Monday, 5 September 2011

विद्यार्थी मेळावा

मंथन कार्यक्रमा अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात काम   करण्यासाठी कोर टीम बनवण्यात आली.
शैक्षणिक कार्यक्रमा विषयी चर्चा करताना आलेले काही मुद्दे
समाजातील विध्यार्थ्यासाठी एक व्यासपीठ असावे, विध्यार्थ्याना आपले यश , अनुभव इतर विध्यार्थ्याना सांगावयाची  (Knowledge sharing) संधी मिळावी ,वर्षातून कामित कमी दोन ते तीन मेळाव्याचं  आयोजन करण्यात यावं
संध्या विद्यार्थाचही ग्लोबलायझेशन होत आहे. वेगवेगळे  अभ्यासक्रम ,स्पर्धापरीक्षा यात निभाव लागण्यासाठी विध्यार्थानी काही गुणांची  कास धरायला हवी.

आपल्या मधील 'स्व' ची ओळख असवयाला  हवी , म्हणजेच slef awareness मला काय  आवडते  कोणत्या विषयात गती आहे,कोणत्या विषयावर लक्ष केन्द्रित करायला हव ही जाण.

समस्याची उकल म्हणजे (Problem solving Skill) एखादा प्रश्न कसा सोडवावा,काय पर्याय उपलब्ध आहेत याची जाणीव वाढवणे
निर्णयक्षमता (Decision making)  पटकन  निर्णय कसा घेता येइल, त्याची फलित काय? तोटे काय? याचा लेखाजोखा
परिणामकारक संवाद (Effective Communication)  आज संवादास विशेष महत्व आहे, आपला मुद्दा , विचार चांगल्या रितीने मांडने , पटवून देणे.
हुशारी बरोबर भावनांचा समतोल साधणे महत्वाचे
जीवघेण्या स्पर्धे मुले विद्यार्थी प्रचंड तणावा   खाली वावरत असतो, या ताणावाचा  निचरा करता आला पाहिजे विपरीत परिणाम टाळण्याचे  कसब यायला हवं.
ह्या सर्वाचा विचार करून टीम कामाला लागली व्  २६ जूनला आप्पा फुलारे  होंल वाघोली येथे दहावी पुढच्या   विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले , सर्व गावा मधून दहावी नंतरच्या  विध्यार्थ्याची यादी बनवली. श्री अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करणार होते परंतू ठरल्या प्रमाणे घडतच असं नाही याच प्रत्यंतर आले. चाणक्य मंडलाने या वर्षी UPSC झालेले  श्री स्वप्निल बावकार उपलब्ध करून दिले.दहावी पासून ते स्पर्धा परीक्षा पर्यंतचा मोठा कन्व्हास त्यानी कव्हर केला. वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. करियरच्या वाटा दाखवल्या.


 विद्यार्थ्यांचा सहभाग वाखाणण्या   सारखा होता. काही विद्यार्थ्यांनी आपले विचार छान पद्धतीने  मांडले.






विद्यार्थी मेळाव्यांत, BAMS परीक्षेत  महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक व्  सुवर्ण   पदक  मिळवणाऱ्या कु. मिनल शंकर नाईक,राणेभाट हिचं कौतुक करण्यात आले. मिनलनी MD CET मध्ये पाचवा क्रमांक पटकावला व् सध्या MD करत आहे.
  


This is beginning
We have promises to keep, and miles to go before We sleep.

Saturday, 6 August 2011

वृक्षांनी संजीवानिला काय दिले ?

वृक्ष हे भुतलावारील देवदूत आहेत. मानवाच्या जन्मापासून मृत्युपर्यंत साथ देणारा मित्र म्हणजे वृक्ष. पांगुळगाडा ते तीरड़ीपर्यंत साथ देणारा सोबती. दगड मारणार्‍याला ही  मधुरफळ देणारा, पाणि देणार्‍या व् खांडावयास आलेल्या दोघानाही सारखीच सावली देणारा तत्त्वज्ञ, मार्गदर्शक म्हणजे वृक्ष.
निसर्गाच्या व्यवस्थापना मध्ये वेगवेगळी  चक्र सुरु असतात. शाळेत असताना शिकलेल जलचक्र आठवत का ?.  ह्या सगळ्या चक्राकार कृतिमुळ  मर्यादित साधनांची अमर्याद  कालापर्यंत वापरण्याची व्यवस्था निसर्गाने केलेली आहे .


माणूस उच्छवासातुन  कार्बन डायऑक्साइड  सोडतो, झाडं तो  ग्रहण करतात व् त्यानी सोडलेला प्राणवायु माणूस ग्रहण करतो. माणसाच्या वाढ़ीसाठी आवश्यक असणारी जीवनसत्व व् खनिज, झाडा पासून मिळत असतात (फळ ,भाजीपाला कडधान्य) ,जमिनीची धुप व् भुगार्भातील पाण्याची  पातळी    टिकविण्याचे  काम झाडं
करत असतात. असंख्य पक्षांच व् प्राण्यांच झाड हे आश्रयस्थान  आहे. आशी ही झाडं   त्यांच्या सान्निध्यात आलेल्याना न बोलता  शिकवतात.

 
    ज्या झाडाला आपण स्थानिक भाषेत करज म्हणतो 
 ह्या वृक्षाची चैत्रा मधे पालवी नीट पाहिली तर हिरव्या  रंगाच्या सर्व छटा    आपणास दिसतील   
 तसेच पिंपळाचे 
 पाना ची पूर्ण गळती होऊन पिंपळ निष्पर्ण होतो आणि   
 नवीन पालवीच्या रूपाने रंगाची  उधळण सुरू होते.सुरवातीला   
लुसलुसीत कोवळी तांबुस पाने हळूहळू  पोपटी  रंग घेतात  हिरव्या रंगाची  रूपॅ दाखवत गर्द हिरवी  होतात.    
विविध रंगाच्याविविध सुवासाच्या फुलांनी मानवाचं जीवन अधिक सुंदर  अर्थ पूर्ण बनवले आह



झाडांची हिरवी पान म्हणजे   त्यांचा  अन्न कारखानाच असतो.
  हवेतील    कर्बवायु सूर्यप्रकाश घेऊन अन्न प्रक्रिया सुरू होते, 
 साखर ,ग्लुकोज इत्यादी वेगवेगळ्या  स्थिति मधून हा प्रवास  होतो,
शेवट कणीस,  फळ या रूपात  होतो.





अश्या ह्या झाडांना दर रविवारी भेटण्यातून संजीवनी ला प्रेरणा मिळत असतेनवनवीन उपक्रमाला  चालना मिळत असते 
 आणि मिळत  असते प्रसन्नता अनलिमिटेड

श्रीमत शंकराचार्य मंदिरा समोरील  पिंपळ 

आपण  या !!!. भेटत राहू  या दर रविवारी विसरता.