Friday, 11 May 2018

प्राचीन विज्ञानात भारतीय वैज्ञानिकांची अचूकता प्रसंशनीय !


 


पृथ्वीची, चंद्राची स्वतः भोवती फिरण्याची वेळ  ३५०० हजार वर्षांपूर्वी अचूक वर्तवली होती. तशी नोंद आर्यभटीया या आर्यभट्टच्या ग्रंथात सापडते. इसवीसन पूर्व भारतीय जीवन संस्कृती खूप प्रगत होती. तक्षशिला , नालंदा अश्या शैक्षणिक संस्था होत्या. भारताचा GDP ३३% इतका होता. भारतात बनणारे स्टील खूप उच्चं दर्जाचं होत. एक उद्योग संस्कृती वसत होती असे प्रतिपादन टाटा मूलभत संशोधन संस्थेचे प्रा डॉ श्रीगणेश प्रभू यांनी वसईतील संजीवनी व्याख्यानमालेत काढले.ते प्राचीन विज्ञानातील भारतीय वैज्ञानिकांचे योगदान या विषया वर बोलत होते.




 


त्या काळी भारतात संशोधन आणि संशोधकांसाठी पूरक वातावरण  होतं.राजकीय स्थिरता , सुबत्ता , चांगल्या शैक्षणिक संस्था  जे परकीय आक्रमणामुळे नष्ट झालं.   आर्यभटीया ग्रंथात पृथ्वी स्वतः भोवती फिरण्याची वेळ २३ तास ५६ मिनिटं ४० सेकंद सांगितली आहे तर चंद्राभोवतीची वेळ (२७.३९६४६७३५७२) सात डेसिमल पर्यंत अचूक सांगितली आहे. साइन कोसाइन टेबल ही भास्कराचार्य यांची देणगी आहे. केरळीय गणिती पद्धतीने हजारो वर्षपूर्वी न्यूटनच्या ही खूप आधी  कॅल्कुलश ची सूत्रं  कटपयादि पद्धतीने श्लोकांत मांडून ठेवली आहेत. ह्या सर्वांला ग्रंथांचा आधार आहे.





आता काही मंडळी महाभारत काळात इंटरनेट होतं असं सांगतात  असं बोलल्याने  जगात आपलं हसं होतं हे त्यांच्या लक्षात येत नाही.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संजीवनीचे जेष्ठ कार्यकर्ते रमेश नाईक यांना   श्रद्धांजली वाहण्यात आली.





सुनील म्हात्रे यांनी प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख करून दिली. कु प्राप्ती पाटील हीने ईशस्तवन सादर केलं. अरविंद पाटील व कौस्तुभ पाटील यांनी साथसंगत केली. अध्यक्षस्थानी श्री भालचंद्र पाटील होते.
















व्याख्यानमाला २०१८  यशस्वी करण्यासाठी साह्यकरणा-या जैमुनी पतपेढी,   बसिन कॅथॉलिक बँक, वसई जनता सहकारी बँक , इंडियन ऑइल,भारत पेट्रोलियम ,सामवेदी ब्राह्मण संघ ,त्रिलोक साउंड सर्व्हिस , मंडप व्यवस्थेसाठी  श्री किशोर नाईक ,जाहिरातदार, देणगीदार  व  श्री विष्णू पाटील यांचे आभार मानले.  

No comments:

Post a Comment