ऊर्ध्वं गच्छन्ति
सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः । जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥
१४-१८ ॥
सत्त्वगुणात असलेले
पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात. रजोगुणात असलेले पुरुष मध्यलोकात म्हणजे
मनुष्यलोकातच राहातात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक,
पशू इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात.
मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो
मित्रारिपक्षयोः । सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥ १४-२५ ॥
जो मान व अपमान सारखेच
मानतो,
ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यात मी कर्ता असा अभिमान नसतो, त्याला
गुणातीत म्हणतात.
वरील उद्बोधनातून आपल्यातील गुणावगुणाचे ज्ञान प्राप्त झाले आणि तरीही वागणुकीत हवे ते बदल आणत नसतील त्यांना तसे भोग भोगावेच लागणार.
ReplyDelete