Tuesday, 27 December 2016

चांगला माणूस बनू या !




चांगला माणूस बनू  या !

  मुलाने चांगला माणूस व्हावे म्हणून आईनं  सुचवलेल्या काही गोष्टी. ( इकॉनॉमिक्स टाईम मधील यामिनी सूद यांचा लेख )

स्वतंत्र पणे विचार करा. :   आपले मित्र काय करतात किंवा कसा विचार करतात त्यांच्या प्रभावाखाली दबून जाऊ नका.  स्वत: विचार करा, सर्वांच्या  अनुमतीची  किंवा पुष्टीकरणाची अपेक्षा ठेवू नका. मूठभर हितचिंतक अवश्य  जोडा. एकाच वेळी सर्वांचं समाधान करता येणार नाही आणि तसा प्रयत्न करणे प्रगतीस बाधक ठरेल. 

मोठं होण्याची घाई करू नका. :  बिया पासून झाड कसं होतं हे आपण शाळेत शिकलो आहोत. आपल्याला सतत प्रश्न पडत असतात. मी मोठा कधी होईंन? स्वावलंबी कधी होईन?मोठ्या मंडळींच्या चर्चेत, निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी कधी मिळेल?  खरं तर, वाढ ही एक सततची प्रक्रिया आहे. त्यातील आनंद घ्या. वडीलधारी मंडळी संगोपन करतात ,प्रेम व आधार देत असतात, आणि आवश्यकता असेल तेव्हा कान देखील उपटतात. 

वेळ दवडू नका : अभ्यास, कामा कडे दुर्लक्ष आणि सतत खेळ यांनी काहीच साध्य होणार नाही. तुम्हाला मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट माहित आहे, मुंगी अव्याहत काम करत असते. हिवाळ्यासाठी रवा,साखर जमा करत असते आणि नाकतोडा फक्त नाचत असतो. सांगणं एकच आहे की काम आणि खेळ या मध्ये संतुलन साधा, निष्काळजीपणाने वेळ वाया घालवू नका. 

मित्र, सहकारी , वस्तूत गुंतू नका:  भावनेने गुंतू नका त्याने फक्त दुःखच होते. लोकं  बदलत असतात,  परिस्थिती पालटत असते. असं काहीतरी  होतं असतंच .  जाऊ द्या, स्वतःशी प्रामाणिक रहा. 

कोणाचाही अनादर करू नका.: आईवडील ,आजीआजोबा, शिक्षक यांचा आदर ठेवाच, त्याचबरोबर नोकरचाकर, ड्रॉयव्हर हे ही आपल्या कुटूंबाचे भाग आहेत त्याचा आदर करा. सुशिक्षित मंडळी कमी सहनशील असते  आणि शिकण्यासाठी त्यांच्या कडे संयम ही नसतो, असं म्हणतात   हे खरं आहे का ? . तुम्ही सुशिक्षित तर  आहातच थोडी सहनशीलता अंगी बाणवा.
 
यश म्हणजे खूप पैसा आणि पदकं नव्हे: जोपर्यंत तुम्ही हार मानत नाहीत. तुम्हाला कल्पना आहे की तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न करत आहात आणि पुढच्या वेळी अधिक मेहनत घ्यायची तयारी आहे अश्या वेळी जिंकला नाहीतरी फरक पडत नाही. व्यासपीठाची भीती वाटणे ठीक आहे परंतु तुम्ही व्यासपीठावर बोलण्यासाठी उभं राहणं हे ही यशच आहे. 

छंद जोपासा : तुम्हाला आवडेल असा छंद विकसित करा  तो एखादा खेळ असेल  , कला असेल , हस्तकला असेल , वाचन असेल. छंद आनंद देतो ताण तणाव दूर करतो. विशेषतः   मोठेपणी जेव्हा ताणतणावाच्या , ओझ्याखाली वाकून जाता. . जेव्हा आत्यन्तिक गरज असते तेव्हा छंद आपल्याला शांत होण्यास मदत करतो  व आनंद निर्माण करतो.  छंद जगण्यास अर्थ प्राप्त करून   देतो . एखादा छंद जरूर जोपासा.    
 


 


Friday, 9 December 2016

चांगल्या सवयी जोपासा - चांगलं जीवन घडवा











आपण सवयीचे गुलाम आहोत, सवयीने  आपला ताबा घेतला आहे. आपले  विचार, कृती हे सवयीचा परिपाक आहे. इतकी वर्ष त्याच त्याच गोष्टी करून सवयी हाडीमासी खिळल्या आहेत. ह्याच सवयी जीवनात आपल्याला प्रगती पथावर घेऊन जातात किवां आपल्या मार्गातील अडसर बनतात. खरं तर आपल्या जीवनाची गुणवत्ता आणि सद्यस्थिती  ही आपल्या दैनंदिनी  सवयीचे  प्रतिबिंब आहे.
सवयी जगण्याचं निर्विवादपणे एक शक्तिशाली अंग आहे. मानसशास्त्रीय दृष्टीने सवयी मूलभूत वागण्याचा अविभाज्य भाग आहेत. संशोधन असं म्हणते की  आपल्या रोजच्या कामाची दिशा  सवयी ठरावीत असतात. 

चांगल्या सवयी लावून घेणे, आणि वाईट सवयी सोडणे फार कठीण आहे. आपल्या वागण्या, बोलण्याच्या व विचार करण्याच्या नैसर्गिक वृत्ती  बदलण्यासाठी प्रखर इच्छाशक्ती व बांधिलकी ची आवश्यकता  असते. 
चांगल्या सवयी जीवनात यश आणि आनंद फुलवू शकतात. उदात्त ध्येय साध्य करण्यसाठी  कोणत्या चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात? कश्या विकसित कराव्यात?
फक्त आर्थिक दृष्ट्या यशस्वी करण्यासाठी नव्हेच तर आरोग्य , सुख समाधान साठी  खालील २५ सवयी  मदत करतील. आपल्या  रोजच्या जीवनात ह्या सवयी उतरविण्याचा प्रयत्न तुम्हाला ध्येयाप्रत वेगाने घेऊन जातील. 
१) लवकर उठा : पहाटेच्या वेळेला रामप्रहर म्हणतात. ज्याला कोणाला आयुष्यात काही बनायचं आहे.  सकाळच्या शांत प्रहरी आपल्या ध्येयावर लक्षकेंद्रित करून काम केल्यास ध्येय गाठणे सोप्पे जाते. जल्दी सोये जल्दी जागे दुनियासें सबसे आगे. 
२)  कृतज्ञता : आम्ही खूप वेळ समस्या सोडवण्यासाठी खर्च करतो परंतु समस्या हे जिवंत पणाचे लक्षण आहे. आपल्या कडे जे आहे त्यासाठी आपण कृतज्ञ असायला हवं अगदी समस्यासाठीही. कृतज्ञता आपल्याला नाहीरे पासून आहे रे बनवते. आहेत त्या गोष्टीवर लक्ष दिल्यामुळे वातावरण आनंदी, निरोगी समाधानी बनवते. 
३) हसतमुख रहा. : हसतमुख माणसं आनंदी असतात. हसण्यामुळे मन प्रसन्न व शांत राहतं शरीर आणि मनाचा दृढ संबंध आहे,. मन प्रसन्न असलं की शारीरिक उदासीनता पळून जाते. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण !  . 
४) न्याहरी भरपूर घ्या : एक म्हण आहे, सकाळची न्याहरी राजा सारखी असावी. दुपारचं जेवण प्रधाना सारखं असावं आणि रात्रीचं जेवण भिका-या सारखं असावं. ज्या मुळे आरोग्य छान राहतं आणि माणूस उत्साही राहतो.  
५) व्यायाम : मानसिक व शारीरिक स्वस्थते साठी नियमित व्यायाम आवश्यक.  ज्यामुळे स्नायू लवचिक राहतात. 
६) लिंबू पाणी प्या : रोज एक ग्लास लिंबू पाणी पिल्याने अनेक फायदे होतात. लिंबू मध्ये व्हिटॅमिन क असते जे पचन,प्रतिकार शक्ती वाढवते व शरीरात पाण्याची पातळी ठेवण्यात मदत करते. शरीरातील दूषित द्रव्य कमी करण्यास , वजन कमी करण्यात मदत करते.  
७)  चालत राहा- चैरावती, चैरावती म्हणजे चालत रहा, रक्ताभिसरण व हृदयाचं आरोग्य राहण्यास मदत होते.  
८) चौरस आहार. व्हिटॅमिन व मूलद्रव्य युक्त आहार घ्या. 
९) वेळेचं नियोजन : यशस्वी होण्यासाठी वेळेचं प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. वेळेचा सदुपयोग व कमी वेळेत परिणामकारक काम करता येणे महत्वाचे कारण प्रत्येकाला २४ तास उपलब्ध आहेत.
१०)  दैनिंदिन ध्येय निश्चित करा : बहुतेकांचं जीवनात,व्यवसायात निश्चित उद्दिष्ट असतात. दीर्घकाल ध्येय गाठण्यासाठी दररोज छोटेछोटे टप्पे पार करणे अतिशय महत्वाचे, ज्यामुळे मोठी ध्येय वेळेत पुरी करणे सोपं जातं. 
११) स्वतःला प्रोत्साहन द्या. खूपदा आशावादी राहणे कठीण जाते , निराशा येते. आशावादी राहण्यासाठी प्रेरणादायी चरित्र वाचा, मन जो  निश्चिय करेल तो तडीस नेईल. 
१२) बचत आणि गुंतवणूक करा. भविष्यासाठी बचत करा. केलेली बचत योग्य ठिकाणी गुंतवा जेणे करून त्यापासून तुम्हाला चांगलं उत्त्पन्न मिळेल. 
१३) खर्चाचा अंदाज करा व नोंद ठेवा-  छोट्या छोट्या खर्चाची काळजी घ्या. छोटे छिद्र बोट बुडवते. चांगल्या आर्थिक सवयीत   खर्चात बचत करणे व प्रत्येक खर्चाची नोंद ठेवणे उत्तम.
१४) नवीन गोष्टी शिका : रोज काहीतरी नवीन शिका, शिकल्याने जीवन समृद्ध होत असते. नवीन कौशल्ये आत्मसात करा किंवा   विद्यमान कौशल्ये वृद्धी करा. 
 १५) व्यवस्थितपणा जपा : : अस्ताव्यस्तपणा    ध्येयापासून विचलित करते. आपलं कार्यालय,घर नीट नेटकं ठेवा.  . 
१६)  इतरांना साह्य करा : जीवनातील धावपळीत दुस-याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. इतरांसाठी थोडा वेळ काढा त्यांना साह्यभूत व्हा, प्रत्येकवेळी पैश्याची नव्हे तर सह अनुभूती हवी असते. 
१७ ) मैत्रीचं जाळं : मौत्रिचं जाळं वीणा. जिथं आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा एकमेकांना जीवनमान उंचवण्यासाठी अपेक्षे शिवाय मदत केली जाईल. 
१८) भीती सोडा : आपणाला भविष्याची चिंता करतो व निराश होतो. जर तर ची भीती आपल्या मनात असते. आपल्याला अस्वस्थ करणारी एक तरी गोष्ट करण्याची सवय लावा. त्यामुळे भीती दूर होण्यास मदत होईल. 
१९) कृती करा : आपण चालढकल करतो, दिरंगाई करतो, जे आपल्या प्रगतीस बाधक आहेत. ताबडतोब कृती करा जो आत्मविश्वास देईल.
२०) योजना कृतीत आणा. ध्येय गाठण्यासाठी दीर्घ योजना आणि दररोजचं नियोजन आवश्यक असते.  त्याचं प्रमाणे प्रत्येक गोष्ट कृतीत उतरवणं तितकेच महत्वाचे. योजनेशिवाय ध्येयं गाठणं अशक्य आणि  प्रगती करण्यासाठी योजने प्रमाणे काम करणं आवश्यक. 
२१) आवड जपा : स्वतःला आवडणा-या गोष्टी साठी वेळ काढा, संगीत,चित्रपट , वाचन किंवा आवडणारी कोणतीही चांगली गोष्ट जीच्यामुळे तुम्हाला आनंद होतो , थकवा पळून जातो. 
२२) सकारात्मक विचार जोपासा:  नेहमी सकारात्मक विचार करा ज्या मुळे चांगल्या गोष्टी घडण्यास मदत होते. चांगले विचार चांगल्या गोष्टीला आकर्षित करतात. 
२३) वाचन : दिसामाजी काहीतरी वाचीत जावे. वाचनामुळे नवीन कल्पना, जगातील घडामोडी विषयी माहिती मिळते ,ज्ञान होते.  वाचन, शिक्षण व करमणूक करत असते
२४) विश्रांती घ्या  : यशस्वी होण्यासाठी विश्रांती , शांत झोप महत्वाची. लवकर उठण्याबरोबर वेळेवर झोपण्याची सवय लावा. श्रम आणि विश्रांती याचं संतुलन ठेवा.
२५) रोजनिशी लिहा : रोज आपले विचार व अनुभव लिहण्याची सवय जोपासा. ज्याने स्वतः ची ओळख होण्यास मदत होते व आपण नेमकं काय करतो हे वेळोवेळी कळते आपली कृती आपल्या ध्येयाशी जोडण्यात मदत होते.  

वर काही चांगल्या सवयी दिल्या आहेत त्या  पैकी किती सवयी आपण आत्ता पर्यंत जोपासल्या आहेत. तुमचं ईप्सित ध्येय गाठण्यासाठी आपल्या पैकी किती लोक ह्या सवयी जोपासण्यासाठी  आजपासून वचनबद्ध होऊ शकतील.
आहे तयारी, होऊ या कटिबद्ध स्वतः  साठी !






(इंग्रजी लेखाचं स्वैर भाषांतर त्रुटी भाषांतरकाराच्या )

Monday, 5 December 2016

नवउद्यमाचे पर्व


लोकसत्तेने आयोजित केलेल्या बदलता महाराष्ट्र - पर्व स्टार्ट अप चे  म्हणजेच  पर्व नवउद्यमाचे या परिसंवादात सहभागी होण्याची संधी मिळाली. दोन दिवसात या विषयाचे वेगवेगळे पैलू जाणून घ्यायला मिळाले.. 
स्टार्टअप सुरु केलेल्या मंडळींचे अनुभवाचे बोल

‘स्टार्टअप’ म्हणजे लोकांना उपयोगी पडेल, अशी कोणतीही नवी कल्पना, सेवा/ सर्विस, नवीन उत्पादन किंवा आहे त्या उत्पादनात सुधारणा करून अधिक मूल्य जोडणे. 

स्टार्टअप’ म्हणजे कोणतेही नवे तंत्रज्ञान नाही. तर समाजाला उपयोगी पडेल अशी कोणतीही नवी कल्पना मनात आल्यानंतर जिद्द आणि धाडसाने ती प्रत्यक्षात उतरविणे म्हणजे ‘स्टार्टअप’ 

स्टार्टअप’ सुरू करताना ती कल्पना समाजाच्या उपयोगी पडणारी, समस्या दूर करणारी असेल तर यश मिळण्याची शक्यता अधिक असते. 

उदाहरणार्थ एम-इंडिकेटर, पेटीम,(Paytm-Pay through mobile), opandit.com इत्यादी हे तीनही नवउद्योग सेवा क्षेत्रातील आहेत. फिंगरलिक् हा खाद्य निर्मिती उद्योगातील  स्टार्टअप आहे. 

स्टार्टअप’ हा नोकरीत अपयश आले आहे म्हणून किंवा फार उत्साहात येऊनही घेण्याचा निर्णय नाही, आपला समाज-संस्कृती विचारात घेऊन लोकांना उपयोगी पडतील अश्या नवीन कल्पना राबवा.  स्टार्टअप’ सुरू करणे ही एक तपश्चर्याच समजून नवउद्यमींनी या क्षेत्रात यावे. यश साध्य करण्यासाठी कामाची आखणी करायला हवी , कोणतेही काम सुरू करण्यासाठी मनातील जिद्द महत्त्वाची असते. जिद्द आणि धोका पत्करण्याची मनाची तयारी आवश्यक. नवउद्योजक बनण्याचा प्रवास हा कठीण असतो. त्यासाठी प्रयोगशील व विचारशील असावेच लागते.

आपल्याला काय करायचे आहे, यापेक्षा काय करायचे नाही, हे निश्चित करून त्यावर ठाम राहण्याची सर्वात अवघड कसोटी प्रत्येक नवउद्यमीने पार करायलाच हवी. जगातील सर्व समस्यांवर आपल्याकडे भलेही उत्तर नसेल; परंतु आपण निवडलेल्या ग्राहकांना नेमके काय द्यायचे हे ठरवून, त्या दिशेने सतत बदल करीत राहून उत्क्रांत होत राहिले पाहिजे.  
  

स्टार्ट अप सुरु करताना काय सावधगिरी घ्यावी कोणत्या गुणांची जोपासना करावी 
सखोल विचार करून स्टार्टअप सुरु करण्यामागची आपली प्रेरणा तपासून घ्यावी,या विषयाकडे आपला ओढा आहे का ? या उद्योगाचा समाजाला काय उपयोग आहे, समाजाच्या कोणत्या समस्येचं समाधान होणार आहे. स्टार्टअप सर्व्हिस क्षेत्रातील आहे की उत्पादक क्षेत्रातील आहे. आपले ग्राहक कोण आहेत,बीज भांडवल कसं उभारणार आहोत. स्टार्टअप मध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःला वेळ , पैसे आणि आरोग्य या गोष्टीचं भान व शिस्त आवश्यक.  तंत्रज्ञानावर आधारित असेल तर त्याचं नियोजन करणे. सुरु केलेल्या नवउद्योगा विषयी अभिमान असायला हवा. घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित असायला हवं (Nothing Else Matter approach) सुरु करा पाठपुरावा करा आणि तडीस न्या.  यशासाठी टीम महत्वाची. कामाचा प्राधान्यक्रम , आग्रही  पाठपुरावा,जबाबदारी घेणारे सहकारी, स्वतःचं जातीने लक्ष आणि  कामाचा अनुभव आवश्यक,  


स्टार्ट अप मधील यशापयश
छोटय़ा छोटय़ा ल्पनांवरती वेगवेगळे स्टार्टअप निर्माण करता येतात. मात्र ते करत असताना  स्टार्टअपचा प्रयत्न शंभर टक्के यशस्वीच होईल, हे गृहीतक उपयोगी नाही. दहा स्टार्टअप पैकी   एक यशस्वी होतो.  या विचारानेच आपण स्टार्टअपकडे पाहिले पाहिजे, 
स्टार्टअप साठी भांडवल हे एखादी कल्पना किंवा वक्ती बघून होत नसते तर त्यात व्यवसायाची क्षमता किती आहे हे पाहिलं जातं. 
उद्योजकता ही एक मानसिकता आहे. 
स्टार्टअपचे बाळकडू शालेय वयातच मिळाले पाहिजे  ‘स्टार्टअपसाठी घरातील सगळ्यांचा, कुटुंबाचाही संपूर्ण पाठिंबा असला पाहिजे. आपल्या मुलांमध्ये ती जिद्द, ईर्षां निर्माण केली पाहिजे. धोका पत्करायची मानसिकता बनवायला हवी.   आपण आपला अभ्यास करून पदवी मिळवावी आणि सुरक्षित नोकरी करावी, ही मध्यमवर्गीय मानसिकता बदलली पाहिजे.  आंत्रप्रेनरशिपम्हणजे काय हे भारतातील प्रत्येक महाविद्यालयात शिकविले पाहिजे. 
भारतीय अर्थ व्यवस्थेच्या(कृषी,उत्पादन,सेवा)  क्षेत्रांत स्टार्टअपला खूप मोठी संधी उपलब्ध आहे. सध्या सेवाक्षेत्र मोठय़ा वेगाने वाढत आहे. देशाच्या सकल उत्पादनात त्याचा ६० टक्के हिस्सा आहे. या क्षेत्रात स्टार्टअपसाठी खूप मोठय़ा प्रमाणावर संधी आहे. आलेली संधी समजावून घेऊन त्याचा उपयोग करून, त्याला व्यावसायिक स्तरावर नेण्यासाठी त्या संधीचा विकास करणे म्हणजे स्टार्टअप होय