स्टार्टअप’ सुरू करताना त्यामागची प्रेरणा महत्वाची
- श्रीमती मृदुला बर्वे
स्टार्टअप’ सुरू करताना त्यामागची प्रेरणा खूप महत्वाची, ज्या गोष्टीची आता समाजाला अत्यंत आवश्यकता आहे, ती शोधून त्यासाठी उपाय देणे म्हणजेच स्टार्टअप, असे प्रतिपादन ओपंडित डॉट कॉम (Opandit.com) या नवउद्योगाच्या संस्थपिका श्रीमती मृदुला बर्वे यांनी संजीवनी व्याख्यानमालेत "स्टार्टअप - एक मानसिकता" या विषयावर बोलताना काढले. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे नवीन कंपनी सुरु करणे असं म्हणता येईल. कंपनी ही सेवा देणारी असू शकेल किंवा उत्पादन बनवणारी असू शकेल. स्वतःचं काही काम सुरु करायचं असेल तर आधी मनात ती गोष्ट रुजली पाहिजे. आपला मुद्दा स्पष्ट करताना त्या म्हणाल्या "बीज हे रुजे अंतरी जगण्याचे फुल होते" स्टार्टअप’ हा नोकरीत अपयश आले आहे म्हणून किंवा फार उत्साहात येऊनही घेण्याचा निर्णय नाही. मनात कल्पना पक्की झाली की मार्केट गॅप काय आहे हे शोधलं पाहिजे. स्वतःची मानसिक तयारी , कुटुंबाची मानसिक तयारी करायची हे झालं की प्रकल्प रूपरेषा , उत्पन्न आणि खर्चाचे अंदाज इत्यादी गोष्टी कागदावर उतरवणे,या सगळ्या गोष्टीत कुटूंबाचं पाठबळ महत्वाचं जर आपल्या घरा घरात उद्योजक व्हावा असं वाटत असेल तर कुटूंबातील प्रत्येक वक्तीने आधार दिला पाहिजे. कल्पनेची व्यवहार्यता तपासायला मदत केली पाहिजे. टीमची निवड एक महत्वाची पायरी यात खूप जागरूकता बाळगायला लागते. कारण यश टीम वर्क मधून मिळणार असतं. निधी, अर्थसाह्यासाठी वेगवेगळया संस्थांना आत्मविश्वासाने भेटून आपली कल्पना पटवून देऊन अर्थसाह्य मिळवता येते. ह्या सर्व गोष्टी करताना स्वतः कडे लक्ष द्यायला हवं जसं लक्ष विचलित होऊ न देणे, निराशेचे क्षण येतीलच त्याच्यावर मात करण्यासाठी वाचन किंवा संगीत असे छंद जोपासणे, विशेष म्हणजे अपयश आलं तरी खचून न जाता यश मिळवे पर्यंत प्रयन्त न सोडणे.
स्वागत करताना सौ विद्या वझे |
Dear Kamalakarji, Thank you very much for your blogs covering Sanjivani Vyakhanmala. Even though I missed the Barve madam vykhan, after reading your blog, I could get complete flavor and theme of the Vykhan. All your bolgs are written in right and minimal words without missing any of the important concepts, thought. Excellent.
ReplyDeleteMany thanks for your feedback
Delete