Friday, 3 May 2013

काश्मिरला पाकिस्तान बरोबर जायचे आहे हे डोक्यातून काढा!

काश्मिरला पाकिस्तान बरोबर जायचे आहे हे डोक्यातून काढा - संजय नहार


 काश्मिरला पाकिस्तान बरोबर जायचे आहे हे डोक्यातून काढा अर्धे प्रश्न सुटतील असे प्रतिपादन श्री संजय नहार यांनी संजीवनी व्याख्यानमालेत  "काश्मिर काल आज व उद्या " या विषया वर बोलताना काढले.  पुढे म्हणाले मला काश्मिर मध्ये एक प्रश्न विचारतात 1947 साली भाषा, धर्म, निर्णय घ्यायचा अधिकार आणि भौगोलिक सलगता या सर्व मुद्या वर आम्हाला पाकिस्तान मध्ये जायचा अधिकार होता. आम्ही गेलो नाही. 48 च्या युद्धात  65 च्या युद्धात    71 च्या युद्धात  भारता बरोबर राहिलो 90 नंतर परिस्थिती का बिघडली?
काश्मिरला पाच हजार वर्षाची मोठी परंपरा आहे ऋषींची,मुनीची, संतांची, सुफिंची परंतु आज काय? आज अंधार  आहे आम्ह्च्या असे लक्षात आले कि काश्मिर मध्ये भारताबद्दल प्रेम नाही.   भारता विषयी अज्ञान होतं त्यांना वाटायचे भारत म्हणजे आर्मी ,त्यांना वाटायचे भारत म्हणजे पैसे खाणारे लोक,त्यांना वाटायचे भारत म्हणजे गोळी मारणारे लोक, नाहीतर गार हवेत येणारे टुरीस्ट, भारत म्हणजे आपली काळजी करणारे लोक नाहीत.  भारत म्हणजे आपली लोकं नाहीत. सरहद संस्थेने ठरवलं दुध नासवायचे नाही,साखर  टाकायची. Know India Tour सुरु केली, लहान मुलांची टूर सुरु केली. जेव्हा हि मुलं आली तेव्हा देशाला जोडणारी एक हि  यंत्रणा नव्हती. मुलांना सर्वात जास्त क्रेझ चित्रपट सृष्टीची , मुलं पुण्यात आणायची ,घरी ठेवायची, मुलांनी देश पहिला श्रीनगरच्या मशिदी पेक्षा दिल्लीची जाम्मा मशीद मोठी आहे हे त्यांना कळले.पुण्यात कोकणस्थ ब्राह्मण असले तरी आपणाला घरी ठेवतात हे समजले. आज नऊ वर्ष झाली पुण्यामध्ये काश्मीरची  150 मुलं शिकतात. माझ्या बरोबर  आलेला  मुक्तार काश्मिरी तरुण चांगली मराठी बोलतो, मेडिकल च्या प्रथम    वर्षात शि कतो.  काश्मीर मधील लोकांना सौंदर्य आणि बुद्धीची दैवी देणगी आहे. काश्मिरी लोकांत बंडखोरी उपजतच आहे. दबाव टाकला तर काश्मिरी कधीच ऐकत नाहीत. प्रश्न सोडवायचा असेल तर तो आपुलकीने,प्रेमानी व विश्वासाने सोडता येईल. सरहद संस्था त्या साठी प्रयत्न करते. शिवाजी महाराजांनी सांगितल्या प्रमाणे जर किल्ला जिंकायचा असेल तर आजूबाजूंच्या लोकांची मन जिंकायला पाहिजेत. सरहद नि एक कार्यक्रम आखलाय कारगिल पर्यटन केंद्र करू, लोकांची मन जिंकू, लोक बरोबर आले तर शत्रू कधी जिंकू शकत नाही. ज्या दिवशी भारतातील जनता आणि सरकार दोघांना असे वाटेल कि काश्मीर आपले आहे. काश्मीरला कोणी तोडू शकत नाही.

Tuesday, 30 April 2013

धर्माचं ढोग हीच अनैतिकता



 धर्माचं ढोग  हीच अनैतिकता - राजन खान 

 मी कुठल्याच धर्माचा नाही , देवाचं अस्तित्व नाकारणारा आहे. देव, धर्म आणि जात काल्पनिक आहे. असे  प्रतिपादन राजन खान यांनी  संजीवनी व्याख्यानमालेत " धर्म आणि नैतिकता" या विषया वर बोलताना केले. ते पुढे म्हणाले, आजपर्यत झालेला सर्व भ्रष्टाचार देव ,धर्म मानणा-या लोकांनीच केला आहे.  या देश्यातील 60% लोक गरीब आहेत. सर्व देव मानणारे आहेत तरी देव त्याचं भल्ल का करत नाही? गरीब अधिका अधिक गरीब होत चालले आहेत. भ्रष्टाचारी अधिका अधिक  श्रीमंत  होत  चालले  आहेत. आणि  देवबाप्पा काहीच  करायला  तयार  नाही . हि  या देशाची  वाईट  अवस्था  आहे.   या जगात एक हि मुसलमान खरा मुसलमान नाही, एक हि हिंदू खरा हिंदू नाही, एक हि ख्रिश्चन खरा ख्रिश्चन नाही. त्या त्या धर्माचे ढोंग करणारे फार आहेत. गर्वसे कहो म्हणणारे तेवढ्या पुरतेच त्या त्या धर्माचे आहेत.  धर्म व त्याचे आचरणाचे नियम इमानदारीने पाळले तर जग बरेचसे शांत होइल. प्रत्येक धर्म मुलभूत पणे एक शिकवण देतो, दुस-या माणसाला माणूस म्हणून वागव, किमंत दे.  धर्माचा गर्व मानणारे, सर्वच्या सर्व जण धर्माचे भोत आहेत. खरे धार्मिक नहित.   दोन पर्याय आहेत, एक धर्म सोडा व जे जगायचे आहे तसे जगा. किवा विनंती पूर्ण सागणे आहे कि जो धर्म आहे  तो तरी निट पाळा , इमानदारीत पाळा.  कुठलाच धर्म मरणाला पर्याय देऊ शकत नाही. मारण्या आधी जगणार का हा प्रश्न आहे.  मला वाटते बिन धर्माचं नैतिक जगता येते. नैतिकता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दुस-या माणसाशी मायेने, आपुलकीने आणि माणसा सारखं वागणे म्हणजे नैतिकता.  पाळायचा असेल तर खरोखर धर्म पाळा, नाहीतर  धर्म सोडा. धर्माचं ढोग नाही करायचं हेच जास्ती अनैतिक आहे. .  आपला   धर्म  शोधा   त्याचा  अभ्यास करा व   खरोखरचा धर्म  पाळा.