Saturday, 6 August 2011

वृक्षांनी संजीवानिला काय दिले ?

वृक्ष हे भुतलावारील देवदूत आहेत. मानवाच्या जन्मापासून मृत्युपर्यंत साथ देणारा मित्र म्हणजे वृक्ष. पांगुळगाडा ते तीरड़ीपर्यंत साथ देणारा सोबती. दगड मारणार्‍याला ही  मधुरफळ देणारा, पाणि देणार्‍या व् खांडावयास आलेल्या दोघानाही सारखीच सावली देणारा तत्त्वज्ञ, मार्गदर्शक म्हणजे वृक्ष.
निसर्गाच्या व्यवस्थापना मध्ये वेगवेगळी  चक्र सुरु असतात. शाळेत असताना शिकलेल जलचक्र आठवत का ?.  ह्या सगळ्या चक्राकार कृतिमुळ  मर्यादित साधनांची अमर्याद  कालापर्यंत वापरण्याची व्यवस्था निसर्गाने केलेली आहे .


माणूस उच्छवासातुन  कार्बन डायऑक्साइड  सोडतो, झाडं तो  ग्रहण करतात व् त्यानी सोडलेला प्राणवायु माणूस ग्रहण करतो. माणसाच्या वाढ़ीसाठी आवश्यक असणारी जीवनसत्व व् खनिज, झाडा पासून मिळत असतात (फळ ,भाजीपाला कडधान्य) ,जमिनीची धुप व् भुगार्भातील पाण्याची  पातळी    टिकविण्याचे  काम झाडं
करत असतात. असंख्य पक्षांच व् प्राण्यांच झाड हे आश्रयस्थान  आहे. आशी ही झाडं   त्यांच्या सान्निध्यात आलेल्याना न बोलता  शिकवतात.

 
    ज्या झाडाला आपण स्थानिक भाषेत करज म्हणतो 
 ह्या वृक्षाची चैत्रा मधे पालवी नीट पाहिली तर हिरव्या  रंगाच्या सर्व छटा    आपणास दिसतील   
 तसेच पिंपळाचे 
 पाना ची पूर्ण गळती होऊन पिंपळ निष्पर्ण होतो आणि   
 नवीन पालवीच्या रूपाने रंगाची  उधळण सुरू होते.सुरवातीला   
लुसलुसीत कोवळी तांबुस पाने हळूहळू  पोपटी  रंग घेतात  हिरव्या रंगाची  रूपॅ दाखवत गर्द हिरवी  होतात.    
विविध रंगाच्याविविध सुवासाच्या फुलांनी मानवाचं जीवन अधिक सुंदर  अर्थ पूर्ण बनवले आह



झाडांची हिरवी पान म्हणजे   त्यांचा  अन्न कारखानाच असतो.
  हवेतील    कर्बवायु सूर्यप्रकाश घेऊन अन्न प्रक्रिया सुरू होते, 
 साखर ,ग्लुकोज इत्यादी वेगवेगळ्या  स्थिति मधून हा प्रवास  होतो,
शेवट कणीस,  फळ या रूपात  होतो.





अश्या ह्या झाडांना दर रविवारी भेटण्यातून संजीवनी ला प्रेरणा मिळत असतेनवनवीन उपक्रमाला  चालना मिळत असते 
 आणि मिळत  असते प्रसन्नता अनलिमिटेड

श्रीमत शंकराचार्य मंदिरा समोरील  पिंपळ 

आपण  या !!!. भेटत राहू  या दर रविवारी विसरता. 
                                               

Wednesday, 13 July 2011

वनराईतून गर्द देवराई!

निर्मळ येथील संजीवनी परिवाराचा उपक्रम निशिकांत म्हात्रे

वसई तालुक्यातल्या निर्मळ या प्रसिद्ध तिर्थक्षेत्री , रानवेड्या तरूणांनी गर्द देवराई उभी करण्याचा चंग बांधला आहे . सहा वर्ष नेटाने आधी वनराई आणि त्यातून देवराई अस स्वप्नं बघणारी तरूणाई आहे ती ' संजीवनी परिवाराची '. झाडांपासून जगणं शिकायचं या ध्यासातून उमराळे येथल्या ' संजीवनी परिवारा ' ने तमाम वसईकरांना तेथली वनराई जपायची हाक घातली आहे . बोळींजपासूनचा वसई गावापर्यंत पसरलेला सामवेदी समाज . आपल्या समाजाचा शैक्षणिक आर्थिकस्तर उंचावण्यासाठी , नवतरूणांना दिशा देण्यासाठी , एकमेकाच्या सहकार्यातून उभा राहिला तो ' संजीवनी परिवार ', तरूणांचा गट !

प्रा . सायनेकर यांची प्रेरणा :संजीवनी परिवार त्यासाठी आबालापासून वृध्दापर्यंत सगळ्यांसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवतो आणि त्यांना सामावून घेते , महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विचारवंत , तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनासाठी आयोजित केली जाणारी व्याख्यानमाला , बालमेळावा , मार्गदर्शन शिबीर आणि दर रविवारी चुकता राखली जाणारी झाडांची निगा . निर्मळ हे तिर्थक्षेत्र महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ते आठवे जगतगुरू श्री शंकराचार्यांचे समाधी स्थळ कार्तिक स्वामींच्या बंदिस्त मंदिरासाठी . उंच टेकडीवर असणाऱ्या या मंदिराचा परिसर उजाड बोडका तर पायथ्याला मोठ्या तलावांतील पाण्याने हिरवा , समृध्द . एका व्याख्यानाचा निमित्ताने संजीवनी परिवाराच्या संपर्कात आलेले , ठाण्यातील विचारवंत लेखक प्रा . मुरलीधर सायनेकर यांनी या मंदिराचा बोडका परिसर पाहिला आणि इथल्या परिसराला हिरवं लेणं देण्याची प्रेरणा देत , स्वत : च्या प्रत्यक्ष सहभागाची तयारी दाखवली . त्यासाठी त्यांनी इथे वृक्षारोपण करून दर वर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस जुलैच्या पहिल्या रविवारी साजरा करण्याची कल्पना मांडली . त्यांची प्रेरणा , कल्पना प्रत्यक्ष सहभाग यातून इथे देवराई फुलू लागली आहे . कांचन , देवदार , कदंब , सप्तर्षी , ओक , कैलासपती , पलाश , टबुबीया , पाम , बहवा , मधुकामिनी , बकुळ , पारिजात , कुडुनिंब , पिंपळ , अशोक अशी सर्व ऋतुमानानुसार फुलणारी , फळणारी झाडे या परिसरात तगवली आहेत . त्यासाठी संजीवनी परिवाराची तरूणाई दर रविवारी चुकता , सकाळी सात ते दहा या वेळेत हजर राहून निर्मळ टेकडीवरच्या झाडांची काळजी घेते तर प्रा . सायनेकर वर्षभर चौकशी तर कधी व्याख्याना निमित्त वसईत आल्यावर चुकता झाडांना भेट देणारे मात्र इथल्या झाडांच्या वाढदिवस साजरा करण्या करता दरवर्षी सहकुटुंब हजर राहत आहेत .  

 वीणा गवाणकर यांचाही सहभाग :संजीवनी परिवाराने इथल्या झाडांचा सहावा वाढदिवस गेल्या रविवारी साजरा केला . त्या करता प्रा . सायनेकरां बरोबर झाडांचा वाढदिवस साजरा करण्याकरता हजर होत्या प्रसिद्ध लेखिका श्रीमती वीणा गवाणकर . त्यानी श्री शंकराचार्यांच्या मंदिरामागे वृक्षारोपण करून , उपस्थित वृक्षप्रोमींना त्यांच्या वृक्ष , पर्यावरण जगविण्याच्या सत्यकथा कथनाने विचार करायला भाग पाडले . सहारा वाळवंट वाचविणाऱ्या रुपर्ड बेकर यांची कथा सांगितली . त्या म्हणाल्या , या अशा कथा वाचल्या की कळत , माणसाचं आयुष्य झाड बदलतात . सायनेकर सरांनी सांगितले की प्रत्येकाने उपयुक्तवादी भूमिकेतून झाडे लावावीत . झाडांना आपण जगविले तर ती आपल्याला जगवितात . झाड आपल्याकडे असलेले सर्व ते औदार्याच्या भूमिकेतून माणसाला देतात . जगतगुरू श्री शंकराचार्यांचे समाधी स्थळ असणारे हे तिर्थक्षेत्र देवराईच्या रुपाने जपायची आस संजीवनी परिवाराला आहे . त्यासाठी पाठबळ हवे ते सर्व जातींचे श्रध्दास्थान असणाऱ्या भोवतीच्या समाजाकडून अनधिकृतपणे टेकडी व्यापत वनराईचा वृक्षसंहार करणाऱ्या स्थानिकांकडून . खडकाळ असणारी ही टेकडी हिरवाईकडे नेताना झाडांचं संरक्षण करण्याकरिता निदान तारांच्या कुंपणाची तरी गरज आहे . एखादा दानशूर , लोकनेता वृक्षपुत्र , वृक्षमित्र या झाडांच दत्तक विधान घेणारा भेटला त्याने कुंपणाची पाखर घातली तर या वनराईचा प्रवास देवराई पर्यंत सुखकर होईल . त्यासाठीच ही सामवेदी हाक आहे ती झाड वाढविण्यासाठी , जगविण्यासाठी सर्व समाजांसाठी . श्रध्दास्थांनांभोवती देवराई फुलविण्यासाठी .