ज्ञानोबांनी.
ज्ञानेश्वरीत अठराव्या अध्यायात बरा,
चांगला, उत्तम याची चढती भाजणी खालील ओव्यातून दिली आहेत. ओव्या
अर्थासह वाचल्या नंतर नक्कीच अर्थपूर्ण
आणि गोड वाटतील.
आणि
ऋतू बरवा शारदु| शारदी पुढती चांदू | चंद्री जैसा सबंधु | पूर्णिमेचा ||३४४ ||
का
वसंती बरवा आरामू | आरामीही प्रियसंगमू | संगमी आगामू | उपचारांचा ||३४५||
नाना
कमळी पांडवा | विकासु जैसा बरवा | विकासाही यावा | परागाचा ||३४६||
वाचे
बरवे कवित्व | कवित्वी बरवे रसिकत्व | रसिकत्वी परतत्त्व | स्पर्शू जैसा ||३४७||
सर्व
ऋतुं मध्ये शरद ऋतू चांगला, त्यात शुक्लपक्षातील चंद्र चांगला , पौर्णिमेचा तर
फारच उत्तम. (शरदाचे चांदणे , शरद पोर्णिमा )
वसंत
ऋतूत बाग चांगली, बागेत आवडते मनुष्य भेटावे हे अधिक चांगले, त्यातही सर्व सुखे
मिळावी हे फारच उत्तम.
कमळ
चांगले, कमळाचे उमलणे अधिक चांगले व त्यातही सुगंध उत्तम.
वाणीत
कवित्व चांगले, काव्यात रसपुर्णता चांगली,
व रसपुर्णतेसही परतत्त्वाचा,
आत्मानंदाचा, अनुभूतीचा स्पर्श फारच उत्तम.
ज्ञानोबा
माउलीच्या ओव्या आवडल्या तर चांगल्या , गोडी वाटली तर अधिक चंगले. ज्ञानेश्वरी
वाचावी असे वाटले तर उत्तमच.
ग्यानबा
तुकाराम.
No comments:
Post a Comment