लोकसत्तेने आयोजित केलेल्या बदलता महाराष्ट्र - पर्व स्टार्ट अप चे म्हणजेच पर्व नवउद्यमाचे या परिसंवादात सहभागी होण्याची संधी मिळाली. दोन दिवसात या विषयाचे वेगवेगळे पैलू जाणून घ्यायला मिळाले..
स्टार्टअप सुरु केलेल्या मंडळींचे अनुभवाचे बोल
‘स्टार्टअप’ म्हणजे लोकांना उपयोगी पडेल, अशी कोणतीही नवी कल्पना, सेवा/ सर्विस, नवीन उत्पादन किंवा आहे त्या उत्पादनात सुधारणा करून अधिक मूल्य जोडणे.
स्टार्टअप’ म्हणजे कोणतेही नवे तंत्रज्ञान नाही. तर समाजाला उपयोगी पडेल अशी कोणतीही नवी कल्पना मनात आल्यानंतर जिद्द आणि धाडसाने ती प्रत्यक्षात उतरविणे म्हणजे ‘स्टार्टअप’
स्टार्टअप’ सुरू करताना ती कल्पना समाजाच्या उपयोगी पडणारी, समस्या दूर करणारी असेल तर यश मिळण्याची शक्यता अधिक असते.
उदाहरणार्थ एम-इंडिकेटर, पेटीम,(Paytm-Pay through mobile), opandit.com इत्यादी हे तीनही नवउद्योग सेवा क्षेत्रातील आहेत. फिंगरलिक्स हा खाद्य निर्मिती उद्योगातील स्टार्टअप आहे.
स्टार्टअप’ हा नोकरीत अपयश आले आहे म्हणून किंवा फार उत्साहात येऊनही घेण्याचा निर्णय नाही, आपला समाज-संस्कृती विचारात घेऊन लोकांना उपयोगी पडतील अश्या नवीन कल्पना राबवा. स्टार्टअप’ सुरू करणे ही एक तपश्चर्याच समजून नवउद्यमींनी या क्षेत्रात यावे. यश साध्य करण्यासाठी कामाची आखणी करायला हवी , कोणतेही काम सुरू करण्यासाठी मनातील जिद्द महत्त्वाची असते. जिद्द आणि धोका पत्करण्याची मनाची तयारी आवश्यक. नवउद्योजक बनण्याचा प्रवास हा कठीण असतो. त्यासाठी प्रयोगशील व विचारशील असावेच लागते.
आपल्याला काय करायचे आहे, यापेक्षा काय करायचे नाही, हे निश्चित करून त्यावर ठाम राहण्याची सर्वात अवघड कसोटी प्रत्येक नवउद्यमीने पार करायलाच हवी. जगातील सर्व समस्यांवर आपल्याकडे भलेही उत्तर नसेल; परंतु आपण निवडलेल्या ग्राहकांना नेमके काय द्यायचे हे ठरवून, त्या दिशेने सतत बदल करीत राहून उत्क्रांत होत राहिले पाहिजे.
स्टार्ट अप सुरु करताना काय सावधगिरी घ्यावी कोणत्या गुणांची जोपासना करावी
सखोल विचार करून स्टार्टअप सुरु करण्यामागची आपली प्रेरणा तपासून घ्यावी,या विषयाकडे आपला ओढा आहे का ? या उद्योगाचा समाजाला काय उपयोग आहे, समाजाच्या कोणत्या समस्येचं समाधान होणार आहे. स्टार्टअप सर्व्हिस क्षेत्रातील आहे की उत्पादक क्षेत्रातील आहे. आपले ग्राहक कोण आहेत,बीज भांडवल कसं उभारणार आहोत. स्टार्टअप मध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःला वेळ , पैसे आणि आरोग्य या गोष्टीचं भान व शिस्त आवश्यक. तंत्रज्ञानावर आधारित असेल तर त्याचं नियोजन करणे. सुरु केलेल्या नवउद्योगा विषयी अभिमान असायला हवा. घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित असायला हवं (Nothing Else Matter approach) सुरु करा पाठपुरावा करा आणि तडीस न्या. यशासाठी टीम महत्वाची. कामाचा प्राधान्यक्रम , आग्रही पाठपुरावा,जबाबदारी घेणारे सहकारी, स्वतःचं जातीने लक्ष आणि कामाचा अनुभव आवश्यक,
स्टार्ट अप मधील यशापयश
छोटय़ा छोटय़ा क ल्पनांवरती वेगवेगळे स्टार्टअप निर्माण करता येतात. मात्र ते करत असताना स्टार्टअपचा प्रयत्न शंभर टक्के यशस्वीच होईल, हे गृहीतक उपयोगी नाही. दहा स्टार्टअप पैकी एक यशस्वी होतो. या विचारानेच आपण स्टार्टअपकडे पाहिले पाहिजे,
स्टार्टअप साठी भांडवल हे एखादी कल्पना किंवा वक्ती बघून होत नसते तर त्यात व्यवसायाची क्षमता किती आहे हे पाहिलं जातं.
उद्योजकता ही एक मानसिकता आहे.
स्टार्टअप’चे बाळकडू शालेय वयातच मिळाले पाहिजे. ‘स्टार्टअप’साठी घरातील सगळ्यांचा, कुटुंबाचाही संपूर्ण पाठिंबा असला पाहिजे. आपल्या मुलांमध्ये ती जिद्द, ईर्षां निर्माण केली पाहिजे. धोका पत्करायची मानसिकता बनवायला हवी. आपण आपला अभ्यास करून पदवी मिळवावी आणि सुरक्षित नोकरी करावी, ही मध्यमवर्गीय मानसिकता बदलली पाहिजे. ‘आंत्रप्रेनरशिप’ म्हणजे काय हे भारतातील प्रत्येक महाविद्यालयात शिकविले पाहिजे.
भारतीय अर्थ व्यवस्थेच्या(कृषी,उत्पादन,सेवा) क्षेत्रांत स्टार्टअपला खूप मोठी संधी उपलब्ध आहे. सध्या सेवाक्षेत्र मोठय़ा वेगाने वाढत आहे. देशाच्या सकल उत्पादनात त्याचा ६० टक्के हिस्सा आहे. या क्षेत्रात स्टार्टअपसाठी खूप मोठय़ा प्रमाणावर संधी आहे. आलेली संधी समजावून घेऊन त्याचा उपयोग करून, त्याला व्यावसायिक स्तरावर नेण्यासाठी त्या संधीचा विकास करणे म्हणजे स्टार्टअप होय.
No comments:
Post a Comment