व्यवस्थापन गुरु रॉबिन शर्मा यांनी वार्षिक भाकीत वर्तवणारी आणि उपाय सुचवणारी मेल पाठवली आहे. त्याच स्वैर भाषांतर ,
मझ्याकडे भविष्य सांगणारा गोलक नाही,
पुढे काय आहे हे खात्रीने
सांगणारी दिव्य दृष्टी नाही. शक्ती नाही.
तुम्हाला सतर्क ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या धोक्यांपासून
संरक्षण करण्यास मदत व्हावी या भावनेने ,
भाकीत केलं आहे.
जागतिक अर्थव्यवस्था चांगली होण्या
ऐवजी ती आणखीनच बिघडेल. कर्जाचं प्रमाण
वाढलं आहे, डबघाईला आलेल्या
कंपन्या आणि दिवाळखोर संस्था आहेतच. महागाई
वाढतच आहे , वस्तू,सेवा अधीकच महाग होतील
अस्थिरता लोकांना निराश आणि संतप्त करेल. यामुळे समाजातील आधीच
खोलवर पोसलेली विषमतेची दरी अधिक रुंदावेल. काही मुद्द्यांवर तीव्र मतभेद होतील
आणि विरोधकात भडका उडेल.
ग्राहकांना उत्कृष्ठ सेवा, वस्तू
पुरवणार नाहीत, ज्यांची कार्यप्रणाली काळाशी सुसंगत नाही.
ज्या व्यवसायाचं वेगळेपण ठसलेलं नाही असे व्यवसाय बंद पडतील. जे कामगार नवीन कौशल्य शिकणार नाहीत,वेगवेगळ्या संधी असूनही बेकार होतील.
ओला आणि सुखा दुष्काळ, अति
उष्णता, (globle warming ), प्रदूषण इत्यादी आपण अनुभवत असलेल्या पर्यावरणीय
समस्या वाढतील. याचा अंदाज तज्ज्ञानी 50 वर्षांपूर्वी वर्तवला होता. ती आज खरी ठरली आहे.
लोकांची त्यांच्या कामाशी असलेली रुची पुन्हा
पुन्हा तपासावी लागेल. धकाधकी ओढाताणा यामुळे कुटूंब
समाज यावर विशेष लक्ष द्यावे लागेल, कौटूंबिक सामाजिक
स्वास्थ टिकेल असे उपक्रम करावे लागतील. कामाचे वेगवेगळया पद्धिती विकसित कराव्या लागतील, साथीच्या वेळी
दिलेली घरातून काम करण्याची सुविधा, नेहमीसाठी स्वीकारावी
लागेल. तसे बदल घडवून आणले नाहीतर, कुशल , हुशार कारागीर कामगारांना गमावण्याची वेळ येईल.
हे सर्व गोष्टी वाचल्यानंतर तुम्हाला निराशा येईल. परंतु आपण मनुष्य प्राणी
आहोत. परिस्थितीशी जुळवून घेणे, नवीन गोष्टीचा शोध लावणे, कठीण परिस्थिती बदलण्याचे आणि भरभराटीचे मार्ग शोधत असतो.
आपल्यातील सर्वोत्तमता नवीन शोध लावतील ,
त्यातील अडथळे आणि उपाय शोधतील. आणि
भविष्यात जगण्यासाठी , काम करण्यासाठी संपूर्ण
नवीन उत्तम जग निर्माण करतील.
येणा-या कठीण काळात प्रगती साधण्यासाठी
काही सूचना!
१. वैयक्तिती कुशलतेवर लक्ष केंद्रित करा, पुढील आव्हानाचा विचार करून नवीन
कौशल्य शिका.कारण आपणच विकासाचे व विजयाचे शिल्पकार
असणार आहोत.
एक लक्षात ठेवा: जसजश्या नवीन गोष्टी आत्मसात कराल
तसतसे तुम्ही अधिक कार्यक्षम व सक्षम
व्हाल आणि चांगल्या पद्धतीने कार्य कराल.
२. गोष्टी साध्या सोप्प्या आणि सरळ ठेवा. प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवा. अहंकार
टाळा. इतर सर्व गोष्टी कडे दुर्लक्ष करून आलेल्या
संधीचं सोनं करण्यासाठी बुद्धीची चमक दाखवा.
३. मनाची कवाडं उघडी ठेवा , संकुचित,
झापडबंद मनामुळे अनेक संधी गमावल्या जातात. नवीन लोक, नवीन उपक्रमात रुची दाखवा. नवीन ज्ञान,विज्ञान जाणून
घ्या. प्रवास करा बहुतेकजण असुरक्षित भावनेत अडकून पडतात तिथे नवीन मार्ग शोधून काढा. गोंधळाच्या स्थितीचा उपयोग करून
सुस्थिती निर्माण करा
४. तंदुरुस्तीची विशेष काळजी घ्या. कठीण
ताणतणावाच्या प्रसंगी धडधाकट माणूस अधिक सर्जनशील, परिस्थितीशी
जमवून घेऊ शकतो. आहार संतुलित ठेवा. चांगली झोप घ्या , टीव्ही
वरील बातम्या टाळा. जीवनात संपूर्ण तयारीने उतरा कोणतीही सबब सांगू नका.
५. वातावरण पोषक बनवा. बिनडोक सोशल
मीडिया आणि बातम्या टाळा. बदलत्या परिस्थितीत
यशासाठी जे आवश्यक आहे त्याचा अभ्यास करा. बाकी सर्व विसरून जा.
सज्ज व्हा , आशावाद सोडू नका ,
जलदगती आणि चपळता अंगी बाणवा. निष्ठा
मजबूत करा. तुमची प्रतिभा,चांगुलपणा, कला
, जीवन लोकांना कळू द्या.
No comments:
Post a Comment