Wednesday, 25 July 2018

आषाढी एकादशी - बोलावा विठ्ठल



आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंचम निषाद गेली तेरा वर्ष बोलावा विठ्ठल या अभंगवाणीचे आयोजन करत आहे. 
कालचा कार्यक्रम बहारदार झाला, ज्ञानेश्वराला वंदन करून जय जय रामकृष्ण हरी गजराने सुरु झालेली अभंगवाणी टाळचिपळ्या च्या संगतीने आलेला श्रोत्याला  वारकरी करून नादवून गेली. 
सर्वच कलाकार , ते गायक असुदे की वादक सर्वच शिखरस्थ ( श्री शशी व्यासाचा शब्द) कलाकार. प्रत्येकाचा सादरीकरण उत्तम झालं त्यांच्या गायकीने सूरमय विठ्ठल साकारला. कलकत्त्याच्या कौशिकी चक्रवर्तींनी सर्वांची मन जिंकली. त्यांनी गायलेले अभंग उत्कृष्ठ होते की त्यांचं निवेदन. खूप मजा आली. मराठी न येणारी  कौशिकी फक्त अभंग सादर करण्यासाठी आलेली एकमेव गायिका असावी. त्यांच्या बोलण्यातून आपल्या गुरुविषयी असलेला आदर , सहकलाकारा कडून शिकणं , त्यांना गुरुस्थानी मानणं, त्यांना नमन करून अभंगाला सुरवात करणं, भाषा आणि उच्चार शास्राचे महत्त्व अधोरेखित करणं, काही शब्द , उच्चार नवीन असल्याचं सांगून आपल्या मर्यादा ची जाणीव करून देणे. त्याच बरोबर या मर्यादांवर मात करून उत्कृष्ठता  प्रकट करणे. नेमक्या शब्दात पंडित भीमसेन जोशी , सुश्री किशोरीताईंची महती मांडणे, अभंगातून श्रद्धासुमन अर्पण करणे. हिंदी आणि मराठी तील अभंगातील साम्यस्थळं शोधून भक्तीतील , अध्यात्मातील अद्वैतता दाखवणे. सगळंच लाजबाब. सुंदर ध्यान पासून सुरवात करून  किशोरीताईंनी शब्दबद्ध  केलेल्या ज्ञानेश्वरीच्या  अंतरीच्या प्रवास उलगडून दाखवणा-या ओव्यांनी समेवर येणे , सर्वच अविस्मरणीय. निर्भेळ आनंद देणारं.    
 जयतीर्थ मेवुंडी   अभंगवाणीत वेगळा रंग भरणारे गायक,या वेळी नेहमी प्रमाणे रंग भरले. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल , गुरु विठ्ठल , गुरुपूजा .........  गुरु च्या आगळ्या वेगळ्या पैलूचं दर्शन त्यांच्या आणि एस आकाशाच्या सादरीकरणाच्या वेळी झालं. शिष्याला संधी , वाव , स्पेस देणे इतकंच नव्हे तर आपल्या गाण्यात सामावून घेऊन शिखरावर जाण्यासाठी मार्ग करून देणे. आणि आकाश ने तितक्याच ताकतीने पेलणं. विशी बाविसाच्या उंबरठ्यावर असलेल्या आकाशाचा व्यासपीठावरील वावर आश्वासक वाटला. 
राहुल देशपांडे अधिक प्रगल्भतेकडे वाटचाल करणारा कलाकार. आलापी , गायकी , अभंग तेच असले तरी प्रत्येक वेळी नव्या जागा शोधण्याचा प्रयत्न, विठ्ठलाचा शोध घेण्याचा ध्यास , कधीतरी अवचित पणे  त्याचं प्रकटणे , संगीत साधना  आणि साधक  वैष्णवाच्या जथ्याचं आणि स्वतःचा प्रवास  उलगडून दाखवणारं गायन. 
आनंद भाटे गेल्या तीस पस्तीस वर्षात गंधर्व पदवी मिळवणारा कलाकार, पंडितजींचा शिष्य. पंडितजींचे अभंग सादर केले. आपण ठेवणीतील जोहर मायबाप होतंच. 

वादक कलाकार , अजय जोगळेकर , आदित्य ओक, तबल्यावर , पाध्ये , तळवळकर , बँकर , पखवाज सुखद मुंडे, सूर्यकांत सुर्वे , बासरी वर एस आकाश. 
प्रसिद्ध सुलेखक अच्युत पालव  अक्षरातून विठ्ठलाचे देखणे चित्ररूप व्यासपीठावर  गेली अनेक वर्ष साकारत असतात. 
कार्येक्रम संपल्यावर एस आकाशची भेट झाली. त्याला विचारलं एस म्हणजे काय? सतीश आकाश. श्री  एम एन सतीशकुमार व श्रीमती वाणी सतीश चा मुलगा. 

शेवट राहुल देशपांडे आणि आनंद भाटेंच्या टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंगे .... 
पुढची आषाढी १२ जुलै १०१९. 

Thursday, 14 June 2018

आनंदाची गुरुकिल्ली - कृतज्ञता

 
बेंजामिन हार्डी ,स्तंभलेखक , प्रसिद्ध ब्लॉगर , कृतज्ञता विषयी त्यांच्या अंतर्मनातील  काही गोष्टी आपल्या समोर मांडतात.  

कृतज्ञता ही आनंद आणि यशाची गुरुकिल्ली आहे असा बेन यांचा विश्वास आहे. कृतज्ञते मुळे मनाला विशालता प्राप्त होते. जेव्हा आपण मोठ्या मनाने एखाद्या गोष्टीवर  विचार करतो. तेव्हा आपल्याला असंख्य संधी  दिसतात आणि अनेक शक्यता उपलब्ध असल्याची जाणीव होते. आपल्या पाशी जे आहे. त्याविषयी जेव्हा आपण  कृतज्ञ असतो  तेव्हा  चांगल्या गोष्टी , चांगली माणसं आपल्या कडे आकर्षित होत असतात. अधिक सकारात्मक गोष्टी घडतात. 
                        
कृतज्ञता सर्व गुणांची जननी आहे.  यश संपादना साठी तिचं  फार मोठं महत्व असून . त्यासाठी एक गुपित आहे ,रोज दिवसाची सुरवात सकाळी कृतज्ञतेच्या जाणिवेने करणे. 

कृतज्ञते मुळे माणसं बदलतात. जेव्हा तुम्ही कृतज्ञता दर्शवता तेव्हा इतरांकडे पाहण्याचा  दृष्टिकोन व त्याच्या विषयी आदर व्यक्त होत असतो. 

वेन डायर म्हणतात , जेव्हा तुम्ही  एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलता  तेव्हा त्या गोष्टीही नवीन रूप धारण करतात. 

प्रसिद्ध तत्त्ववेत्ता  गटे म्हणतो    "एखादी गोष्ट, वक्ती आपण जशी पाहतो त्याच  प्रमाणे  आपण वागतो,  आणि त्याच प्रमाणे गोष्टी, व्यक्ती आपल्याला प्रतिसाद देतात. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती कडे , गोष्टी कडे वेगळ्या दृष्टीने पाहतो तेव्हा त्या गोष्टी ,व्यक्ती बदलतात. परंतु फक्त त्यांच् बदलतात असं नव्हे, तुम्ही ही  बदलत असता.  

आपल्या वर्तणुकी वरून आपलं मूल्यांकन होतं  असतं. आपल्या वर्तणुकीनुसार आपली ओळख बनते' आणि आपलं वागणं आपल्या श्रद्धेला बळकटी देते. 




( आलेल्या मेलचा स्वैर अनुवाद )