भारतीय संशोधकांचा दर्जा उत्तम असून त्यांना विशेष मागणी आहे. कॅलिफोर्निया इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि मध्ये खगोलशास्त्र विभाग पाहायला गेलो असताना यंत्रसामुग्री अशीच पडून होती त्या विषयी विचारल्यावर मला सांगण्यात आलं की आयुकातून भारतीय तंत्रज्ञ आल्यानंतर त्याची जोडणी केली जाणार आहे. अशी माहिती डॉ जयंत नारळीकर यांनी वसईतील संजीवनी परिवार आयोजित व्याख्यानमालेत बोलताना दिली.
मुलांना रोज पाठयपुस्तकातील एक धडा मोठ्याने वाचायला सांगा, कोचीन क्लास ची आवश्यकता राहणार नाही. असे मार्गदर्शन डॉ. मंगला नारळीकर यांनी बालपण व शिक्षण या विषयी बोलताना केलं.
रविवार दिनांक २९ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्रज्ञ डॉ जयंत नारळीकर व डॉ मंगला नारळीकर याच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आले होते श्री अरविंद परांजपे , संचालक नेहरू तारांगण यांनी मुलाखतीतून नारळीकर सर व मॅडमचा जीवनपट उलगडून दाखवला. सरांचं बालपण व शिक्षण बनारस मध्ये झालं व लहानपणा पासूनच ते त्रैभाषिक होते.आणि कधीच पहिला नंबर सोडला नाही. मंगला मॅडमना लहानपणा पासून गणिताची आवड होती त्यात इतक्या तल्लीन होत की गणित सोडवतना त्या शाळेत अडकून पडल्याचा किस्सा सरांनी सांगितला.
डॉ. नारळीकरांनी आपले समकालीन कार्ल पिअरसन व नुकतेच जग सोडून गेलेल्या स्टीफन हॉकिंग च्या आठवणी जागवल्या. स्टीफन हॉकिंग मीडियाचा आवडता होता व त्याच्या विषयी उलटसुलट बातम्या छापून येत असत स्टीफन हॉकिंग ला त्याच्या जीवनात उत्तम साथ देणा-या पत्नीशी घटस्फोट तो देव मानत नव्हता आणि ती देव मनात होती ह्या कारणामुळे झाल्याचं छापून आल्याचा किस्सा सरांनी सांगितला.
सुरवातीला हेमंत नाईक यांनी वर्षभराच्या उपक्रमाचा आढावा घेतला व पाहुण्याची ओळख करून दिली. सुत्रसंचलन प्रतीक म्हात्रे यांनी केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राघो नाईक होते. ईशस्तवन व स्वागत गीत जुईली पाटील हिने सादर केलें.
वसईचा मेवा फळं, पालेभाजी, भाजी ,सुकामेवा ची परडी/टोपली पाहुण्यांना देताना ,
No comments:
Post a Comment