Saturday, 1 January 2022

नवं कोरं ताजेतवाने वर्ष

 

 

मला प्रश्न पडतात नवीन वर्ष म्हणजे नेमकं काय? त्याचा अर्थ काय?  जे पूर्णपणे नवीन कोरं ताजेतवाने आहे. या पूर्वी कधी घडले नाही.  

 

या सृष्टीत नवीन काही घडत नाही हे आपणास माहीत आहे,तरी आपण नवीन म्हणतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. खरोखर नवीन वर्ष आहे का ? की त्याच त्या जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो. त्याच जुन्या सवयी , त्याच जुन्या परंपरा , त्याच जुन्या रूढी गेली अनेक वर्ष पाळतो त्याच याही वर्षी पाळणार!

 पूर्वी कधी पाहिलं नाही, कधी केलं नाही असं तुम्ही करणार आहात का? हा महत्वाचा प्रश्न आहे. जर तुम्ही असं केलं,   येणा-या प्रत्येक दिवशी तुम्ही नवीन कधीही पहिल्या नाहीत अश्या गोष्टी  करण्याचा प्रयत्न करणे  याचा अर्थ  मेंदूला पूर्वग्रहापासून , त्याच्या स्वभावापासून, श्रद्धापासून, मतमतांतरापासून मुक्त करणे  खुल्या मनाने सामोरे जाणे. 

 
आपलं जीवन उथळ आणि वरवरच आणि फारच कमी अर्थपूर्ण आहे. आपण हे सर्व बाजूला ठेवून खरोखर नवीन वर्ष सुरू करू शकतो का? तसं झालं तर जीवन  आमूलाग्र बदलेल. 
आपल्याला आवडो किंवा न आवडो, आपण जन्माला आलो आहोत, सुशिक्षित आहोत. तो अडथळा  बनू देऊ नका. 

आपण आपल्या जीवनाची संपूर्ण दिशा बदलू शकतो का? ते शक्य आहे का? की आपले विचार,  आपले जीवन अशा गोष्टींनी भरतो  ज्यामुळे संकुचित, निकृष्ट, निरर्थक जीवन जगतो  

 

सर्व गिरजाघर, मंदिरांमध्ये आणि उर्वरित जगात  - नवीन वर्ष्याची सुरवात , जुन्या पद्धतीने, परंपरेने, पूजाअर्चेने  सुरु आहे. आपण हे सर्व सोडून स्वच्छ को-या  पाटीवर नव्याने सुरुवात करू शकतो आणि त्यातून काय निर्माण होते ते  आपल्या अंतःकरणाने आणि मनाने पाहू शकतो का?

 

 

 

(1 जानेवारी 1985 मद्रास येथील  श्री  जे. कृष्णमूर्ती  पहिली प्रश्न-उत्तरा मधून. )

No comments:

Post a Comment