Tuesday, 1 February 2022

राफेल नदाल- विक्रमी २१वे ग्रँड स्लॅम",



स्पेनच्या राफेल नदालने रविवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि विक्रमी २१व्या ग्रँड स्लॅम वर आपले नाव कोरले. त्याच्या या कामगिरीचं वर्णन वृत्तपत्रांनी तीन शब्दात केलं . 
"अद्भुत, अविश्वसनीय, असामान्य…; राफेल नदालचे विक्रमी २१वे ग्रँड स्लॅम",   
"राखेतून उठला राफएल नदाल; ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून इतिहास घडवला" 
हो परिस्थिती तशीच होती. 
नदाल वय वर्ष ३५ 
प्रतिस्पर्धी  दहा वर्षांनी तरुण. 
नदालने दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये फ्रेंच स्पर्धेत विसावे ग्रँड स्लॅम जिंकले. यानंतर दुखापती, करोनामुळे सराव आणि सहभागावर येत असलेल्या मर्यादा आणि वाढते वय. 
 पाचव्या सेट मध्ये ५-५ अशी बरोबरी साधत रशियाचा डॅनिल मेदवेदेव ने  देखील हार मानली नव्हती, 
हाच  मेदवेदेव  जोकोव्हिचच्या  २१ व्या ग्रँड स्लॅमच्या आड आला होता.  
तीस-या सेटच्या वेळी स्पर्धेची कृत्रिम बुद्धिमत्ता सांगत होती कि मेदवेदेव ला जिंकण्याची संधी ९६% टक्के आहे. याचाच अर्थ नदाल नक्कीच हरणार. 
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा या वर जग पटकन विश्वास ठेवते. 
परंतु अविश्वसनीय तंदुरुस्ती आणि असामान्य जिद्द याच्या जोरावर नदाल ने विजयश्री घेचून घेतली. 
मेहनत , सराव , जिद्द, चिवटपणा  विजयाची आस यासर्व गोष्टीत  दोघे स्पर्धक तुलबळ्य होते. तारूण्य  मेदवेदेव च्या बाजूला होते तर अनुभव नदाल च्या बाजूने. . 
खेळाच्या भाषेत सांगायचं झालं तर कालचा दिवस नदाल चा होता. 
जिंकण्याचा ध्यास, मेहनत, तंदुरुस्ती , झोकून द्यायची वृत्ती आणि दैव. 
भगवद गीता सांगते  "दैवम चैत्राव पंचमम"  , शेवटी  दैवाला अनन्यसाधारण महत्त्व असते. हो शेवटी!
दैव नदालच्या या वयातील तंदुरुस्ती , जिद्दीवर फिदा   झाले. 

No comments:

Post a Comment