Friday, 9 December 2016

चांगल्या सवयी जोपासा - चांगलं जीवन घडवा











आपण सवयीचे गुलाम आहोत, सवयीने  आपला ताबा घेतला आहे. आपले  विचार, कृती हे सवयीचा परिपाक आहे. इतकी वर्ष त्याच त्याच गोष्टी करून सवयी हाडीमासी खिळल्या आहेत. ह्याच सवयी जीवनात आपल्याला प्रगती पथावर घेऊन जातात किवां आपल्या मार्गातील अडसर बनतात. खरं तर आपल्या जीवनाची गुणवत्ता आणि सद्यस्थिती  ही आपल्या दैनंदिनी  सवयीचे  प्रतिबिंब आहे.
सवयी जगण्याचं निर्विवादपणे एक शक्तिशाली अंग आहे. मानसशास्त्रीय दृष्टीने सवयी मूलभूत वागण्याचा अविभाज्य भाग आहेत. संशोधन असं म्हणते की  आपल्या रोजच्या कामाची दिशा  सवयी ठरावीत असतात. 

चांगल्या सवयी लावून घेणे, आणि वाईट सवयी सोडणे फार कठीण आहे. आपल्या वागण्या, बोलण्याच्या व विचार करण्याच्या नैसर्गिक वृत्ती  बदलण्यासाठी प्रखर इच्छाशक्ती व बांधिलकी ची आवश्यकता  असते. 
चांगल्या सवयी जीवनात यश आणि आनंद फुलवू शकतात. उदात्त ध्येय साध्य करण्यसाठी  कोणत्या चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात? कश्या विकसित कराव्यात?
फक्त आर्थिक दृष्ट्या यशस्वी करण्यासाठी नव्हेच तर आरोग्य , सुख समाधान साठी  खालील २५ सवयी  मदत करतील. आपल्या  रोजच्या जीवनात ह्या सवयी उतरविण्याचा प्रयत्न तुम्हाला ध्येयाप्रत वेगाने घेऊन जातील. 
१) लवकर उठा : पहाटेच्या वेळेला रामप्रहर म्हणतात. ज्याला कोणाला आयुष्यात काही बनायचं आहे.  सकाळच्या शांत प्रहरी आपल्या ध्येयावर लक्षकेंद्रित करून काम केल्यास ध्येय गाठणे सोप्पे जाते. जल्दी सोये जल्दी जागे दुनियासें सबसे आगे. 
२)  कृतज्ञता : आम्ही खूप वेळ समस्या सोडवण्यासाठी खर्च करतो परंतु समस्या हे जिवंत पणाचे लक्षण आहे. आपल्या कडे जे आहे त्यासाठी आपण कृतज्ञ असायला हवं अगदी समस्यासाठीही. कृतज्ञता आपल्याला नाहीरे पासून आहे रे बनवते. आहेत त्या गोष्टीवर लक्ष दिल्यामुळे वातावरण आनंदी, निरोगी समाधानी बनवते. 
३) हसतमुख रहा. : हसतमुख माणसं आनंदी असतात. हसण्यामुळे मन प्रसन्न व शांत राहतं शरीर आणि मनाचा दृढ संबंध आहे,. मन प्रसन्न असलं की शारीरिक उदासीनता पळून जाते. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण !  . 
४) न्याहरी भरपूर घ्या : एक म्हण आहे, सकाळची न्याहरी राजा सारखी असावी. दुपारचं जेवण प्रधाना सारखं असावं आणि रात्रीचं जेवण भिका-या सारखं असावं. ज्या मुळे आरोग्य छान राहतं आणि माणूस उत्साही राहतो.  
५) व्यायाम : मानसिक व शारीरिक स्वस्थते साठी नियमित व्यायाम आवश्यक.  ज्यामुळे स्नायू लवचिक राहतात. 
६) लिंबू पाणी प्या : रोज एक ग्लास लिंबू पाणी पिल्याने अनेक फायदे होतात. लिंबू मध्ये व्हिटॅमिन क असते जे पचन,प्रतिकार शक्ती वाढवते व शरीरात पाण्याची पातळी ठेवण्यात मदत करते. शरीरातील दूषित द्रव्य कमी करण्यास , वजन कमी करण्यात मदत करते.  
७)  चालत राहा- चैरावती, चैरावती म्हणजे चालत रहा, रक्ताभिसरण व हृदयाचं आरोग्य राहण्यास मदत होते.  
८) चौरस आहार. व्हिटॅमिन व मूलद्रव्य युक्त आहार घ्या. 
९) वेळेचं नियोजन : यशस्वी होण्यासाठी वेळेचं प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. वेळेचा सदुपयोग व कमी वेळेत परिणामकारक काम करता येणे महत्वाचे कारण प्रत्येकाला २४ तास उपलब्ध आहेत.
१०)  दैनिंदिन ध्येय निश्चित करा : बहुतेकांचं जीवनात,व्यवसायात निश्चित उद्दिष्ट असतात. दीर्घकाल ध्येय गाठण्यासाठी दररोज छोटेछोटे टप्पे पार करणे अतिशय महत्वाचे, ज्यामुळे मोठी ध्येय वेळेत पुरी करणे सोपं जातं. 
११) स्वतःला प्रोत्साहन द्या. खूपदा आशावादी राहणे कठीण जाते , निराशा येते. आशावादी राहण्यासाठी प्रेरणादायी चरित्र वाचा, मन जो  निश्चिय करेल तो तडीस नेईल. 
१२) बचत आणि गुंतवणूक करा. भविष्यासाठी बचत करा. केलेली बचत योग्य ठिकाणी गुंतवा जेणे करून त्यापासून तुम्हाला चांगलं उत्त्पन्न मिळेल. 
१३) खर्चाचा अंदाज करा व नोंद ठेवा-  छोट्या छोट्या खर्चाची काळजी घ्या. छोटे छिद्र बोट बुडवते. चांगल्या आर्थिक सवयीत   खर्चात बचत करणे व प्रत्येक खर्चाची नोंद ठेवणे उत्तम.
१४) नवीन गोष्टी शिका : रोज काहीतरी नवीन शिका, शिकल्याने जीवन समृद्ध होत असते. नवीन कौशल्ये आत्मसात करा किंवा   विद्यमान कौशल्ये वृद्धी करा. 
 १५) व्यवस्थितपणा जपा : : अस्ताव्यस्तपणा    ध्येयापासून विचलित करते. आपलं कार्यालय,घर नीट नेटकं ठेवा.  . 
१६)  इतरांना साह्य करा : जीवनातील धावपळीत दुस-याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. इतरांसाठी थोडा वेळ काढा त्यांना साह्यभूत व्हा, प्रत्येकवेळी पैश्याची नव्हे तर सह अनुभूती हवी असते. 
१७ ) मैत्रीचं जाळं : मौत्रिचं जाळं वीणा. जिथं आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा एकमेकांना जीवनमान उंचवण्यासाठी अपेक्षे शिवाय मदत केली जाईल. 
१८) भीती सोडा : आपणाला भविष्याची चिंता करतो व निराश होतो. जर तर ची भीती आपल्या मनात असते. आपल्याला अस्वस्थ करणारी एक तरी गोष्ट करण्याची सवय लावा. त्यामुळे भीती दूर होण्यास मदत होईल. 
१९) कृती करा : आपण चालढकल करतो, दिरंगाई करतो, जे आपल्या प्रगतीस बाधक आहेत. ताबडतोब कृती करा जो आत्मविश्वास देईल.
२०) योजना कृतीत आणा. ध्येय गाठण्यासाठी दीर्घ योजना आणि दररोजचं नियोजन आवश्यक असते.  त्याचं प्रमाणे प्रत्येक गोष्ट कृतीत उतरवणं तितकेच महत्वाचे. योजनेशिवाय ध्येयं गाठणं अशक्य आणि  प्रगती करण्यासाठी योजने प्रमाणे काम करणं आवश्यक. 
२१) आवड जपा : स्वतःला आवडणा-या गोष्टी साठी वेळ काढा, संगीत,चित्रपट , वाचन किंवा आवडणारी कोणतीही चांगली गोष्ट जीच्यामुळे तुम्हाला आनंद होतो , थकवा पळून जातो. 
२२) सकारात्मक विचार जोपासा:  नेहमी सकारात्मक विचार करा ज्या मुळे चांगल्या गोष्टी घडण्यास मदत होते. चांगले विचार चांगल्या गोष्टीला आकर्षित करतात. 
२३) वाचन : दिसामाजी काहीतरी वाचीत जावे. वाचनामुळे नवीन कल्पना, जगातील घडामोडी विषयी माहिती मिळते ,ज्ञान होते.  वाचन, शिक्षण व करमणूक करत असते
२४) विश्रांती घ्या  : यशस्वी होण्यासाठी विश्रांती , शांत झोप महत्वाची. लवकर उठण्याबरोबर वेळेवर झोपण्याची सवय लावा. श्रम आणि विश्रांती याचं संतुलन ठेवा.
२५) रोजनिशी लिहा : रोज आपले विचार व अनुभव लिहण्याची सवय जोपासा. ज्याने स्वतः ची ओळख होण्यास मदत होते व आपण नेमकं काय करतो हे वेळोवेळी कळते आपली कृती आपल्या ध्येयाशी जोडण्यात मदत होते.  

वर काही चांगल्या सवयी दिल्या आहेत त्या  पैकी किती सवयी आपण आत्ता पर्यंत जोपासल्या आहेत. तुमचं ईप्सित ध्येय गाठण्यासाठी आपल्या पैकी किती लोक ह्या सवयी जोपासण्यासाठी  आजपासून वचनबद्ध होऊ शकतील.
आहे तयारी, होऊ या कटिबद्ध स्वतः  साठी !






(इंग्रजी लेखाचं स्वैर भाषांतर त्रुटी भाषांतरकाराच्या )

No comments:

Post a Comment