Friday, 11 May 2018

हरवलेलं बालपण परत करणारं नर्मदालय !






नर्मदा परिक्रमेच्या वेळी , नर्मदा किना-यावरील ग्रामवासीय व विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना लक्षात आलं की ८ वी ९ वीच्या विद्यार्थ्यांना स्वतः चं  नाव ही लिहता येत नाही तेव्हाच नर्मदाकिनारी  बालशिक्षण क्षेत्रात काम करायचं ठरवलं सुरवातीला मंडलेश्वरच्या समोरच्या तटावर आठ किलोमीटर दूर असलेल्या लेपा गावी नर्मदालय  सुरु केल. नर्मदालय म्हणजे अनौपचारिक  शिक्षण (Non formal Education ).  मुलांना सांगितलं होतं की शाळेत गृहपाठ घेणार नाही , परीक्षा नाही,पहिले काही महिने  वह्या, पुस्तकाला  हातच लावायचा नाही , पहिल्या दिवशी १४ विद्यार्थी होते. एका गावातून दुस-या ,तीस-या ,पाचव्या खेड्यात असे आज पंधरा खेड्यातून १७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  गरजेतून मेडिकल कॅम्प सुरु झाले. एकटीने राहण्यापेक्षा जोडीला तीन मुलांना  घेतलं  त्यातून निवासी नर्मदालय सुरु झालं आज ४० आदिवासी विद्यार्थी निवासी नर्मदालय मध्ये आहेत. ही मुलं दहावी पास होऊ शकत नाही हे लक्षात आलं होतं. त्यांना  पाबळ येथील विज्ञानाश्रमातील  एक वर्षाच्या बेसिक इन रूरल टेक्नोलोंजि या कोर्स साठी पाठवलं, मुलांनी तो उत्तमरीत्या केला त्यांचं टाटा मोटार्स सारख्या कंपनीत निवड झाली परंतु ह्या मुलांनी ते नाकारून आपल्या गावी येऊन काम करण्याचं ठरवलं शाळेतील इलेक्ट्रिक , वेल्डींग व सुतारकामं ही मुलं करतात.


मध्यप्रदेश शिक्षण विभागाशी संलग्न असलेल्या रामकृष्ण शारदा निकेतन ची तीन विद्यालयं लेपा , तेली भटियार आणि  छोटी खरगोन येथे सुरु झाली. ह्या शाळेत मोफत मध्यान्ह भोजन दिलं जातं.समतोल आहारामुळे गैरहजेरी कमी झाल्याचं , मुलांचं आजारपण कमी झाल्याचं तसेच आकलन शक्तीत वाढ झाल्याचं लक्षात आलं. निवासी शाळे मधील  सरदार सरोवराच्या मध्यवर्ती ठिकणातील ही  आदिवासी मुलं पहाटे पाच वाजता उठतात. प्रार्थना म्हणतात त्याना भगवद गीतेतील चार अध्याय पाठ आहेत. आदिशंकराचार्याची २२ स्तोत्रं मुखोद्गत आहेत. नर्मदालयातील मुलांनी बनवलेल्या सोलार ड्रायरला NCRT आणि मध्यप्रदेश स्टेट एजुकेशन बोर्ड यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत राज्यस्तरीय पाहिलं पारितोषिक मिळाले.  टाटांनी मध्यप्रदेशातील पाहिलं रूरल टेकनॉलॉजि सेंटर नर्मदालयात केलं त्याचं उदघाटन प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी केलं.   हे सर्व करीत असताना लोकं  "तुम्ही यातून काय साध्य केलं ? असे विचित्र प्रश्न विचारतात.  मी त्यांना सांगते तुम्ही ज्याला बालमजुरी म्हणता त्याला मी एक प्रकारचं जीवनशिक्षण म्हणत असते. अश्या मुलांना त्याचं हरवलेलं बालपण अंशतः परत करण्याचं काम नर्मदालय करते असे प्रतिपादन श्रीमती भारतीताई ठाकूर यांनी केलं.




त्या वसईतील संजीवनी व्याख्यानमालेत बोलत होत्या. संजीवनी परिवारानी नर्मदालयाल ५१ हजार देणगी देण्याचं निश्चित केलं होते हे जेव्हा डॉ नारळीकर दांपत्यांना कळलं तेव्हा त्यांनी मानधन  न घेता नर्मदालयाला वर्ग करण्याची विनंती केली एकूण ६१ हजाराची देणगी संजीवनी टीमने ताईकडे सुपूर्त केली.


सुरवातीला सौ स्वाती नाईक यांनी पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक केलं. अध्यक्ष स्थानी सौ. सुलभा म्हात्रे होत्या. सौ उर्मिला नाईक हिने स्वागतगीत सादर केले.  साथसंगत श्री अरविंद पाटील व कौस्तुभ पाटील यांनी केली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धनाली जोशी हिनं केलं. 


संजीवनी व्याख्यानमाला आयोजनात जैमुनी पतपेढी , बस्सीनं कॅथॉलिक बँक , इंडियन ऑइल कॉर्पोरेशन व भारत पेट्रोलियम नी मोलाचं सहकार्य केलं.




 संजीवनीच्या कापडी पिशवी मधून - वसईचा मेवा 

No comments:

Post a Comment