चारित्र्य,
ज्ञान,
उत्कृष्टता,
मूल्य
आणि आरोग्य.
परिपूर्ण समृद्ध जीवन जगण्यासाठी या पाचही क्षेत्रांत यशस्वी होणे आवश्यक आहे. आनंदी , परिपूर्ण व यशस्वी आयुष्याची सुरवात आपण दररोज स्वतःला पाच साधे प्रश्न विचारून करू शकतो.
१) आज मी कश्याबद्दल आभारी आहे? .
दिवसभरात कुणी कुणी माझा दिवस छान केला. छोट्या छोट्या गोष्टीची नोंद घ्या कृतज्ञता व्यक्त करा चारित्र्यवान म्हणजे प्रामाणिक, आदरणीय, आदर आणि कौतुक करणारा.
२) आज मी काय शिकलो ?
रोज हा प्रश्न स्वतःला विचारा , शिकणं कधीच संपत नाही. नवीन तंत्रज्ञाना पासून ते दैनंदिन व्यवहारात असंख्य नवीन कौश्यल्य शिकता यायला पाहिजेत.
३) आज मी कुठे चांगली कामगिरी केली ?
आजची माझी कामगिरी कशी झाली, कुठे सुधारली , कामात निपुणता येत आहे का ?
४) आज कोणासाठी मी उपयुक्त ठरलो?
दुस-यांना मदत केल्यानेच आपली उपयुक्तता वाढत असते. आज माझ्यामुळे कुणाला मदत झाली.
५) आज मी माझी काळजी कशी घेतली ?
स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वतःला निरोगी राहण्याचा प्रयत्न करणे. योग्य सवयी लावणे , लवकर उठणे, व्यायाम करणे , योग्य आहार घेणे.
जीवनाचा सारांश काढणारे हे पाच प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांची जाणते अजाणतेणे दिली गेलेली उत्तरे नक्कीच आपले जीवन सुधारू शकतील.
दररोज नियमित हे पाच प्रश्न स्वतःला विचारा , उत्तरं शोधा, तुमचा जीवनविषयक दृष्टिकोन बदलेल, जीवनाची परिपूर्ततेकडे वाटचाल सुरु होईल.