुमच्या मुळे  नव्हे तर तुमच्या साठी घडत असतात.
 
प्रत्येक गोष्टी साठी एक वेळ यावी  लागते. तुम्ही खूप प्रयत्न करूनही गोष्टी पुढे सरकत नसतील तर समजा हि योग्य वेळ नाही. 
 
काहीच फुकट जात नाही, तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट उद्दिष्टांपर्यंत पोहचवत असते, कळत नकळत.  
 
सर्वा साठी एकच उत्तर असं नसतं, जीवन म्हणजे  जादूची कांडी नव्हे. 
 
खात्री बाळगा , आपलं अंत:करण नक्कीच मार्ग काढेल. 
 
आपली उत्कटता आपल्या उद्दिष्टां पर्यंत घेऊन जाईल. 
 
तुमची स्वप्नं तुमच्या जीवनाला आकार देतात. मोठी स्वप्न पहा. 
 .
बहुदा हव्या असलेल्या गोष्टी मिळतात तेव्हा उत्सुकता संपलेली असते. 
 
आपल्या आतील आवाजा प्रमाणे वागणे म्हणजे स्वार्थीपणा नव्हे तर स्वत: विषयी आदर आणि कौतुक होय. 
 
कृतज्ञता समाधान निर्माण करते. 
 .
आपल्याला  ध्येया प्रमाणे फळ मिळते 
 
बहुतेक वेळा अपेक्षा दु:ख देतात. 
 
कृतीविना , अंतर्दृष्टी निरर्थक. 
 
जे आपणा साठी अती महत्वाचे आहे त्यासाठी नेहमीच पुरेसा वेळ ,पैसा  व  उर्जा मिळते 
 
निसर्ग  कर्ताधर्ता. 
 
आनंद हे यशाचं उत्कृष्ठ मोजमाप आहे. तुम्ही जितके जास्त आनंदी तितके जास्त यशस्वी. 
 .
उत्तर माहित नसणे हे ठीक आहे. आपण शोधू शकू.
तुम्ही एखादी गोष्ट कशी करता, त्याच प्रमाणे इतर  गोष्टी हाताळत असता. जीवन एक दुस-याशी जोडलेलं आहे. 
 
खोल अंत:रंगात, तूम्ही आधीच सत्य जाणत आहात. 
 
(एका इंग्रजी लेखाचं स्वैर भाषांतर, त्रुटी भाषांतराच्या )
 

No comments:

Post a Comment