Sunday, 1 January 2023

मी कोण ?

 निर्वाण षटक  आदी शंकराचार्य

श्री शंकराचार्य गुरूच्या शोधात भ्रमण करत असताना एका महर्षि शी भेट झाली महर्षींनी शंकराला विचारले तू कोण आहेस शंकरांनी  सहा श्लोकात उत्तर दिले,म्हणून षटक, मी ची सर्वव्यापक   व्याख्या  निर्वाणषटकम.

मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं
  श्रोत्रजिह्वे   घ्राणनेत्रे 
  व्योम भूमिर्न तेजो  वायुः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥१॥

 

शंकर सांगतात मी म्हणजे,

मन (Memory) नाही , बुद्धी (intelligent) नाही , अहंकार (Ego) नाही , चित्त (intelligence) नाही,

मी कान, जीभ, नाक, डोळे  नाही  म्हणजेच ज्ञानेद्रीय म्हणजे मी नव्हे,

मी आकाश, भूमी,अग्नी , वायू  नाही  म्हणजेच पंचमहाभूते म्हणजे मी नव्हे,

आपण पाहिलं तर लक्षात येते ज्ञानेंद्रियात  स्पर्श आणि महाभूतात पाण्याचा उल्लेख नाही. जेव्हा चार ज्ञानेंद्रिय व चार महाभूतांशी जीवाला  वेगळ करतात, तेव्हा स्पर्श आणि पाणी त्यात अंतर्भूत होते.

चौथ्या ओळीत शंकराचार्य स्वतः ची म्हणजेच जीवाची व्याख्या करतात,

मी आंतरिक आनंदाचे मूर्त रूप आहे मी शिव आहे, मी शिव आहे.

 

  प्राणसंज्ञो  वै पञ्चवायुः
 वा सप्तधातुः  वा पञ्चकोशः 
 वाक्पाणिपादं  चोपस्थपायु
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥

 

मी श्वासोश्वास(प्राण) नाही किवा पंचवायू नाही.

(शरीरात पाचवायू  प्राण,अपान,उदान व्यान, समान वेगवेगळी कार्य करत असतात ते म्हणजे मी नव्हे. प्राण वायू - श्वसन क्रिया, विचार प्रक्रिया  अपान वायू - उत्सर्जन क्रिया  मल,मुत्र घाम . व्यान वायू  – रक्ताभिसरण आणि शरीरातील अवयवातील एकता.  उदान वायू -  उत्साह आणि हलकेफुलके पण, मृत्यू समयी भौतिक शरीरातून सूक्ष्म शरीर सोडणारी शक्ती.  समान वायू – पचनक्रिया आणि  शरीर धारणा , शरीरातील उष्णता नियंत्रित करणे )  .

मी सप्त धातू नाही, नाही मी पंचकोश ,

(शरीर सात धातूचे आणि पाच कोष मिळून बनले आहे असं आयुर्वेद सांगतो. सात घटक – रस ,रक्त , मास ,मेद, अस्थी, मज्जा ,शुक्र . मानवी शरीर पाच सूक्ष्म स्तरांनी बनलेले आहे. अन्नमय कोष- जे अन्न आपण खातो त्यांनी जे शरीर बनते ते अन्नमय कोष.  (bag of food)

प्राणमय कोष-  पाच वायुनी बनते, शरीराला शक्ती देणारं  उर्जाचक्र.  

मनोमय कोष-  ज्ञानेद्रीयांनी साठवलेली स्मृती.

विज्ञानमय कोष-  बुद्धी आणि ज्ञानेंद्रियानी बनतो.

आनंदमय कोष.  सर्व कर्माचं गाठोडं.)

मी पाच कर्मेद्रिय नाही ( वाणी, हात, पाय, पायु (गुद) आणि उपस्थ),   

मी आंतरिक आनंदाचे मूर्त रूप आहे मी शिव आहे, मी शिव आहे.

 

 मे द्वेषरागौ  मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः 
 धर्मो  चार्थो  कामो  मोक्षः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥

 

माझ्यात तिरस्कार आणि आसक्ती किंवा लोभ आणि मोह  नाही,

मला गर्व नाही, मला मत्सर, हेवा नाही,

धर्म (Sustain), अर्थ (Wealth), काम (Desire), मोक्ष(liberation)  प्राप्त करण्याची इच्छा नाही. (चार पुरुषार्थ )

मी आंतरिक आनंदाचे मूर्त रूप आहे मी शिव आहे, मी शिव आहे.

 

 पुण्यं  पापं  सौख्यं  दुःखं
 मन्त्रो  तीर्थं  वेदा  यज्ञाः 
अहं भोजनं नैव भोज्यं  भोक्ता
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥४॥

 

शंकराचार्य सांगतात,

मी पुण्य , पाप, सुख , दुख: पासून मुक्त आहे,

मंत्र , तीर्थयात्रा , वेदाभ्यास ,यज्ञ या साधना मधून मला काही साध्य करायचं नाही,

भोजनम, भोज्य, भोक्ता .ना मी विषय , ना मी वस्तू ना मी उपभोक्ता आहे,

मी आंतरिक आनंदाचे मूर्त रूप आहे मी शिव आहे, मी शिव आहे.

 

 मृत्युर्न शङ्का  मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता  जन्मः 
 बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥५॥

 

जन्मापासून मृत्यू पर्यंत वेगवेगळ्या नातेसाबंधात जीव अडकला जोतो शंकराचार्य सांगतात,

मला मृत्यूच्या स्वरूपाविषयी शंका नाही म्हणून मी जन्माच्या आधारे कोणतेही भेदभाव करत नाही,

मला वडील नाहीत , मला आई नाही मला जन्म नाही,

मला भाऊ, मित्र, गुरु, शिष्य नाहीत,

मी आंतरिक आनंदाचे मूर्त रूप आहे मी शिव आहे, मी शिव आहे.

 

अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् 
 चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥६॥

 

मी परिवर्तनहीन आणि निराकार आहे,

मी सर्व इंद्रियांवर राज्य करतो, आणि व्यापतो,

मी  आसक्त आणि अलिप्तत किंवा मुक्त नाही,

मी आंतरिक आनंदाचे मूर्त रूप आहे मी शिव आहे, मी शिव आहे.

 

 

Monday, 3 October 2022

देवत्वाची प्रचीती

 

 

देव्हारे माजलेत, देव आहे, देव नाही अश्या मतमतांतरा च्या गलबलात कधीतरी  गीत - गदिमा ,  स्वर-संगीत सुधीर फडके यांच “देव देव्हार्‍यात नाही” हे गीत ऐकण्यात आलं आणि मनाला खूप भावलं. गदिमा नी फार सुरेख शब्दात, देवाच्या  अस्तित्वाच्या खुणा, ठिकाणं दाखवली आहेत.  कुठे शोधायला पाहिजेत हे ही दर्शवलं आहे. बाबुजींच्या स्वर सुरांनी तर कमाल केली आहे. असं हे देवाचं ठाव घेणारे गीत राहुल देशपांडेनी अलीकडेच गायलं आहे. ते युट्यूब उपलब्ध आहे. आपल्या गायकीतून, आलापातून, शब्दातून एक वेगळीच अनुभूती देतात. नक्कीच आनंद घ्या!

https://www.youtube.com/watch?v=FMyUEXLIPqQ

 

देव देव्हाऱ्यात नाही  

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या-माझ्या जड देही देव भरूनिया राही


देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत
देव सगुण, निर्गूण, देव विश्वाचे कारण
काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही

 

गीत - ग. दि. माडगूळकर संगीत - सुधीर फडके स्वर - सुधीर फडके चित्रपट - झाला महार पंढरीनाथ.