Monday, 11 March 2013

फ्लॅमिंगो फेस्टिवल


फ्लॅमिंगो फेस्टिवल





बीएनएचएसने  (Bombay Natural History Society) ९ मार्च २०१३ रोजी  शिवडी जेट्टीवर फ्लॅमिंगो फेस्टिवल चे आयोजन केले होते. पक्षी निरीक्षण व  निसर्गाजवळ घेऊन जाणारा उपक्रम.  लोकांना पक्ष्यांच्या सवयी, त्यांच वास्तव्य व त्यांना संभवणारे धोके याची माहिती देण्यासाठी  बीएनएचएसची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणी व स्पॉटिंग स्कोपच्या सहाय्याने पक्ष्यांना बघणे हा  एक आनंद होता. या ठिकाणी रोहितवरचे छायाचित्र व माहिती प्रदर्शन आणि चेहरा रंगवणे, पक्षी टॅटू व ‘आपल्या पंखांची लांबी मोजा’ असे लहान मुलांकरता उपक्रम होते.

   
 फ्लॅमिंगो या पक्ष्याचे रोहित हे आपल्याकडचे  नाव आहे. अग्निपंखी हे दुसरे नाव. फ्लॅमिंगो पक्ष्यांची भारतातील सर्वात मोठी जननभूमी कच्छचे रण आहे. हिवाळ्यात ते कच्छ येथून शिवडीला स्थलांतर करतात. पंधरा ते सोळा हजार इतक्या मोठ्या  संख्येने येतात.   आपल्याकडे  ग्रेटर फ्लेमिंगो आणि लेसर फ्लेमिंगो असे दोन प्रकार आढळतात.




 
ग्रेटर फ्लेमिंगोंची उंची 125 ते 145 सेंमी असते. ते पांढरे शुभ्र असतात. त्यांची मान उंच असून भडक लाल रंगांचे आखूड पाय असतात. चोच गुलाबी रंगांची, तर डोळे पिवळसर असतात.   हे किडे-कीटक व पाणवनस्पती खातात.









लेसर फ्लेमिंगोंची उंची 80 ते 90 सें.मी असते. ते पांढऱ्या-तांबूस रंगाचे असतात. यांची मान आखूड असून पाय उंच असतात. त्यांची चोच जाड व काळसर रंगाची आणि डोळे लालभडक असतात. ते फक्त पाणवनस्पतींवर जगतात.









फ्लेमिंगों सामाजिक पक्षी असून एकत्र राहतात. फ्लेमिंगों तसी ३१-३७ मैल वेगाने उडू शकतात, सुरवातीला रनअप घेतात. फ्लेमिंगों  एकत्र उडताना  विलोभनीय दिसतात.

उडण्यासाठी स्टार्ट                    



   
 टेक ऑफ
  
हवेत झेप 

Thursday, 21 February 2013

यत्न तो देव


शनिवारच्या लोकसत्तेच्या चतुरं पुरवणीत बोधिवृक्ष सदरातील  प्रयत्नाचं महत्व सांगणारे "प्रयत्नांती सर्व काही"  हे  संकलन बालपणात   घेऊन गेले.  बालपणी  रोज रात्री  झोपताना आजोबा कविता  बोलायचे. कविता ऎकतच झोपेच्या स्वाधीन व्हायचे. आजोबा छान चालीत कविता म्हणायचे , कविता    हि सहजसोप्प्या सुंदर होत्या. कवितेतून काहीतरी उपदे असायचा. प्रयत्न आणि निश्चयाचे  महत्व  सांगणारी "एका कोळ्याचे प्रयत्न ",   एका कोळियाने (Spider )  हि  कविता आठवते.  एक कोळी आपले जाळे खूप उंचावर बांधतो. जाळ्यातून खाली येतो आणि  परत जाता  येईना  खूप  कष्टी होतो.  परत   परत प्रयत्न  करतो. धीर धरून पुन्हा प्रयत्न करतो  जाळ्यात जाताना  झोक जाऊन  पडतो. आपल्या दैवाला दोष देतो.  परंतु चित्त त्याला स्वस्थ बसू देत नाही.  मग नेटानी  उठून  सर्व  खबरदारी घेत जाळ्यावर पोहोचतो  आत प्रवेश करतो.  आणि आनंदून जातो.  कवी ने शेवट  तुकारामांच्या  पक्तीने केला आहे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ".
  
 एका कोळ्याचा प्रयत्न
एका कोळिय़ाने एकदा आपुले।जाळे बान्धिय़ेले ऊन्च जागी।।
 
तेथुनि सुखाने खालती तो आला।परि मग झाला कष्टी बहू।।
       
मागुति जाळिया माजि जाता य़ेना।धाग्य़ावरुनि पुन्हा पुन्हा पडे।।
चार वेळ तो ह्या परि पडे। जाय बापुडा भागुनि पुढे।।     
  आस खुन्टली येतसे रडे। आन्ग टाकुनी भूमिसी पडे।।    
फिरुनि एकदा धीर घरुनिया।लागे हळुहळु वरती चढाया।।
परि जाळ्यमघि शिरताना। तो झोक जाउनी पडला।।
      पाचहि वेळा यत्न करुनिया। आले यश न तयाला।।  
     गरिब बापुडा कोळी तेव्हा। दुक्खि अतिशय झाला।।
     हिम्मत धरुनि फिरुनि । आणखि धागा चढुनि गेला।।
  परि जाळ्यामधि शिरताना । तो झोक जाऊनि पडला।।
               
अहा मज ऐसा दैवहत प्राणी ।खचित जगतीया दिसतनसे कोणी।।  
           
निराशेने बोलुनी असे गेला। परि चित्ति स्वस्थता नये त्याला।।
         
मग वेगे वेगे ऊठे धागा चढु लागे नेटे। बहु घेई खबरदारि जाई पोचे जाळ्यावरी।।
हळुच मग आत शिरे पोटी आनन्दाने भरी।झटे निश्चयाचे बळे अन्ति त्याला यश मिळे।।   
                 
निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ

 प्रयत्न करणा-यांला कधीच अपयश येत नाही, पराभव होत नाही. कवी  सूर्यकांत त्रिपाठी "निराला" , सागतात मैदान सोडून पळू नका संघर्ष करा. फुकटचा जयजयकार कधी होत नाही 

कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती
नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है,
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है
मन का विश्वास रगों में साहस भरता है,
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती
डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है,
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में,
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती
असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो,
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम,
संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम ।
कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ।

दोन्ही कवींनी उदाहरणं दिली आहेत  कि छोटे छोटे जीव (मुंगी,कोळी) प्रयत्नांनी ठरविलेलं उद्दिष्ट गाठतात तर मनुष्याला काहीच अशक्य नाही. योग्य प्रयत्नांनी सर्व काही साध्य आहे. परमेश्वर सुध्दा प्राप्य आहे.