गौतमबुद्धाला विचारण्यात
आलं एकटं चालणं चांगलं की कुणाच्या सहवासात चालणं चांगलं ?
बुद्ध म्हणाले
मूर्खाबरोबर चालण्यापेक्षा एकटं चालणं चांगलं. मूर्खाशिवाय दुसरं
कोण तुमच्याबरोबर चालणार नाही असंही त्यांना म्हणायचं असावं.
आपल्याकडील काही प्रचलित गोष्टी
सांगतो. जेव्हा तुमाला प्रवास छोटा आणि जलद करायचा असेल तर एकट्याने
चाला. तुमचा प्रवास लांबचा असेल तेव्हा सोबतीने करा. परंतु तुमच्या सोबत कोण चालतं
हे कधीही महत्वाचं! नेहमी सोबत असणे ही चांगली गोष्ट नाही. .खूपदा एकत्र राहणे
त्रासदायक ठरू शकते.
या जगात आपण एकटेच येतो आणि
एकटेच जातो. अगदी जुळे भावंडं सुद्धा. जर एकटं राहण्याचा अनुभव नसला तर
एकत्रित राहणे त्रासदायक असू शकते. इतर प्राण्याची ओळख त्याच्या कृतीवरून ठरते.
मनुष्य असा एक प्राणी आहे की तो कृतीशिवाय राहू शकतो.आपलं फक्त अस्तित्व असू
शकते. आपली कृती विवेकपूर्ण आणि न्यायपूर्ण असू शकते.
सामान्यतः जेव्हा अनेक लोक एकत्र
येतात तेव्हा काही उद्दिष्ट , हेतू ठेवून कृती करतात. कधी कधी त्याला गर्दीचं
स्वरूप येते.
एकटं असणे म्हणजे तुमचा स्व
जपणे. माणूस स्वतःला अनेक गोष्टीत विभागून घेतो स्वतःची ओळख हरवून घेतो
आपल्या धर्मात तर आत्मा, परमात्मा, अहंकार अश्या अनेक संकल्पना
वापरतात.
स्वयमेव असणे म्हणजे जे चांगलं
असेल ते मी,माझं आहे. जर काही वाईट असलं तरी ते माझं आहे. दिवसाचे
चोवीस तास तू उत्तम राहू शकतो का ?
माणसा मध्ये चांगल्या आणि वाईटाची क्षमता पुरेपूर भरलेली असते.
माणूस उत्क्रांतीच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यांनी ठरवलं तर तो एका
ठिकाणी स्वस्थ बसू शकतो. कृतीविषयी निर्णय करू शकतो. जेव्हा व्यक्ती एकत्र येतात
तेव्हा त्याला आम्ही म्हणतो. परंतु समूह, एक एकट्याचा बनला असतो.
जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा
त्याचं श्रेय घेण्यात सर्व पुढे असतात. वाईट गोष्टी घडतात तेव्हा कुणालातरी दोषी
ठरवलं जातं. किंवा दैवाला दोष दिला जातो.
जेव्हा ते चांगले असतात तेव्हा
अभिमानाने चांगुलपणाचं श्रेय घेतात. जेव्हा काही चुकीचं , वाईट होते तेव्हा
अपश्रेय इतरांना देतात.
जर मला स्वतःला जाणीव झाली की
माझ्यात चांगुलपणाची क्षमता आहे. आणि दुस-या क्षणी वाईट वागण्याची
तितकीच वृत्ती आहे.तर हीच जाणीव हळूहळू वाईटपणा कमी करेल.
मी जसा चांगला आहे तसा वाईट ही मीच आहे. मीच यशस्वी आहे मीच अपयशी आहे. हे
उमजून घ्यावं लागेल.
आपलं व्यक्तिमत्व दुहेरी तर नाहीना.
दुहेरी असणे हे आजारपण आहे. माणूस एकांतात बसून स्वतःला बदलू शकतो, हा
माणसाचा विशेषाधिकार आहे. तुम्ही जर ध्यास घेतला तर झटपट बदल घडवून आणू शकता.
माणसाच्या उत्क्रांतीला मर्यादा नाही. एकत्र येण्या अगोदर जर एखाद्याने स्वतःसाठी
वेळ काढून विचार करायला हवा जीवन कालच्या पेक्षा कसं चांगलं असेल.
बहुतेक लोक त्यांच्या गरजांसाठी, गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात.
काही लोक आपली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात आणि काही
लोक खाण्यापिण्यासाठी एकत्र येतात. एकटे राहू शकत नाहीत. हेही एकत्र न
येण्याचं कारण असू शकेल.
ठराविक कालावधी नंतर प्रत्यकाने एक
केलं पाहिजे.
२४ तासासाठी टीव्ही , फोन, वाचन या
गोष्टीपासून मोकळं केलं पाहिजे आणि एकांतात खोलीत बसून. जाणीवपूर्वक मनाचा स्वभाव
तपासाला पाहिजे.
मन कसं चंचल आहे हे तुमच्या
लक्षात येईल की
एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. तेव्हा
आपण माणूसपण हरवून बसतो.
जर तुमच्या स्वतः विषयी जाणिवा
प्रगल्भ असतील तर तुमचं एकत्र येणे जीवन समृद्ध बनवेल. ह्याचाच अर्थ जाणीवपूर्वक
एकत्र येणं.
(सदगुरु यांच्या व्हिडीओचे स्वैर भाषांतर , त्रुटी माझ्या हे सांगणे न लगे. )
No comments:
Post a Comment