Monday, 28 May 2018

गुलजार

सम्पूर्ण सिंह कालरा, जन्म   १८ ऑगस्ट १९३४ ला दीना जिल्हा झेलम पंजाब येथे झाला आता  हा भाग पाकिस्तान मध्ये येतो . फाळणी नंतर हे कुटूंब अमृतसर मध्ये आलं. संपूर्ण सिंह अमृतसर मार्गे मुंबईला आले एका गॅरेज मध्ये मॅकेनिक म्हणून काम करू लागले, फावल्या वेळात कविता करण्याचा छंद जोपासत होते. आणि इथेच जन्मला  आपल्या सर्वाचा आवडता कवी , गीतकार , संवाद लेखक, पटकथाकार, निर्देशक  असं सर्व आकाश व्यापणारा गुलजार   वाया गुलजार दीनजी.  त्यांच्या आवडणा-या काही कविता. 


आदमी बुलबुला है पानी का
और पानी की बहती सतहा पर
टूटता भी है डूबता भी है
फिर उभरता है, फिर से बहता है
न समुंदर निगल सका इस को
न तवारीख़ तोड़ पाई है
वक़्त की हथेली पर बहता
आदमी बुलबुला है पानी का
भावार्थ : माणूस पाण्याचा बुडबुडा आहे. आणि वाहत्या पाण्याच्या पृष्ठभागावर तो फुटतो,बुडतो , परत आकार घेतो आणि वाहत राहतो. . सुमुद्र त्याला गिळू शकला नाही, नाही खंदक त्याला तोडू शकला. काळाच्या छातीवरून तो सतत वाहतो आहे. माणूस पाण्याचा बुडबुडा आहे. मानवी क्षणभंगुरता , प्रत्येक प्रसंगाला समोर जाणे,आणि प्रखर इच्छाशक्तीने जीवन पुढे नेत राहणे किती समर्थ पणे आले आहे. (क्रमश:)

Friday, 11 May 2018

प्राचीन विज्ञानात भारतीय वैज्ञानिकांची अचूकता प्रसंशनीय !


 


पृथ्वीची, चंद्राची स्वतः भोवती फिरण्याची वेळ  ३५०० हजार वर्षांपूर्वी अचूक वर्तवली होती. तशी नोंद आर्यभटीया या आर्यभट्टच्या ग्रंथात सापडते. इसवीसन पूर्व भारतीय जीवन संस्कृती खूप प्रगत होती. तक्षशिला , नालंदा अश्या शैक्षणिक संस्था होत्या. भारताचा GDP ३३% इतका होता. भारतात बनणारे स्टील खूप उच्चं दर्जाचं होत. एक उद्योग संस्कृती वसत होती असे प्रतिपादन टाटा मूलभत संशोधन संस्थेचे प्रा डॉ श्रीगणेश प्रभू यांनी वसईतील संजीवनी व्याख्यानमालेत काढले.ते प्राचीन विज्ञानातील भारतीय वैज्ञानिकांचे योगदान या विषया वर बोलत होते.




 


त्या काळी भारतात संशोधन आणि संशोधकांसाठी पूरक वातावरण  होतं.राजकीय स्थिरता , सुबत्ता , चांगल्या शैक्षणिक संस्था  जे परकीय आक्रमणामुळे नष्ट झालं.   आर्यभटीया ग्रंथात पृथ्वी स्वतः भोवती फिरण्याची वेळ २३ तास ५६ मिनिटं ४० सेकंद सांगितली आहे तर चंद्राभोवतीची वेळ (२७.३९६४६७३५७२) सात डेसिमल पर्यंत अचूक सांगितली आहे. साइन कोसाइन टेबल ही भास्कराचार्य यांची देणगी आहे. केरळीय गणिती पद्धतीने हजारो वर्षपूर्वी न्यूटनच्या ही खूप आधी  कॅल्कुलश ची सूत्रं  कटपयादि पद्धतीने श्लोकांत मांडून ठेवली आहेत. ह्या सर्वांला ग्रंथांचा आधार आहे.





आता काही मंडळी महाभारत काळात इंटरनेट होतं असं सांगतात  असं बोलल्याने  जगात आपलं हसं होतं हे त्यांच्या लक्षात येत नाही.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संजीवनीचे जेष्ठ कार्यकर्ते रमेश नाईक यांना   श्रद्धांजली वाहण्यात आली.





सुनील म्हात्रे यांनी प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख करून दिली. कु प्राप्ती पाटील हीने ईशस्तवन सादर केलं. अरविंद पाटील व कौस्तुभ पाटील यांनी साथसंगत केली. अध्यक्षस्थानी श्री भालचंद्र पाटील होते.
















व्याख्यानमाला २०१८  यशस्वी करण्यासाठी साह्यकरणा-या जैमुनी पतपेढी,   बसिन कॅथॉलिक बँक, वसई जनता सहकारी बँक , इंडियन ऑइल,भारत पेट्रोलियम ,सामवेदी ब्राह्मण संघ ,त्रिलोक साउंड सर्व्हिस , मंडप व्यवस्थेसाठी  श्री किशोर नाईक ,जाहिरातदार, देणगीदार  व  श्री विष्णू पाटील यांचे आभार मानले.  

हरवलेलं बालपण परत करणारं नर्मदालय !






नर्मदा परिक्रमेच्या वेळी , नर्मदा किना-यावरील ग्रामवासीय व विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना लक्षात आलं की ८ वी ९ वीच्या विद्यार्थ्यांना स्वतः चं  नाव ही लिहता येत नाही तेव्हाच नर्मदाकिनारी  बालशिक्षण क्षेत्रात काम करायचं ठरवलं सुरवातीला मंडलेश्वरच्या समोरच्या तटावर आठ किलोमीटर दूर असलेल्या लेपा गावी नर्मदालय  सुरु केल. नर्मदालय म्हणजे अनौपचारिक  शिक्षण (Non formal Education ).  मुलांना सांगितलं होतं की शाळेत गृहपाठ घेणार नाही , परीक्षा नाही,पहिले काही महिने  वह्या, पुस्तकाला  हातच लावायचा नाही , पहिल्या दिवशी १४ विद्यार्थी होते. एका गावातून दुस-या ,तीस-या ,पाचव्या खेड्यात असे आज पंधरा खेड्यातून १७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  गरजेतून मेडिकल कॅम्प सुरु झाले. एकटीने राहण्यापेक्षा जोडीला तीन मुलांना  घेतलं  त्यातून निवासी नर्मदालय सुरु झालं आज ४० आदिवासी विद्यार्थी निवासी नर्मदालय मध्ये आहेत. ही मुलं दहावी पास होऊ शकत नाही हे लक्षात आलं होतं. त्यांना  पाबळ येथील विज्ञानाश्रमातील  एक वर्षाच्या बेसिक इन रूरल टेक्नोलोंजि या कोर्स साठी पाठवलं, मुलांनी तो उत्तमरीत्या केला त्यांचं टाटा मोटार्स सारख्या कंपनीत निवड झाली परंतु ह्या मुलांनी ते नाकारून आपल्या गावी येऊन काम करण्याचं ठरवलं शाळेतील इलेक्ट्रिक , वेल्डींग व सुतारकामं ही मुलं करतात.


मध्यप्रदेश शिक्षण विभागाशी संलग्न असलेल्या रामकृष्ण शारदा निकेतन ची तीन विद्यालयं लेपा , तेली भटियार आणि  छोटी खरगोन येथे सुरु झाली. ह्या शाळेत मोफत मध्यान्ह भोजन दिलं जातं.समतोल आहारामुळे गैरहजेरी कमी झाल्याचं , मुलांचं आजारपण कमी झाल्याचं तसेच आकलन शक्तीत वाढ झाल्याचं लक्षात आलं. निवासी शाळे मधील  सरदार सरोवराच्या मध्यवर्ती ठिकणातील ही  आदिवासी मुलं पहाटे पाच वाजता उठतात. प्रार्थना म्हणतात त्याना भगवद गीतेतील चार अध्याय पाठ आहेत. आदिशंकराचार्याची २२ स्तोत्रं मुखोद्गत आहेत. नर्मदालयातील मुलांनी बनवलेल्या सोलार ड्रायरला NCRT आणि मध्यप्रदेश स्टेट एजुकेशन बोर्ड यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत राज्यस्तरीय पाहिलं पारितोषिक मिळाले.  टाटांनी मध्यप्रदेशातील पाहिलं रूरल टेकनॉलॉजि सेंटर नर्मदालयात केलं त्याचं उदघाटन प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी केलं.   हे सर्व करीत असताना लोकं  "तुम्ही यातून काय साध्य केलं ? असे विचित्र प्रश्न विचारतात.  मी त्यांना सांगते तुम्ही ज्याला बालमजुरी म्हणता त्याला मी एक प्रकारचं जीवनशिक्षण म्हणत असते. अश्या मुलांना त्याचं हरवलेलं बालपण अंशतः परत करण्याचं काम नर्मदालय करते असे प्रतिपादन श्रीमती भारतीताई ठाकूर यांनी केलं.




त्या वसईतील संजीवनी व्याख्यानमालेत बोलत होत्या. संजीवनी परिवारानी नर्मदालयाल ५१ हजार देणगी देण्याचं निश्चित केलं होते हे जेव्हा डॉ नारळीकर दांपत्यांना कळलं तेव्हा त्यांनी मानधन  न घेता नर्मदालयाला वर्ग करण्याची विनंती केली एकूण ६१ हजाराची देणगी संजीवनी टीमने ताईकडे सुपूर्त केली.


सुरवातीला सौ स्वाती नाईक यांनी पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक केलं. अध्यक्ष स्थानी सौ. सुलभा म्हात्रे होत्या. सौ उर्मिला नाईक हिने स्वागतगीत सादर केले.  साथसंगत श्री अरविंद पाटील व कौस्तुभ पाटील यांनी केली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धनाली जोशी हिनं केलं. 


संजीवनी व्याख्यानमाला आयोजनात जैमुनी पतपेढी , बस्सीनं कॅथॉलिक बँक , इंडियन ऑइल कॉर्पोरेशन व भारत पेट्रोलियम नी मोलाचं सहकार्य केलं.




 संजीवनीच्या कापडी पिशवी मधून - वसईचा मेवा 

भारतीय संशोधकांचा दर्जा उत्तम --- डॉ. जयंत नारळीकर







भारतीय संशोधकांचा  दर्जा उत्तम असून त्यांना विशेष   मागणी आहे. कॅलिफोर्निया इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि मध्ये खगोलशास्त्र विभाग पाहायला गेलो असताना यंत्रसामुग्री अशीच पडून होती त्या विषयी विचारल्यावर मला सांगण्यात आलं की आयुकातून भारतीय तंत्रज्ञ आल्यानंतर त्याची जोडणी केली जाणार आहे. अशी माहिती डॉ जयंत नारळीकर यांनी  वसईतील संजीवनी परिवार आयोजित  व्याख्यानमालेत बोलताना दिली. 

    






 
मुलांना रोज पाठयपुस्तकातील एक धडा मोठ्याने वाचायला सांगा, कोचीन क्लास ची आवश्यकता राहणार  नाही. असे मार्गदर्शन  डॉ. मंगला नारळीकर  यांनी    बालपण व शिक्षण या विषयी बोलताना केलं.
रविवार दिनांक २९  एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्रज्ञ  डॉ जयंत नारळीकर व डॉ मंगला नारळीकर याच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आले होते श्री अरविंद परांजपे , संचालक नेहरू तारांगण यांनी मुलाखतीतून नारळीकर सर व मॅडमचा जीवनपट उलगडून दाखवला. सरांचं बालपण व शिक्षण बनारस   मध्ये झालं व लहानपणा पासूनच ते त्रैभाषिक होते.आणि कधीच पहिला नंबर सोडला नाही.  मंगला मॅडमना लहानपणा पासून गणिताची आवड होती त्यात इतक्या तल्लीन  होत की गणित सोडवतना त्या शाळेत अडकून पडल्याचा किस्सा सरांनी सांगितला. 

डॉ. नारळीकरांनी आपले समकालीन कार्ल पिअरसन व नुकतेच जग सोडून गेलेल्या स्टीफन हॉकिंग च्या आठवणी जागवल्या.   स्टीफन हॉकिंग मीडियाचा आवडता होता व त्याच्या विषयी उलटसुलट बातम्या छापून येत असत स्टीफन हॉकिंग ला त्याच्या जीवनात उत्तम साथ देणा-या पत्नीशी घटस्फोट  तो देव मानत नव्हता आणि ती देव मनात होती ह्या कारणामुळे झाल्याचं छापून आल्याचा किस्सा सरांनी सांगितला. 
 

सुरवातीला हेमंत नाईक यांनी वर्षभराच्या उपक्रमाचा आढावा घेतला व पाहुण्याची ओळख करून दिली. सुत्रसंचलन प्रतीक म्हात्रे यांनी केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राघो नाईक होते. ईशस्तवन  व स्वागत गीत जुईली पाटील हिने  सादर केलें. 

वसईचा मेवा फळं, पालेभाजी, भाजी  ,सुकामेवा ची परडी/टोपली पाहुण्यांना देताना ,