"जो समाजाला धारण करतो तो धर्म ! म्हणजेच समाज टिकवण्याचा आधार असलेली सामाजिक कर्तव्य व नैतिक नियम म्हणजे धर्म. धर्म हा मूलतः नैतिक व कर्तव्यरूप आहे. सृष्टीधर्म म्हणजे सृष्टीला पवित्र मानून तिच्याप्रती आपली कर्तव्य उपासना भावनेने करणे. सृष्टीला पवित्र मानण्याचासाठी आधार प्रत्यक्ष ईशावास्योपनिषदात आहे " ईशावास्यम इदम सार्वम "सर्व सृष्टी ईश्वरमय आहे. मग सृष्टीच्या प्रति पवित्र भाव आलाच व तिच्या संरक्षणाचे कर्तव्यही आले हा आधुनिक धर्म सृष्टीधर्म !! म्हणूनच या पुस्तकाला वैज्ञानिक धर्मग्रंथ म्हणालो".
Saturday, 18 December 2021
सृष्टीधर्म
Tuesday, 26 October 2021
"कृतज्ञता"
कृतज्ञता
मेलोडी बीटीची खालील
वाक्य प्रभावित करतात
"कृतज्ञता जीवनात परिपूर्णता
आणते. समाधानी बनवते, हव्यास सुटतो. नकाराचं होकारात रूपांतर करते. गोंधळ ,गडबडीत
सुसूत्रता निर्माण करते. द्विधा अवस्था नाहीशी करून लक्खपणा आणते,
साध्या जेवणाचं रूपांतर पंचपक्वांनाच्या मेजवानी
होऊन जाते. .घराला घरपण आणते. आणि आपपर भाव निघून आपलेपणा जोपासते.
जीवनात कृतज्ञता नसेल तर
स्वर्गाचा नरक होऊन जाईल.
जीवनात खूप विपुलता असेल
परंतु कृतज्ञता नसेल तर भरल्यापोटी ही तुम्हाला उपाशी आहोत असं वाटेल
कृतज्ञता नसेल तर
कोणताही काम आनंद देणार नाही, कामाचं समाधान
मिळणार नाही.
प्रत्येक सहका-यात त्रुटी दिसतील,
सर्व मित्रांवर नाराजी असेल ,प्रत्येक घरातील चुका
दिसतील. प्रत्येक भेटवस्तूतील कमतरताच दिसेल. प्रत्येक कादंबरी
मुद्रण दोषांनी भरलेली दिसेल.
कोणतीच गादी झोपण्यायोग्य वाटणार नाही. आणि कॉफीचा पेला नेहमीच
फिक्का वाटेल. कृतज्ञतेशिवाय घेतलेला कोणताही निर्णय कायमचाच
चुकीचा वाटेल.
कृतज्ञतेची जाणीव नसल्यास ,प्रत्येक गोष्टीविषयी तक्रारी असतील
उन्हाळा गरम खूप थंडी,
संगीत म्हणजे धांगडधींगा सिनेमे म्हणजे वेळेचा अपव्यय व किशोरवयीन
मुलं नेहमीच उद्धट वाटतील.
कृतज्ञतेशिवाय वेगळ्या मताची ,वेगळ्या
पंथाची माणसं तुम्हाला शत्रू वाटतील
परिवारा विषयी कृतज्ञता नसेल तर
चुकीच्या कुटुंबात जन्माला आलो आहोत असं वाटत राहील.
मिळणा-या , प्राप्त होणा-या गोष्टी
विषयी कृतज्ञता नसेल तर. वेटर खूप वेळ घेतो , रस्त्यावरील प्रत्येक चालक मूर्ख
आहे. गाडी चालवता येत नाही. गाडी बस मध्ये मिळालेली खिडकी जवळीची जागा ही
चुकीची वाटेल.
कृतज्ञते शिवाय जीवन यातनामय
आहे.
" कृतज्ञता " ही
जीवनात किमया घडवणारी किमयागार आहे.
Thursday, 14 October 2021
भावसंचित!
Monday, 4 October 2021
तरुण पिढीचे भवितव्य’!
तरुण पिढीचे भवितव्य’!
संयुक्त
राष्ट्रसंघाच्या आमसभेत दक्षिण कोरियाच्या ‘बीटीएस’
बँडच भाषण झालं आणि गीत सादर केले . त्यांच्या भाषणाचा विषय होता- ‘तरुण
पिढीचे भवितव्य’! या बँडने केवळ भाषणच केले नाही, तर तिथे ते ‘नाचायला परवानगी
हाय..’ हे गाणे गात मोठय़ा जोशात नाचलेदेखील! या विषयी श्री माधव गाडगीळ यांचा लोकरंग
मधील लेख. त्यातील हे गीत
‘नाचायला
परवानगी हाय’
भर
ज्वानीच्या वादळामंदी
आमच्या
दिलाचं वाजतंय ढोलकं
वाढतोय
वाढतोय आवाज वाढतोय
तशी
रातीची थंडी पण वाढतेय
तरी
लयीच्या मागं, सुराच्या मागं,
धावतोय
पळतोय जोशात
आता
सपान भरतंय डोळ्यात, डोळ्यात
मग
तुतारी फुंकतो आणिक सांगतो
आम्हाला
नाचायचंय नाचायचंय
अन्
नाचतो नाचतो बेभान बेभान
बनतो
सोन्याचं अन् रंगतो नाचात बेदरकार बेदरकार
आम्हा
ना काळजी कशाची
धडपडतो
तरी उभे ठाकतो भक्कम पायावरी
आम्हा
ना हताश कोणी करी
काही
तरी येतं वाटेत आडवं
पण
आम्ही नाही त्याला जुमानत
आम्ही
नाही कोणाला इचारत
आमची
लय कधी थांबणार नाय,
आम्ही
कधी मागे फिरणार नाय
कुणाला
काय दाखवायचं नाय आम्हाला आमची नशा पुरे
आता
कशाला थांबायचं, आता तर आली आहे वेळ
आम्ही
पुढे पुढे चालणार आणि बघत राहणार
पूर्वेला
तांबडं फुटताना
मग
चालणार चालणार, बोलत राहणार
आम्ही
सोन्याचे बनलोय ना
कुणाला
काय पण दाखवायचं नाय आम्हाला
आमची
नशा पुरे
मग
म्हनतो म्हनतो
आम्हाला
नाचायचंय नाचायचंय
बनतो
सोन्याचं अन् गातो नाचतो स्वच्छंदी स्वच्छंदी’
न हरलेल्या आणि न हरवलेल्या तरुणांना जाणून घेण्यासाठी
मुळातूनच लेख वाचा लोकरंग ३/१०/२०२१
Thursday, 17 June 2021
सद्धभावनांचं सायन्स
यावर्षीच्या अक्षर दिवाळी
अंकात डॉ आनंद नाडकर्णी याचा सद्धभावनांचं सायन्स हा मेंदूची कार्यपध्द्ती समजावून
सांगणारा लेख प्रसिद्ध झाला आहे. आदिम,प्रगत , उन्नत भावना म्हणजे काय? आणि
भावना कशी विकसित होते हे सोप्प्या पद्धतीने सांगितले आहे.
वाचे
बरवे कवित्त्व
कवित्त्वि
बरवे रसिकत्त्व !
रसिकतत्वीही
परतत्व
स्पर्श
जैसा !!
भाषे
पेक्षा सौंदर्य उलगडते ती कविता , कवितेला ग्रहण करणारी
रसिकता, रसिकतेला तत्त्वज्ञानाचा स्पर्श ही अनुभवाची चढती कमान
मानवामध्ये आदिम आणि प्रगत
या दोन भावनागटांची निर्मिती झाली. माणूस शारीरिक , सामाजिक दृष्टीने
एका जागी वसू लागला. वेदउपनिषदाच्या काळात जगण्याची व्यवस्था निर्माण केली.
बाह्यजगाचे आणि अंतःकरणाचा अभ्यास सुरु केला. मानवी अस्तित्वाचा अर्थ काय
इथपासून शेती उत्पादन कसे वाढवायचे यावर समाज चिंतन करू लागला. याचाच अर्थ
आदिम भावना वर प्रगत भावनांचा प्रभाव वाढू लागला. पण आदिम भावनांची
अभिव्यक्तीही विविध प्रकारे होऊ लागली. गटांमधील
सत्तास्पर्धा साम्राज्यामधील सं
मुळात आदिम ,
प्रगत , उन्नत भावना तयार कश्या होतात? मज्जापेशी ही
शरीरातील अत्यंत कार्यक्षम पेशी. ज्ञानेंद्रिय ,कर्मेंद्रिय यांच्यापासून
मज्जापेशी माहिती मिळवते. तिचे पृथ:करण करते जोडणी पुनर्जोडणी करते असे
वारंवार होते तेव्हा पृथ:करणाची एक वहिवाट होते. (Neuronal Pathways) बाह्य
आणि अंतर्गत अनुभवांना सामोरे जाणारी ही यंत्रणा सतत विकासशील असते.
ही यंत्रणा पुढे मागे तिची व्याप्ती कमी जास्त होत असते तिला मज्जालवचिकता
म्हणतात. आदिम भावना आणि प्रगत भावनांचा वहिवाटा तयार झाल्या. उन्नत
भावनांचे प्रोग्रामिंग अलीकडचे या भावनांचा जाणीवयुक्त सराव
जास्त करावा लागतो. राग येणे ही आदिम भावना आपोआप होते. रागाचे नियंत्रण
करायला प्रयत्न करावे लागतात .
आदिम ... प्रगत आणि उन्नत
भावनांचा प्रवास कसा होतो. अंधारात पडलेल्या लांब वस्तू मुळे आदिम भावना भय
निर्माण करेल. प्रगत भावना त्या वस्तूवर प्रकाशझोत टाकून साप आहे की दोरखंड आहे
याची खात्री करून घेईल. भयाचं मूल्यमापन , पृथ;करण करून त्यावर पर्याय
काढण्याच्या प्रक्रियेतून निर्माण होते निर्भयता. ही प्रगत विचारी
भावना. या साखळीतील उन्नत भावनेला म्हणतात अभय. म्हणजे भय निर्माण होण्याचं कारणच
न राहणे..
निओकॉर्टिकल
इमोशन्स (Neocortical Emotions ) संकुचित पणा पार करण्याबरोबर संतुलन
आणणा-या भावना आहेत. विशाल आणि व्यापक असा अनुभव मानवाच्या दृष्टिकोनाला वेगळी
खोली (depth) देणारा असतो. मानवाला जेव्हा अभय किंवा आस्था अश्या
माणसामाणसातील भेद मिटवणा-या भावना अनुभवाला येतात तेव्हा त्याचे फक्त
माणसाबोरोबरचे नव्हे तर संपूर्ण निसर्गाबरोबरचे नातेसुध्दा अधिक बोलके होते.
आदिम भावना न्यायाधीश होऊन
निकाल देतात. इतरांना किंवा स्वतःला शिक्षा करतात. प्रगत भावना सर्व पूर्वग्रहांना
ओळखतात,स्वीकारतात आणि जगण्याच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये त्यांची कमीतकमी बाधा
येईल असे पाहतात. तर उन्नत भावना माणसाला सर्व पूर्वग्रहांच्या पल्याड
नेणा-या असतात.
विज्ञानातील प्रगती मुळे
मेंदूच्या कार्याची माहिती पूर्ण दिसू लागली आहे. शब्द आणि व्यक्तिगत
अनुभवाच्या भावना रेखाटता येऊ लागल्या map काढता येऊ लागला.
consciousness is immaterial spirit not subject to physical
law
माणसांच्या मनामध्ये
आस्था , सहानुकंपा , परभावप्रवेश आशा भावना निर्माण होतात
तेव्हा मेंदूत घडणा-या घडामोडी.
1)
Medical Perfrontal cortex : दुसऱ्याच्या दृष्टिकोनाबरोबर स्वतःचा दृष्टिकोन
ताडून पाहणे
2)
Orbitofrontal Cortex : समोरच्या व्यक्तीचे सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ समजून
घेणे त्याचप्रमाणे शारीरिक वेदना समजून घेणे (अनुकंपा )
3)
Inferior Front Gyrus: समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव समजून
घेणे.
4)
frontal Operculum : दुसऱ्याच्या वर्तनामागील हेतू समजून घेणे.
5)
Anterior insula : स्वतःच्या भावना - विचाराची जाण
6)
Amygdala :भावना आणि आठवणींची सांगड.
7)
parietal Areas समोरच्या व्यक्तीची भावना आणि कृतींमागील अर्थ समजून घेणे.
समजलेला अर्थ स्वतःच्या शब्दात त्या व्यक्तीला सांगणे. याला म्हणतात
पॅराफ्रेंजिग.
8)
Temporal areas समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातील भाव टिपणे
9)Temporal
Parietal areas समोरच्या व्यक्तीच्या विचाराच्या प्रतिमा तयार
करणे.
दुसऱ्याच्या भूमिकेमध्ये स्वतः
उन्नत भावनांचे संस्कार झाले तर मेंदू बदलतो हे सिद्ध होऊ लागले आहे. पण मेंदुलवचिकता हे दुधारी हत्यार आहे. अतिशय प्रतिगामी , आणि विघटनवादी विचारांचे संस्कार सुद्दा मज्जापेशी करून घेऊ शकते.
मानवी मनाला स्वातंत्र्याची जशी आस आहे तशीच कुणाच्या
तरी आधाराने , छत्रछायेत राहावी अशी धारणा आहे.
मानवी मनाच्या ह्याच
गुणधर्माचा उपयोग करून दहशतवादाचे संस्कार करताना खालील भावनां आणि
विचारधारा रुजवण्याचे अभ्यासक्रम दहशतवादी संघटने कडून आखले जातात.
तरुणाच्या मनावर खालील विचार बिंबवले जातात.
१)
विनाशाचे समर्थन : जो नाश घडणार आहे तो अटळ नव्हे तर आवश्यक आहे.
त्यासाठी स्वर्गप्राप्ती , जिहाद अशी स्वप्न दाखवली जातात.
२)
मारूनच मारू : समोरचे आपल्याला मारणारच आहेत तेव्हा मारून
मरणे हाच पुरुषार्थ.
३)
शोषणाविरुद्ध लढा : आपण शोषित आहोत ही भावना निर्माण करणे
४)
ध्रुवीकरण : इतरांविषयीच्या द्वेष भावनेने एकत्रीकरण
५)
कृतिशीलता हिंसक कृती शिवाय ध्येय साध्य होणार नाही अशी शिकवण
कोणत्या भावनांना उन्नत भावना म्हणता येईल, बघा!
१)
आस्था
२)
करुणा
३)
तन्मयता
४)
समर्पण
५)
नम्रता
६)
कृतज्ञता
७)
निरपेक्ष त्याग
८)
निर्मळता
९)
क्षमा
१०)
निग्रह संयम
११)
सहिष्णुता
१२)
कैवल्य
उन्नत
भावनेचे सरळसाधे नाव आहे माणुसकी.
Sunday, 16 May 2021
चल , घे भरारी !
पूर्वेला उष:काल झाला आहे. नवीन दिवसाची सुरवात आहे. पवित्र एकमेव ध्येय,इच्छा घेऊन उडान भर. हारिल !
प्रबोधनमाला
व्याख्यानमाला २०२१ - निवडक प्रतिसाद
तिन्ही व्याख्याने सामाजिक जाणिवेची, आधुनिक
जगाची ओळख करून देणारी ,भविष्याचा वेध घेणारी,निस्वार्थ बुध्दीने समाजासाठी व देशासाठी कार्य करण्याची प्रोत्साहन देणारी ,विशेषतः
तरुणांना मार्गदर्शन करणारी होती.घरबसल्या व्याख्यान ऐकण्याची संधी दिल्याबद्दल संजीवनी
परिवाराचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.पुढील वाटचाली साठी संजीवनी परिवाराला शुभेच्छा.धन्यवाद!
श्री विश्वनाथ नाईक सोमाडी
अप्रतिम व्याख्याने
व तेवढ्याच ताकदीचे व्याख्याते. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांचे
अनुभवव कार्य पाहता आपण किती छोटे आहोत याचा प्रत्यय येतो.
श्री सुभाष भट्टे , सत्पाळा.
व्याख्यान हा आपला एक सुंदर उपक्रम आहे .दरवर्षी विषयांची विविधता
व नाविन्यता ही याही वर्षी होती.केळकर सरांचे आधुनिक तंत्रज्ञान ,अधिक कदम यांचे अतुलनीय
कार्य (खरं तर मराठी पाऊल पडते पुढे याचा सार्थ अभिमान वाटला).आणि अनिल काकोडकर यांचा
ग्रामीण व शहरी सेतू सारेच विषय छान होते वक्ते ही छान बोलले आणि श्रोत्यांची उपस्थिती
ही चांगली वाटली.
संजीवनी परिवाराचे आभार आणि कोणत्याही परिस्थितीत कार्यरत राहण्याच्या
तुमच्या मेहनतीला धन्यवाद!
सौ अनिता नाईक , वाघोली
तीनही व्याख्याने उत्तम झाली. संजीवनी परिवाराने नेहमीप्रमाणेच
विषय अनुरूप असे निवडले होते . सद्यस्थिती
वर्तमानआणि भविष्य यांची छान सांगड घातली गेली. तज्ञ व्याख्याते साधी राहणी आणि उच्च
विचारसरणी ,बरोबरच कृतीअसे होते. आधी केले आणि मग सांगितले, आदरणीय श्री. अधिक कदम
सर तर समर्पित जीवनप्रवास करीत आहेत.त्यांचे अनुभव ऐकतच राहावे असे वाटत होते. एका
वेगळ्या विश्वात आपण विहार करत होतो. इतक्या तरुण वयात त्यांनी ध्येयासक्तीचे परमोच्च शिखर गाठलेले आहे . त्यांच्या कार्याला तोड नाही
👌त्रिवार सलाम👏👏👏🌹🌹🌹आपल्या
संजीवनी परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼 पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा
👍
सौ भारती नाईक, कोफराड
फारच छान👌👌
पहिल्या व्याख्यानाची लिंक असेल तर पाठवा,काही
वैयक्तिक कारणांमुळे जॅाइन करु शकलो नाही.
श्री आशिष नाईक , साकोरे
संजीवनी परिवार,
आजच्या गुगल आणि यूट्यूब च्या जमान्यात
व्याख्यान ही गोष्ट, म्हटलं तर कालबाह्य होत चालली आहे. परंतु योग्य विषय व त्यावरील
वक्ता तसेच व्याख्यानाच्या निमित्ताने एकत्र येणे यातून बोधप्रद अशा अनेक गोष्टी मिळू
शकतात. सामाजिक संपर्क वाढल्याने विविध घटकांचे एक नेटवर्क तयार होते आणि सामाजिक बांधिलकीही
वाढते. ही गोष्ट युट्युब वर एकट्याने वक्त्याला ऐकणं किंवा बघणं यातून साध्य होऊ शकत
नाही. एक तासाचे व्याख्यान म्हणजे साधारण हे 200 पानं वाचून मिळेल एवढे ज्ञान असा एक
ठोकताळा. संजीवनी परिवार गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना
आपल्या भागात बोलावून बुद्धिजीवी वर्गाची भूक भागवण्याचं उत्तम कार्य करते आहे. त्याबद्दल
तुमचे कौतुक.
यावर्षीची पहिली दोन व्याख्याने मला ऐकता
आली तर काही व्यक्तिगत अडचणीमुळे डॉक्टर अनिल काकोडकर यांचं व्याख्यान मला जॉईन करता
आलं नाही. आयटी उद्योगात दहा एक वर्ष काम केल्यामुळे इंडस्ट्री 4.0 या विषयातील घडामोडींबद्दल
मला माहिती होती. डॉक्टर भूषण केळकर यांनी हा विषय सामान्यांसाठी बऱ्यापैकी सोपा करून
सांगितला. त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांवर वेगळे मत असू शकतं. त्यादिवशी आयटी
इंडस्ट्री मधले अनेक तरुणही सदर व्याख्यानाला जॉईन झाले होते. मला असं वाटतं अशा व्याख्यानांनंतर
काहीतरी प्रक्रिया सुरू व्हायला हवी. तरुणांना या विषयी काय वाटतं, होऊ घातलेला बदल
किती वास्तव आणि किती फुगा, या बदलातून आपल्या तरुणांसाठी काय नवीन संधी असू शकतात
या विषयी मंथन सुरू व्हायला हवे. मला खात्री आहे या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजबांधवांना
अजून जास्त माहिती असेल. ती माहिती action मध्ये कशी convert होईल यावर whatsapp ग्रुपवर
का होईना पण चर्चासत्रे व्हायला हवीत. व्यक्तिगत पातळीवर मला ब्लॉक चेन तंत्रज्ञानाबद्दल
शिकण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. या व्याख्यानानंतर मी IIT कानपूर च्या
Professor ची एक lecture series बघण्यास सुरुवात केली.
अधिक कदम यांचं कार्य अदभुत आहे. पेलेट
गनच्या छऱ्यातून आंधळे झालेल्या 1270 मुलांना परत दृष्टी मिळवून देणं काय, काश्मीर
सारख्या धगधगत्या प्रदेशात 300 अनाथ मुलींचं हॉस्टेल काय.. राष्ट्र, धर्म, राजकारण
या सर्व सीमा ओलांडून ते जे कार्य करतात त्याबाबत व्यक्त व्हायला माझ्याकडे शब्द नाहीत.
त्यांच्यासारख्या माणसाकडून स्फूर्ती घेऊन आपण निदान आपल्या गोतावळ्यातील, समाजातील
काहींच्या व्यथा कमी करता येतील तर प्रयत्न करावेत इतकेच.
तुम्ही फुल टॉस दिल्याने माझी प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणे लांबली आहे...जित्याची खोड...😊
श्री
राजेश नाईक, बोळींज,
०३.०५.२०२१.
खरोखरच खूप छान होती सगळी व्याख्याने
.
डॅा . केळकर यांनी झपाट्याने बदलत असणारे
तंत्रज्ञान युगासोबत आपण कसे स्वतःला त्याबरोबरीने समृध्द करतो हे खूप छान सांगितले
.
श्री. अधिक कदम यांच्या बद्दल अभिप्राय
देणे म्हणजे जणू काजव्याने सु्र्याची बरोबरी करणे ... शब्दच अपुरे पडतील .
डॅा. काकोडकर यांनी सांगितलेली “सिलेज
“ ही संकल्पना खुपच भावली मनाला, या संकल्पनेला अनुसरुन आपण आपल्या परिसरात काही करु
शकतो का असा विचार मी करीत आहे .
संजीवनी परिवाराचे खूप खूप धन्यवाद!
श्री मंगेश नाईक, गास.
पहीले दोन्ही व्याखान अतिशय सुरेख अभिप्राय
अगोदर दिला आहे
शेवटच (कालच) काही ऐकु शकलो नाही 🙏क्षमस्व
🙏
श्री विलास नाईक, भीटारे.
व्याख्यानं खुपच छान झाली ,काही अपेक्षा
तरी कळवा, धन्यवाद!
श्री राजाभाऊ नाईक, वावळी.
Aapanch tini lectures che marm
atishay changalya bhashet sangitale aahe.
Yapalikade aanakhi Kay sangnar. Practically first lecture aapalya students na
beneficial aahe. Ya fieldshi update asalelya Atharva sarkhya yuvakachya
madatine puna ekada recorded lecture
students na aikavayala harkat nahi.About second lecture, it is on Deshprem.
Aapala jiv dhokyat ghaloon Kashmir sarkhya thikani Ashram or school chalvanarya
Adhik Kadam na Salam. About third
lecture Dr Kakodkar --Aapalya mandalina kiti benefit gheta yeil he aatach
sangane kathin.
श्री वसंत जोशी , भुईगांव.
पहिल्या व्याख्यानातील तंत्रज्ञानामुळे
नोकरी/उद्योग व्यवसायवर होणार म्हणून निर्माण झालेला प्रश्न तिसऱ्या व्याख्यानाने नवतरुणांना
उद्योग/व्यवसायासाठीचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले आहे . तसेच दुसऱ्या व्याख्यानात
ईश्वरनिष्ठां/परस्पर विश्वासाचे मार्गदर्शन आहे असे मला वाटते.
श्री यशवंत पाटील,उमराळे.
पहिले व तिसरे व्याख्यान एक मेकांना पूरक
असे होते व तरुण पिढीला चांगले मार्गदर्शन
मिळाले असे वाटते. दुसरे व्याख्यान खरोखरच अचंबतीत करणारे व एखादी व्यक्ती व संस्था
किती अविश्वसनीय असे कार्य करू शकते याचे दर्शन
झाले. अश्या कार्याला आपण सर्वांनी जे काही शक्य आहे जसे की आर्थिक मदत तसेच अधिक कदमांनी सांगितले तसे त्या संस्थेतील
विद्यार्थांना आपल्या इथे उच्च शिक्षणासाठी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.
संजीवनी परिवार ने ह्या वर्षी देखील कारोना
च्या महामरित खूप सुंदर अशी व्याख्यान माला यशस्वी पणे आयोजित केली त्याबद्दल आपण सर्वांचे
हार्दिक अभिनंदन व आभार. 💐🙏🙏🙏
श्री मनोज नाईक, कोफराड.
Good
morning 🌹🙏
आपल्या
संजीवनी परिवारचे आभार
सर्वच
विषय छान होते वक्ते सुद्धा परीपुर्ण अभ्यासु
होते 👌
श्री जयेश नाईक, वटार.
खूपच
छान. ह्या कोरोना काळात यशस्वी पणे आयोजन केल्या
बद्दल संजीवनी परिवाराचे हार्दिक अभिनंदन.💐💐💐💐💐
श्री संजू नाईक, वटार.
सर्व
व्याख्यानाचे परीक्षण योग्य शब्दात केले आहे धन्यवाद!
श्री अनंत पाटील , भुईगांव.
तिन्ही
व्याख्याने अप्रतिम झाली.
श्री भगवान नाईक, सोमाडी.