अर्जुन
विचारतो , जे शास्त्रविधीचे पालन न करता
स्वत:च्या धारणे नुसार पूजन करतात, त्यांची काय अवस्था असते? ते
सत्त्वगुणी, रजोगुणी, की तमोगुणी असतात.
श्री
भगवान म्हणाले , प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा तीन प्रकारची असू शकते,
सात्त्विकी, राजसी, तामसी. जीवाने
प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे
म्हटले जाते. सात्त्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात,
राजसिक राक्षसांचे तर तामसिक भूतप्रेतांचे पूजन करतात. जे दंभ आणि अहंकाराने ,
शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे
काम आणि आसक्ती ने झपाटलेले असतात. देहाला आणि अंतर्यामी परमात्म्याला कष्ट देतात
त्यांना असुर म्हणाले जाते. मूळ त्रैगुण्य
त्यातून स्वभाव, स्वभावानुसार श्रद्धा,
श्रद्धेनुसार क्रिया;
आता
आहाराचे तीन प्रकार. सात्त्विक आहार ,
स्निग्ध, रसाळ, मधुर, पौष्टीक
असतो. चित्तशुद्धि, बळ , आयुष्य वाढवणारा
असतो. राजस आहार,
खारे, रुक्ष, कडू, तिखट, दाहक असा असतो. दु:ख , शोक, रोग
वाढवितो. रसहीन, शिळे, दुर्गंध-युक्त , निषिध्द मानलेले,
उष्टे अन्न म्हणजे तामसी आहार.
फलाची
अभिलाषा सोडून, कर्तव्य समजून विधियुक्त , मन लावून यज्ञ केला जातो
त्याला सात्त्विक यज्ञ म्हणतात. फळाची इच्छा ठेवून, दंभाने लोकांत मिरवून केला
जातो तो राजस यज्ञ होय. विधी नाही, मंत्र
नाही, निष्पत्ति नाही, श्रद्धा नाही, त्याग नाही अशाला तामस यज्ञ म्हणतात.
भगवंत,
ब्राह्मण, पूज्य व्यक्ती, गुरु यांचे पूजन पावित्र्य,
ब्रह्मचर्य अहिंसा यांना शारीरक तप म्हटले
जाते.
सत्य,
प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे बोलणे नियमित पणे
स्वाध्याय करणे यांना वाचिक तप म्हणतात.
प्रसन्न-वृत्ति,
संयम, समाधान, आत्म-संयम भावशुद्धी हे मानसिक तप. या शारीरिक,
वाचिक, मानसिक त्रिविधी तपाला सात्त्विक तप म्हणतात.
सत्कार,
मानसन्मान मिळावा म्हणून दंभाने जे तप केले जाते त्याला राजसिक तप म्हटले जाते. ते
क्षणिक आणि अस्थिर असतात. दुराग्रहाने अंतरात्म्याला पीडून किंवा इतरांना व्यस्थित
करणारे तप तामसिक होय.
कर्तव्य
म्हणून योग्य व्यक्तीला, योग्य ठिकाणी, योग्य वेळी, काळी,
परतफेडीची अपेक्षा न ठेवता दिलेल्या दानाला सात्त्विक दान म्हणाले जाते. परंतु जे
परतफेडीची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून,
संकुचित वृतीने दिले जाते त्याला राजसिक दान म्हटले जाते. अयोग्य स्थळी,
अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलानापुर्वक
दिल्या जाणा-या दानाला तपासिक दान म्हणतात.
ब्रह्म एकच पण ॐ तत सत या
त्रिविध नामातून ते प्रकट झाले. या त्रिविध मंत्रातून सृष्टी उत्पन्न
झाली. ॐ कार उच्चारून उपासक यज्ञ, दान, तप याचे अनुष्ठान करतात. फळाची वासना टाकून, तत काराचे स्मरण करून
मोक्षप्राप्ती वर लक्ष ठवून यज्ञ, दान, तप इत्यादी विविध
क्रिया कराव्यात.
परम सत्य हे भक्तिमय
यज्ञा चे उद्दिष्ट आहे ते सत ने निर्देशले जाते. यज्ञ, तप, आणि दान आदी कर्मा ना सत म्हणतात.
No comments:
Post a Comment