Tuesday, 25 January 2022

नोइंग डुईंग आणि बिइंग !!

 मूळचे मुंबईचे,हार्वर्ड बिझनेस स्कुल, बोस्टन  चे डीन डॉ श्रीकांत दातार  यांची लोकमत दीपोत्सव २०२१ मध्ये देवेंद्र दर्डा / अपर्णा वेलणकर यांनी मुलाखत घेतली आहे. मुळातूनच वाचायला हवी.  खास करून तरुण मंडळींनी!  

मुलाखतीचं शीर्षक आहे. " नोइंग डुईंग आणि  बिइंग !!  मुलाखतीतील काही अंश. 




 दातार सरांनी त्याचं बालपण, आईवडील , आजोबांचे संस्कार याबरोबर शिक्षण, व्यवसाय क्षेत्रातील अनुभव सांगितले आहेत.   आयआयएम  अहमदाबाद विषयी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात. " तिथे जो कॅंपस मिळाला त्या कॅंपसचा मी आजन्म ऋणी आहे. कारण घडत्या वयात मला तिथे मिळालेले वातावरण! चैतन्याने सळसळणारे वर्ग, नवीन शिकण्याच्या - नव्या विचारांच्या वेडाने भारावलेले वातावरण, बुद्धीला सतत धार लावण्याची आव्हानं अंगावर फेकणारे शिक्षक आणि त्यांच्या अपेक्षांना आपण पुरं पडावं म्हणून झटणारे विद्यार्थी... 
अभ्यासातून निष्कर्षांना येणे. आपली मतं तयार करणं, भूमिका घेणे, इतरांसमोर प्रश्न-उपप्रश्नांचा सामना करून ती भूमिका पटवून देता येणं. कसं शिकावं यांची रीत-मर्म शिकणं ... हे मला त्या कॅंपसमध्ये भरभरून मिळालं"  ते पुढे म्हणतात. 
अह्मदाबादहून परतताच टाटा अडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये दाखल झालो. अतिशय तरुण वयात मला थेट रतन टाटांबरोबर काम करायला मिळालं. टाटा ग्रुप मध्ये काम करताना मॅनेजमेंटचा मानवी चेहरा अनुभवता आला. आजही जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती या यादीत  या माणसाचं नाव कधीही दिसत नाही, पण उद्योगक्षेत्रात असनूही समाजाचा आदराला अखंड पात्र ठरलेल्या उद्योगपतीमध्ये रतन टाटा सदैव अग्रस्थानी राहिलेले आहेत.  
त्याच वेळी स्टॅनफर्ड सारख्या ख्यातनाम विद्यापीठात शिष्यवृत्तीसह थेट प्रवेश मिळालेला पहिला भारतीय विद्यार्थी होतो. अमेरिकेतल्या विविध नामवंत विद्यापीठामध्ये काम करून १९९६ मध्ये ते हार्वर्ड मध्ये आले. २०२० मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या ११३ वर्ष्याच्या इतिहासातील अकरावा डीन म्हणून नियुक्ती झाली. यशाचं श्रेय ते आईवडिलांचे संस्कार , देवाची कृपा, नशिबाची साथ,लाभलेले उत्तम प्रोफेसर्स, अद्वितीय सहकारी आणि मनापासून केलेले कष्ट. 

त्यांनी आणि त्यांच्या दोन सहकारी मिळून एक संशोधक प्रकल्प केला. त्यावर एक पुस्तकही आहे. "रिथिंकींग एमबीए"  उद्योगांना राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर उद्योगाच्या भावी व्यवस्थापकानी नोईग आणि डुइंग यांच्या बरोबरिने बीइंग हे नवं कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. 
तुमच्यावर दिलेली जबाबदारी निभावण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत ज्ञान, रचना-व्यवस्था, फ़्रेमवर्क्स. सिध्दांत याची माहिती म्हणजे "नोइंग" कौशल्य. 
जे माहिती आहे त्या आधाराने अपेक्षित कृती करता येणे त्यासाठी क्षमता, कौशल्य असणं म्हणजे "डुईंग"!
हे बिइंग म्हणजे काय? मराठीत सत्व, स्वत्व! माणूस म्हणून संबंधित व्यक्तीची नीतिमूल्य-श्रद्धा-विचार काय आहेत ,वृत्ती कशी आहे, तिचा विश्वास कशावर आहे, बांधिलकी कशाशी आहे , तिच्या जगण्याचा हेतू काय, तिला आयुष्यात काय साध्य करायचं आहे, समकालीन जगाचं त्या व्यक्तीला किती भान आहे, त्याबद्दल तिची मतं काय  या सगळ्याचा समुच्चय म्हणजे "बिइंग" ! त्या व्यक्तीचं स्वत्व! नैतिक-अनैतिकांच्या धारणा, उचित-अनुचित या बाबतचा आग्रह, समवेतच्या माणसांशी वागण्याची-त्यांना वागवण्याची रीत, हेतू आणि दिशा, निःपक्षपाती बांधिलकी, प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी म्हणजे केवळ नीतिकथांमधला एवेज नव्हे. नव्या व्यावसायिक जगात यशस्वी होण्यासाठी या सगळ्या गोष्टीची प्रत्येकाला गरज पडणार आहे. 
ते संशोधनाच्या आधारे सांगतात, चाकोरीबाहेरील विचार करण्याचं कौशल्य प्रयत्नांती अवगत करता येते. डिझाईन थिंकिंग म्हणजे विचार कसा करावा याची पूर्व सिद्ध अशी रचना. विचाराच्या विशिष्ट पाय-या ओलांडत पुढेपुढे गेलात,तर तुम्हांला अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नावर चाकोरीबाहेरचं उत्तर शोधात येऊ शकतं. 
हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या इमारतीत गांधीजींचं मोठं तैलचित्र लावलेलं आहे आणि त्याशेजारी गांधीजींनी सांगितलेल्या सात महापापची यादी लावलेली आहे. 
१ कर्म न करता संपत्ती 
२ विवेकाविना सुखोपभोग 
३ नैतिकतेविना व्यापार 
४ मानवतेविना विज्ञान 
५ शिलाविना ज्ञान 
६ त्यागाविना भक्ती 
७ तत्वविना राजकारण
नवीन तरुण वर्गाविषयी ते म्हणतात. 
नव्याने वर्क फोर्स मध्ये येणा-या तरुण मनुष्यबळाला केवळ नोकरी आणि पगार नको असेल. आपल्या जगण्याला काही अर्थ देऊ शकेल अशा आव्हानात्मक कामाचा शोध ही पिढी घेईल. आजचं जग जस आहे, तसं ते असता कामा नये असा त्यांचा आग्रह आहे. आणि हे कुणी दुसरं येऊन करणार नाही,ही जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागणार यांचंही भान त्यांना आहे. 
ही मुलं  बिइंगला महत्त्व देतील हे नक्की :. As per our talk forwarding.

No comments:

Post a Comment