Monday, 13 May 2019

तरुणांनी खूप वाचलं पाहिजे खूप ऐकलं पाहिजे.











तरुणांनी खूप वाचलं पाहिजे , खूप ऐकलं पाहिजे सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्यात सहभागी झालं पाहिजे. मोबाईलची खिडकी म्हणजे सर्व काही नाही. तरुण रंगकर्मीनी काही दिवस  तरी नाटक करायला हवं. त्यातील अनुभव आयुष्यभर पुरेल. नाटक म्हणजे टीम वर्क आहे. ते सर्व टीमचं असतं. असे मार्गदर्शन सिने नाट्य दिग्दर्शक श्री चंद्रकांत कुलकर्णी यांनी वसई तील  संजीवनी व्याख्यानमालेत केलं. नाट्यक्षेत्रातील संशोधक दिग्दर्शक गिरीश पतके यांनी त्यांची मुलाखत घेतली.





 
यावेळी  ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले, युवा काष्ठशिल्पकार श्री सचिन चौधरीचा सत्कार   जेष्ठ रंगकर्मी, निर्माता श्री सुनील बर्वे व लोकप्रिय साहित्यिका वीणाताई गवाणकर ह्याच्य हस्ते करण्यात आला.


आपल्याकडे कीर्तन ,व्याख्यानमाला , श्रवणभक्तीची परंपरा आहे. जोपर्यंत कोणीतरी बोलत राहावे आणि कोणालातरी ऐकत राहावं असं वाटत राहील तो पर्यंत थिएटर जिवंत राहील असं ते पुढे म्हणाले.  





नाटक हे खूप प्रभावी माध्यम आहे. नाटकात पाहिलेली गोष्ट,ऐकलेली वाक्य कायमस्वरूपी   स्मरणात राहतात. नाटकाचं एक शास्र आणि मानसशास्र आहे. ठरवून अंधार करून घेतात व दृश्यमान चौकटीत स्वतः ला जोडून घेत अनुभूती घेत असतात.

















सुरवातीला हेमंत नाईक यांनी पाहुण्याची ओळख व प्रास्ताविक केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्कर्ष मंडळाचे श्री काशिनाथ नाईक होते.   कु. निधी नाईक हिने सूत्रसंचालन केलं तर सौ तेजल पाटील हिने ईशस्तवन सादर केलं. 







कार्यक्रमाला वीणाताई गवाणकर, शिल्पकार सचिन चौधरी श्री सुनील बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. 




विचाराची कमळें उमलवणारा विचार सूर्य म्हणजे कबीर.



 
कहत कबीर सुनो भाई साधो म्हणजे  कबीर सांगतात  ऐका  विचार करा आणि साध्य करा. असा  मतितार्थ आहे  असे प्रतिपादन सुप्रसिद्ध निवेदिका , संत साहित्याच्या अभ्यासक श्रीमती धनश्री लेले यांनी वसईतील  संजीवनी व्याख्यानमालेत प्रथम पुष्प गुंफताना केले . त्या "कहत कबीर" या विषयावर बोलत होत्या. महाराष्ट्रांत संत ज्ञानेश्वर , तुकाराम महाराज, स्वामी रामदास तसे उत्तरेत संत कबीर. मनामनात विचाराची कमळें उमलवणारा विचार सूर्य म्हणजे कबीर.








 ते सांगतात मी हिंदू नाही मुसलमान ही नाही मी माणूस आहे.  त्यांनी दोन्ही धर्मातील वाईट चालीवर प्रहार केले . एक वेळ ते म्हणतात  मुल्ला होकर बांग पुकारे वो क्या साहेब बहिरा है । त्याच बरोबर हेही सांगतात की " पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजूँ पहाड़ ।"

संजीवनी व्याख्यानमालेला  एक अधिष्ठान प्राप्त झाल्याचं त्यांनी सुरवातीला सांगितलं आणि परिवाराला रौप्यमहोत्सवी वाटचाल पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं.
 




त्यांनी पुढे संत कबीरा च्या दोह्यातील  आणि संत तुकारामाच्या अभंगातील साम्यस्थळं  उलगडून दाखवली.   तसेच पंढरपूर व तुळशीमाळ व बुक्क्याचा उल्लेख कहत कबीर  हरिसे मिठा लागे तुळशी बुक्का ह्या दोह्यांचा दाखल देऊन केला.  


सुरवातीला श्रीमती अनिता नाईक यांनी प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख करून दिली अध्यक्षस्थानी  केएमपीडी  स्कुल च्या मुख्याध्यपिका श्रीमती वंदना नाईक होत्या  कु धनाली जोशी हिने  सूत्रसंचालन केलं. सौ रीमा नाईक हिने ईशस्तवन सादर करून  सूंदर वातावरण निर्माण केलं तर  कौस्तुभ पाटील व मंगेश नाईक यांनी सुरेख साथ दिली. 
 



रसिक ,जाणकार , योग्य ठिकाणी दाद देणारे श्रोते हेच वक्त्यांना प्रोत्साहित करत असतात असे श्रोते लाभणं ही वक्त्यांची पुण्याई




भाषणाच्या ओघात आलेले काही दोहे. कबिरा विषयी औसुक्य वाढवणारे होते 
  • "हरी को धुंडन मै चला, जा पोहोचा हरीद्वार, पग थके, हरी न मिले, क्यूकी हरी थे मेरे द्वार" 
  • मुल्ला होकर बांग पुकारे वो क्या साहेब बहिरा है
  • " पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजूँ पहाड़ ।"
  • गुरु तो ऐसा चाहिए, शिष्य सों कछु न लेय। शिष तो ऐसा चाहिए, गुरु को सब कुछ देय।। 
  •  नैनम मे श्याम बसे 
  • मागनसे  मरना भले 
  • छोड दिया बैकुठं हरी भाव भगतका भुखा