Friday, 3 October 2014

मर्यादा पुरुषोत्तम -चित्र प्रदर्शन





१ ऑक्टोबर २०१४ ला श्री वासुदेव कामत यांच्या  मर्यादा पुरुषोत्तम या चीत्रमालीकेला भेट देण्याचा  एक छान योग  जुळून आला. मर्यादा पुरुषोत्तम चीत्रामालीके संबंधी आपली भूमिका विषद करताना कामात सर म्हणतात 
राम हा खरोखरीचा इतिहास पुरुष आहे कि कवी-कल्पना हा उहापोह करीत बसलो तर संस्काराचं सामर्थ्य असलेलं हे पारस आपल्या हातून निसटून जाईल.राम जीवन दर्शनाचा ,आदर्शाचा आपल्या कुवतीनुसार अंगीकार केल्याने होणारे सार्थक अधिक मौल्यवान आहे.

आजवर अनेक माध्यमातून रामायण सर्वांसमोर आले आहे. यात आणखी काय भर घालणार असं वाटत असतानाच रामसेतू उभारताना चिमुकल्या खारुताईचे जे योगदान होते ते पाहून मला प्रेरणा मिळाली असे सांगताना कामतसर  म्हणतात की या सर्व चित्रा मध्ये साक्ष स्वरूप वाटणारी खार म्हणजे मी.  

हुनुमान म्हणजे सेवाव्रती दास्य भक्तिचे मूर्तिमंत उदाहरण. ज्याने त्याग आणि सेवा हा धर्म मानून सेवा केली.

चित्रमालिकेची सुरवात त्याच्याच हृदयस्थ प्रेरणेने झाली असे सुचविणा-या चित्राने केली आहे.         















मज चंद्र हवा - राम-चंद्र हट्ट 




जनक सुता - जानकी




शिला  पुजन- अहिल्या उद्धार















आकाशासी जडले नाते - स्वयंवर झाले सीतेचे 


                             
शबरी बेर माला 




भरता राज्य  तुझे 






भरत राज्य 



चित्रकारां बरोबर वानरसेना









Wednesday, 30 July 2014

केळीची बाग


बसराई (नवीन रोपं )  केळी लागवड
केळीच्या बागा हे एकेकाळी वसईचं वैभव होते. वसईची सुकेळी,केळी प्रसिध्द होती. हळू हळू केळीची लागवड कमी होत गेली, त्याला अनेक कारणं , जमीन आक्रसत गेली, घरं ,इमारती उभ्या राहू लागल्या, लागवडीचं  क्षेत्र  कमी झाले. केळीचं पिक हे  नगदी पिक  राहिलं नाही,पावसाळ्याच्या  सुरवातील होणारी वारमोड ( वादळी वा-या मुळे  मोडणा-या केळी ) केतकी(र्णगुच्छ)  रोगाची लागण,  पुढच्या  पिढीनी  पत्करलेला    वेगळ्या व्यवसायाचा/ नोकरीचा  मार्ग.  

दोन रोपां मधील अंतर तीन ते चार फुट

  


वेगवेगळ्या जातीची  (वाण )  केळी वसईत  होतात  , राजेळी , वेलची , आंबट वेलची, सफेत वेलची , भूरकेळ , हिरव्यासालीची (बसराई/बसरी) केळी, बनकेळ, मुठेळी ,तांबडी (तांबड्या सालीची) सध्या प्रचलित असलेली हजारीकेळी. यातील मुठेळी हि   जाती नामशेष झाली आहे तर बनकेळ त्याच मार्गावर आहे. बनकेळ ह्या जातीच रोप लावलं जायचं व त्याचे बन राखले जायचे म्हणजेच मूळ रोपाच्या बुडावर पिल्ल उगवत मोठी   होत  त्यातूनच बनते  केळीचे बन.
केळीची लागवड दोन हंगामात केली जाते. एक भादवडी व दुसरी कार्तिकी लागवड. भादवडी पिकाला चांगला बाजारभाव मिळतो परंतु या पिकाला वारमोडीचा धोका असतो. रोपं लागवडीची पद्धत पाळली जाते  राजेळी किवा बसराई जातीची लागवड करताना रोपां मध्ये सहा  ते सात  फुटाचे  अतंर  ठेवण्यात येत. भाग  जमीन नांगरून घेतली जाते.  सगळी रोपं एका  रांगेत  लावली जावी म्हणून सुत मारले जाते.  दोन रोपा मधील अंतर समान राहावे म्हणून एक मापाची काठी  तयार करण्यात येते तिला कांडा  असे  म्हणतात.   साधारणता केळीच्या पिकला तीन वेळा खताची मात्रा व बुड बांधणी केली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पाणी दिले जाते

पूर्ण वाढलेल्या केळीची बाग


निसवल्यावर केळफुल





केळीच्या विविध उपयोगा मुळे केळीला  'कल्पतरू' म्हटले जाते.केळीची पाने पंगत / जेवणावळी  साठी वापरतात, देवाच्या नैवेद्या साठी केळीच्या पानाला (बोथी चा खोला)  प्राधान्य  दिले  जाते.  धार्मिक कार्यक्रमात केळीचे खांब (खुंट) प्रवेशदारी बांधण्याची प्रथा आहे. पूजेच्या चौरंगाला केळीच्या  शिंगा बांधतात. खोडाची सोपट(खोबाटे) सजावटी साठी तसेच त्याचा धागा(वाक)  बांधण्यासाठी  वापरतात. कांद्याची माळ(कांद्याचा जोडा) वाकानी  बनवतात.  सुकलेलं केळीची पाने (वावळी) वेष्टना साठी,  खास  करून दुधाच्या पैकिंग साठी उपयोगी आणत.रहाट-गाडगे  चे वेळी केळीच्या पानाच्या देठाचा दोरखंड (राटा ची माळ )  बनवण्यासाठी  उपयोग  होत  असे.घड  काढल्यानंतर केळीचे खोड,कंद  जनावराना खाद्य म्हणून उपयोगी पडते. केळीचे फुल, कच्ची केळी याच्या  भाज्या केल्या जातात. यामध्ये लोह, पालाश, विटामिन 'ए' हे अन्नघटक असतात. उपवासामध्ये चालणारे व सर्वत्र उपलब्ध असणारे फळ म्हणजे केळी.

 




बसराई ला लगडलेला घड (लोंगर) केळफुलासह
 


केळफुल - फुलफण्यासह

Tuesday, 22 July 2014

अर्थसंकल्प - अनेक अर्थ


अर्थसंकल्प वरील विवेचनाला सुरवात करताना  हिंदीतील  कविता
जीत की खातीर बस जुनून चाहिये
                 "जिसमे उबाल हो ऐसा खुन चाहिऐ"
ये आसमा भी आयेगा जमी पर   
             "बस इरादो मे जीत की गूँज चाहिये"  चा उलेख करून म्हटले कि या संकल्पा मध्ये जिंकण्याची उर्मी आहे का  हे आपण शोधणार आहोत.


अत्यंत समर्थ सरकारचा अत्यंत सावध अर्थसंकल्प व संरक्षण ह्या विषयाची व्याख्या आणि व्याप्ती वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे. असे प्रतिपादन श्रीयुत चंद्रशेखर टिळक यांनी शनिमंदिर वाघोली येथे संजीवनी परिवाराच्या "अर्थसंकल्प अनेक अर्थ"  या कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री यशवंत पाटील होते. ते पुढे म्हणाले कि अच्छे दिन आने वाले हैं असे म्हटलंय तर  कुठे आहेत अच्छे दिन  असे विचारतात त्याचं उत्तर असे कि अच्छे दिन आयेगे असे म्हटलंय पण कब आयेगे हे म्हटलं नाही त्यासाठी वेळ द्यावा लागेल. 
 अर्थसंकल्प हे आर्थिक राजकारणाचं किवा राजकीय अर्थकारणाचं माध्यम आहे. सरकार बदलणे हि राजकीय प्रक्रिया आहे  परंतु  अर्थकारण हे राजकारणाच्या पलीकडे  आहे.  मणिपूरच्या क्रीडा विद्यापीठाच्या तरतुद म्हणजे  प्रामाणिक प्रयत्नांना मनापासून   दिलेली दाद  आणि पोचपावती  आहे असे म्हणाले. किसान पत्र ,  स्माल सेविंग , पी पी एफ , यातील तरतुदी  व त्याचा दीर्घकालीन परिणाम सोदाहरण  उकलुन  दाखविला  शेवट करताना त्यांनी सांगितले कि दीर्घकालीन दृष्टीकोनातून विचार केला तर आशा  ठेवायला  नक्की  वाव आहे असा अर्थसंकल्प. 
सुरवातील कमलाकर पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले तर आनंद पाटील यांनी सुत्रसंचलन  व आभार मानले.    




Monday, 14 July 2014

वृक्षा मध्ये मी पिंपळ



  माझी विभूती पिंपळ । म्हणोनि बोलिला गोपाळ ।


हिरा डोंगरीवरील हा महावृक्ष
  
भगवंतांनी गीते मध्ये सांगितले आहे कि सर्व वृक्षा मध्ये मी पिंपळ   आहे. पिंपळ हि माझी एक विभूती आहे. गौतम बुद्धांना या वृक्षाखाली बोध (ज्ञानप्राप्ती) झाला  म्हणून  याला  बोधिवृक्ष  हि म्हणतात .   वैज्ञानिक दृष्ट्या हि पिंपळाची विशेषता आहे.  पिंपळ हा  २४ तास ऑक्सिजन प्रसवणारा  वृक्ष आहे. त्यामुळेच या वृक्षाखाली प्रसन्न  ,उत्साहवर्धक वातावरण असते.  पानाचे देठ लांब असल्याकारणाने हवे मुळे पानांचा टाळ्या वाजवण्यासारखा आवाज होतो ती  सळसळ  चैतन्य निर्माण करते . पिंपळाच्या पानाची जाळी  हे   पिंपळाच्या पानेचे एक वैशिष्ट, विध्यार्थी दशेत हि पाने पुस्तकात  ठेवून ,पानाची पूर्ण एकसंध जाळी व्हावी म्हणून प्रयत्न असायचे. 


लाल ,पोपटी हिरवा ते हिरवा , घन हिरवा   


पानझड ते लाललूसलुसित कोवळी पाने 

 पिंपळाला नाश न पावणारा वृक्ष असे हि म्हणतात (अश्वस्त ).    पानझड ते नवीन पालवी खूप वेगात येत असते त्या वेळी पानाची स्थित्यंतरे त्याचे  रंग खूपच  लोभनीय असतात.



                                                                                         

लाल ,पोपटी हिरवा ते हिरवा रंगांची किमया 

 


इवलसे रोप ते महावृक्ष





गया येथील बोधिवृक्ष (१७ जुलै २००९)
 
आपल्याकडे आढळणारी भेंड (भेंडीचे झाड) हि पिंपळ वर्गातील असून त्याला   परोसा पिंपळ  म्हणतात. 
भेंडीची फुले फळं आणि पाने (पिंपळाच्या पानाशी   साम्य आढळतंय?)
 
 
 
आणि हो शेवटच्या प्रवासात भेंडीचे फोकच साथ देतात








Tuesday, 8 July 2014

श्रमदान

श्रमदान
निर्मळ मंदिर परिसरातील झाडा साठी दोन गाड्या मातीची व्यवस्था आपल्यातील एका वृक्ष प्रेमींनी केली होती. श्रमदान करून झाडांची बुडे बांधायचे ठरले सर्वाना निरोप/मेल  देण्यात आली. रविवारी २९ जूनला सकाळी ७ वाजता ४० जणाची टीम जमली. युवा मंडळी सहभागी झाली होती. त्यांनी श्रमदानाला नवीन उर्जा प्रदान केली.



 











 


वृक्षांचा वाढदिवस.


वृक्षरोपण करताना  श्री बबनशेठ नाईक

६ जुलै २०१४  महिन्याचा पहिला रविवार, म्हणजेच  आपले मित्र, मार्गदर्शक व  तत्त्वज्ञ असलेल्या  वृक्षांचा वाढदिवस. श्री सायनेकर सरांच्या प्रेरणे तून   जुलै २००५ साली वृक्ष संवर्धन प्रकल्प निर्मळ येथे  श्रीमत शंकराचार्य मंदिर परिसरात राबवण्यास सुरवात  झाली, त्याला नऊ वर्ष झाली. श्री बबनशेठ नाईक यांच्या  अमृतमहोत्सवीवर्षाचं   औचित्य साधून  त्यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले. या वर्षी ताम्हन , अर्जुन ,पारिजात इत्यादी झाडे लावली.


वृक्षरोपण करताना     श्री नितीन पाटील










वृक्षरोपण करताना  : श्री वसंत  नाईक , श्री अनंत  पाटील






वृक्षरोपण करताना  श्री सतीश चुरी




कार्यक्रमाला उपस्तिथ असलेली मित्रमंडळी





 तीन महिन्यात नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेले श्री सतीश चुरी उपस्थित होते. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत अनुभव कथन केले. त्यांनी नर्मदा मैयाचे वैशिष्ट , नर्मदा  परीक्रमेचे  पाळावयाचे नियम, त्यातील एक म्हणजे नर्मदा मातेचं सतत दर्शन , प्रवासात भेटणारी साथ संगत , योगायोग , कडू, गोड आठवणी   सांगितल्या. उपस्तीथ सर्वांनाच नर्मदा परिक्रमेचा अनुभव घ्यावा असे वाटून गेले.
या प्रसंगी जग किती सुंदर आहे, त्यामध्ये झाडांचे , निसर्गाचे योगदान कसे आहे. याच वर्णन असलेली दोन गीतांची प्रत उपस्थितांना देण्यात आली. ती गीतं म्हणजे "देवा तुझे किती सुंदर" आणि  " What a Wonderful World".


देवा तुझे किती सुंदर

देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील

कवी
-

Louis Armstrong – What A Wonderful World  
Translation in progress. Please wait...

I see trees of green, red roses too
I see them bloom for me and you
And I think to myself what a wonderful world.

I see skies of blue and clouds of white
The bright blessed day, the dark sacred night
And I think to myself what a wonderful world.

The colors of the rainbow so pretty in the sky
Are also on the faces of people going by
I see friends shaking hands saying how do you do
They're really saying I love you.

I hear babies crying, I watch them grow
They'll learn much more than I'll never know
And I think to myself what a wonderful world
Yes I think to myself what a wonderful world.


हिरवीगार दिसतात झाडं, लाल गुलाब उठून दिसतात
तुझ्यासाठी, माझ्यासाठी, बघ कसे फुलून येतात.म्हणतो मी स्वत:शीच मग, कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
लख्ख निळं दिसतं आभाळ,
 
धवल -शुभ्र दिसतात जल-
उजळलेले प्रसन्न दिवस, धीर गंभीर रात्री गडद
म्हणतो मी स्वत:शीच मग, कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
खुलतात रंग इंद्रधनुष्याचे, आभाळात तिथे वर
पण त्याची आभा उजळते इथे साऱ्यांच्या चेहऱ्यावर
करतात मित्र हस्तांदोलन, विचारतात, कसा आहेस तू
खरं तर त्यांना म्हणायचं असतं, दोस्ता, आय लव यू
म्हणतो मी स्वत:शीच मग, कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
किलबिलाट करताना दिसतात बाळं, दिसतात मोठी होताना
किती शिकून होतील शहाणी!
 
करताही येत नाही कल्पना
म्हणतो मी स्वत:शीच मग, कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
भावानुवाद : ललिता बर्वे