Monday, 25 April 2016

आनंदी स्वभाव

स्वभाव सुधारा आनंदी व्हा.

आनंदा साठी तुम्हाला वणवण फिरण्याची किंवा आनंद शोधण्यासाठी मठात तप करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या अवतीभवती आणि तुमच्या मध्ये आनंद भरून राहिला आहे.आपल्या कल्पनाशक्ती पलीकडे आहे असे नव्हे. आपण लहान लहान सुसंगत कृती द्वारे आनंदवृत्ती विकसित करू शकतो. 
 
स्वभावातील हे  नऊ बदल  तुम्हाला रोज अधिकाधिक आनंदी बनण्यास मदत करतील.  

आनंद हा तुम्ह्च्या कृती तून निर्माण होत असतो. आनंद सहज उपलब्ध नसतो. ----- दलाई लामा 

१ तक्रार करण्यापेक्षा समजून घ्या.
   तक्रारी , ग-हाणी सांगायच्या झाल्या तर आयुष्य पुरणार नाही. खूप उकडतं , माझं नशीबच असं. आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देणे सोप्प आहे. 
   तक्रार करण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत चांगलं काय आहे ते शोधा. खूप गोष्टी चांगल्या आहेत त्या विषयी कृतज्ञता व्यक्त करा.  
    कृतज्ञता म्हणजे समाधान आनंद. 

२ वस्तू पेक्षा लोकांना प्राधान्य द्या. 
   दिवसातील किती वेळ चीज वस्तू वर केंद्रित होतो. घर , गाडी , मोबाईल  या गोष्टी वर किती खर्च होतो. खूप काही असणे म्हणजे आनंद असं क्वचितच असतं. 
   जोडीदाराशी , शेजा-याशी जिव्हाळ्याने बोलणे , वागणे त्यांच्याशी स्नेह संबध जोडण्यास मदत करेल व आनंदाचे क्षण निर्माण करील.  

३. निवडा करण्यापेक्षा सहानुभूती बाळगा. 
    विचार करा दिवस भरात आपण किती न्याय निवाडे करत असतो? पुढच्या वेळी जेव्हा निर्णय घ्याल तेव्हा सहानभूती पूर्वक विचार करा. निषेध करण्यापेक्षा चांगलं शोधा.  बदल करू शकतो का? मदत करू
     शकतो का? समजू शकतो का ? हे पहा.

४. स्वार्थीपणा  नको औदार्य दाखवा. 
     स्वार्थी जगात. इतरा साठी केलेली निस्वार्थी कृती मनाला प्रोत्साहित करते ,समाधान देते. 
     आपल्याला जेव्हा बरं वाटत नसेल तेव्हा सहका-याला मदत करा. अनोळखी माणसाशी बोला. वृद्धाला खायला द्या. निरपेक्ष वृत्तीने द्या. दिल्याने आनंद मिळतो. 

५. समस्ये पेक्षा उपाय शोधा.
     तुमच्या समोर असलेल्या समस्ये , अडथळ्यावर लक्ष केंद्रित करू शकता किंवा त्यावर मात करण्याचे उपाय/ उत्तरे  शोधू शकता, तुम्ही जेव्हा उपाय, उत्तरे शोधायला सुरवात करता तेव्हा तुम्ही आशावादी
     आणि कृतीप्रवण होता आणि हे नेहमीच उत्साहवर्धक असते. 

६ प्रतिकार करण्यापेक्षा स्वीकार करा. 
   जर जीवनात येणा-या प्रत्यके गोष्टीचा प्रतिकार विरोध कराल तर तुम्ही रागीट, निराश व्हाल. 
   मनासारख्या न होणा-या गोष्टीचा स्वीकार करा. परिस्थितीचा सामना करा आणि प्रयत्न सुरु ठेवा. तुम्ही जर विरोध केला तर वेदना होतील, तुम्ही जर स्वीकार केला तर त्यातून मार्ग सापडू शकेल. 

७.  मन मोठं करा क्षुद्र गोष्टी कडे दुर्लक्ष करा. 
      तुमच्या रस्त्यात कोण आडवं येत असेल, तुमच्या ताटा तील काही खात असेल तर तुरंत माफ करा. मन मोठं करा. तुम्ही कुत्सित मेलला विनयशील उत्तर देता किवा कोणा एकाच्या उद्धट पणावर 
       मेहरबानी करता, तम्ही शांत असता.आणि वातावरणातील ताण कमी करता.   

८. सामाजिक मागणी पेक्षा तुम्हाला काय वाटते. ऐकावे जनाचे करावे मनाचे. 
    इतर काही करतात ते बघून आपण करायला गेलो तर तो जीवनाशी एक खेळ होईल आणि पदरात निराशा, दु:ख पडेल. 
     तुमच्या स्वत:च्या मता प्रमाणे जगा. तुमच्या आतील आवाजाला प्राधान्य द्या.नको असलेली बंधने झुगारा. तुमच्या इच्छे प्रमाणे जीवन जगा, सांस्कृतिक तडजोडी स्वीकारू नका.  

 ९. कामाची भव्य अशी यादी बनवण्यापेक्षा रोजच्या रोज साध्य होतील अशी कामं निवडा
     कामची मोठी यादी स्वप्नाला मारक ठरते. तुम्ही आपल्या स्वप्नाची यादी बनवू शकता  परंतु भविष्यासाठी आपला आनंद पुढे ढकलू नका. आवडत्या प्रकल्पावर काम करा. सहली साठी बचत करा. 
     कामची छोटी छोटी यादी बनवा रोजच्या रोज पूर्णकरण्यासाठी पावले उचला. आपल्याकडे वेळ थोडा आहे  
      
 

( एका इंग्रजी लेखाचं भाषंतर त्रुटी माझ्या )

No comments:

Post a Comment