उजाडणारा प्रत्येक दिवस जीवन अधिक प्रगल्भ ,परिपक्व करत असते. कळीचं सूंदर फुलं बनतं. जीवनात गुंतागुंत आहेच परंतु इच्छाशक्ती असेल जगण्याचं एक सूत्रं असेल. तर प्रत्येक दिवस सुंदर , सर्वोत्तम बनल्याशिवाय राहत नाही.
बहुतांश लोकं दिवस चांगला कसा गेले. हे सांगू शकत नाहीत. ते ग्रह ता-यांना ,नशिबाला श्रेय देतात. आणि आपला दिवस चांगला का गेला याच सूत्र हरवून बसतात. भूतकाळात रमतात.
म्हणून रोजिनींशी किंवा नोंद करून ठेवल्यास, . चांगला दिवस व्यतीत करण्याचं सूत्र गवसेल.
जीवनात उद्देश, कृतज्ञता , साधना , मजा आणि प्रवाहीपणा, कामसूपणा असेल तर प्रत्येक दिवस चांगला होत जातो
उद्दिष्टाचा पाठपुरावा करा ! :
आज आपल्याला काय साध्य करायचं आहे , त्यासाठी काय करणे आवश्यक आहे. हे लिहून काढा. एकदा उद्दिष्ट ठरलं की वृत्ती तशी बनते. उद्दिष्ट अधिक आनंददायी होईल या कडे कल होतो ,नैसर्गिक रित्या त्या दृष्टीने काम करण्यास प्रवृत्त होत . दिवस सुंदर बनत जातो.
कृतज्ञ बना !
कृतज्ञता आपल्या जीवनातील नकारात्मकता ,भीती निराशाला पळवून लावते. सकाळी दिवससुरु करण्याअगोदर आपल्या आयुष्यातील अदभूत गोष्टी बद्दल, व्यक्ती बद्दल , मित्रपरिवारा बद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जीवनात अश्या असंख्य गोष्टी आहेत कि ज्या विषयी आपण कृतज्ञ असायला हवं. कृतज्ञता दर्शवणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. जेव्हा तुम्ही कृतज्ञता बाळगता तेव्हा दिवस आपोआप चांगला बनतो.
साधक व्हा!
चिंता,भीती,अधीरता, कृतघ्नता या भावना रात्रंदिवस आपल्याला अस्वस्थ करतात परंतु या गोष्टी वर जाणीवपूर्वक ताबा मिळवता येतो. रोजचं दहा वीस मिनिटाची साधना ,संकल्प दृढ करण्यास मदत करते, मनातील नाकारात्मक विचारांचं मूळ शोधण्यात मदत होते. दिवस सर्वोत्कृष्ठ बनवण्याची संधी देते.
मजा करा रे मजा मजा !!
सर्वोत्तम दिवस म्हणजे खूप परिश्रम असा अर्थ नव्हे. लहानपणची कविता आठवते का मजा करा रे मजा मजा, आजचा दिवस तुमचा समजा! जर आपण जीवनाची मजा घेत नसू तर उत्साह टिकणार नाही. मजा यश टिकवून ठेवण्यात मदत करते.
प्रवाहित रहा, कामसू बना!!
प्रवाह म्हणजे अविचलित वाहत राहणं. तुम्ही करत असलेल्या कामा व्यतिरिक्त , दुसरं काही सुचत नाही. अश्या ध्यासाने एखादी गोष्ट करत असू तर दिवस,काम सर्वोत्तम बनल्याशिवाय राहणार नाही. सर्वोत्तम दिवस बनवण्यासाठी लक्ष विचलित कारण-या गोष्टीचा त्याग करावा लागेल. उदा. फेसबुक , सोशल मेडीय आपलं लक्ष विचलित करतात. कामात व्यत्यय आणतात. अश्या गोष्टी टाळायला हव्यात.
खात्री आहे की जर आपण रोजचा दिवस आपल्या जीवनातील सर्वोत्तम दिवस बनविला तर या जगातील सर्वात मोठ्या समस्या गायब होतील लोक आपल्या स्वतःच्या जीवनावर प्रेम करतील. औषधे किंवा अल्कोहोलचा खोटा आधार घ्यावा लागणार नाही .गुन्हे , हिंसा गुन्हेगारी अशांतता ची मूळ कारणं नष्ट होतील.
ज्याचा रोजचा दिवस सुंदर छान व्यतीत झाला त्याचा आठवडा , पंधरवडा , महीना , वर्ष , जीवन ही छान सूंदर कृतार्थ झालं की.
आपण आजचा दिवस सूंदर, छान सर्वोत्तम करू या !!!
(एका इंग्रजी लेखाचं स्वैर भाषांतर, त्रुटींची जबाबदारी माझी)
बहुतांश लोकं दिवस चांगला कसा गेले. हे सांगू शकत नाहीत. ते ग्रह ता-यांना ,नशिबाला श्रेय देतात. आणि आपला दिवस चांगला का गेला याच सूत्र हरवून बसतात. भूतकाळात रमतात.
म्हणून रोजिनींशी किंवा नोंद करून ठेवल्यास, . चांगला दिवस व्यतीत करण्याचं सूत्र गवसेल.
जीवनात उद्देश, कृतज्ञता , साधना , मजा आणि प्रवाहीपणा, कामसूपणा असेल तर प्रत्येक दिवस चांगला होत जातो
उद्दिष्टाचा पाठपुरावा करा ! :
आज आपल्याला काय साध्य करायचं आहे , त्यासाठी काय करणे आवश्यक आहे. हे लिहून काढा. एकदा उद्दिष्ट ठरलं की वृत्ती तशी बनते. उद्दिष्ट अधिक आनंददायी होईल या कडे कल होतो ,नैसर्गिक रित्या त्या दृष्टीने काम करण्यास प्रवृत्त होत . दिवस सुंदर बनत जातो.
कृतज्ञ बना !
कृतज्ञता आपल्या जीवनातील नकारात्मकता ,भीती निराशाला पळवून लावते. सकाळी दिवससुरु करण्याअगोदर आपल्या आयुष्यातील अदभूत गोष्टी बद्दल, व्यक्ती बद्दल , मित्रपरिवारा बद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जीवनात अश्या असंख्य गोष्टी आहेत कि ज्या विषयी आपण कृतज्ञ असायला हवं. कृतज्ञता दर्शवणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. जेव्हा तुम्ही कृतज्ञता बाळगता तेव्हा दिवस आपोआप चांगला बनतो.
साधक व्हा!
चिंता,भीती,अधीरता, कृतघ्नता या भावना रात्रंदिवस आपल्याला अस्वस्थ करतात परंतु या गोष्टी वर जाणीवपूर्वक ताबा मिळवता येतो. रोजचं दहा वीस मिनिटाची साधना ,संकल्प दृढ करण्यास मदत करते, मनातील नाकारात्मक विचारांचं मूळ शोधण्यात मदत होते. दिवस सर्वोत्कृष्ठ बनवण्याची संधी देते.
मजा करा रे मजा मजा !!
सर्वोत्तम दिवस म्हणजे खूप परिश्रम असा अर्थ नव्हे. लहानपणची कविता आठवते का मजा करा रे मजा मजा, आजचा दिवस तुमचा समजा! जर आपण जीवनाची मजा घेत नसू तर उत्साह टिकणार नाही. मजा यश टिकवून ठेवण्यात मदत करते.
प्रवाहित रहा, कामसू बना!!
खात्री आहे की जर आपण रोजचा दिवस आपल्या जीवनातील सर्वोत्तम दिवस बनविला तर या जगातील सर्वात मोठ्या समस्या गायब होतील लोक आपल्या स्वतःच्या जीवनावर प्रेम करतील. औषधे किंवा अल्कोहोलचा खोटा आधार घ्यावा लागणार नाही .गुन्हे , हिंसा गुन्हेगारी अशांतता ची मूळ कारणं नष्ट होतील.
ज्याचा रोजचा दिवस सुंदर छान व्यतीत झाला त्याचा आठवडा , पंधरवडा , महीना , वर्ष , जीवन ही छान सूंदर कृतार्थ झालं की.
आपण आजचा दिवस सूंदर, छान सर्वोत्तम करू या !!!
(एका इंग्रजी लेखाचं स्वैर भाषांतर, त्रुटींची जबाबदारी माझी)
No comments:
Post a Comment